- Home
- Utility News
- December Discount : Maruti च्या या 9 कार्सवर बंपर डिस्काउंट, नवी कार घेण्याची हीच योग्य वेळ!
December Discount : Maruti च्या या 9 कार्सवर बंपर डिस्काउंट, नवी कार घेण्याची हीच योग्य वेळ!
Maruti Suzuki December Discounts : मारुती सुझुकीने आपल्या एरिना शोरूम मॉडेल्ससाठी डिसेंबर २०२५ महिन्यासाठी खास डिस्काउंट जाहीर केला आहे. नवीन कार खरेदी करण्याची किंवा जुनी कार बदलण्याची ही एक उत्तम संधी आहे.

मारुती सुझुकी डिस्काउंट
२०२५ संपण्यापूर्वी मारुती सुझुकीने कार प्रेमींसाठी एक चांगली बातमी दिली आहे. कंपनीने आपल्या एरिना शोरूममध्ये विकल्या जाणाऱ्या ९ मॉडेल्सवर डिसेंबर महिन्यासाठी खास सवलती जाहीर केल्या आहेत. नवीन कार खरेदी करण्याची किंवा जुनी कार बदलण्याची ही एक उत्तम संधी मानली जात आहे. पण सवलतीची रक्कम शोरूममधील स्टॉक आणि शहरानुसार बदलू शकते, त्यामुळे अचूक माहितीसाठी जवळच्या एरिना डीलरशी संपर्क साधणे चांगले राहील.
सर्वाधिक ऑफर्स
मारुती सुझुकीची सर्वात लोकप्रिय हॅचबॅक वॅगनआरवर डिसेंबरमध्ये ५८,१०० रुपयांपर्यंतचे फायदे मिळत आहेत. यात कॅश डिस्काउंट, एक्सचेंज/स्क्रॅप बोनस आणि अतिरिक्त ऑफर्सचा समावेश आहे. कमी किंमत, चांगले मायलेज आणि कमी देखभाल खर्चामुळे वॅगनआर आधीपासूनच कुटुंबांची पसंती आहे.
विशेष सवलत
मारुती स्विफ्टच्या पेट्रोल आणि इतर मॉडेल्सच्या खरेदीवर ५५,००० रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. तसेच, Alto K10 आणि S-Presso या एंट्री-लेव्हल मॉडेल्सवर ५२,५०० रुपयांपर्यंतचे फायदे मिळत आहेत. कमी किंमत आणि व्यावहारिक डिझाइनमुळे या दोन्ही कार खरेदी करणे सोपे आहे.
किंमत कपात
Eeco आणि Celerio मॉडेल्स डिसेंबरमध्ये खरेदी करणाऱ्यांना ५२,५०० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. छोट्या SUV प्रकारात लोकप्रिय असलेल्या Brezza वर ४०,००० रुपयांपर्यंत सूट जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये कॅश डिस्काउंट आणि स्क्रॅप बोनसचा समावेश आहे.
डिसेंबर कार ऑफर
सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या सेडान Dzire च्या खरेदीवर १२,५०० रुपयांपर्यंत डीलर स्तरावर सूट मिळत आहे. अलीकडेच या मॉडेलला भारतीय NCAP चाचणीत 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळालं आहे, हे विशेष. आणखी एक लोकप्रिय फॅमिली MPV Ertiga वर १०,००० रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट दिला जात आहे. देशभरात या मॉडेलला चांगली मागणी आहे.

