- Home
- Utility News
- High-Security Number Plates: वाहनचालकांनो थांबा जरा! नोव्हेंबरपूर्वीच करा हे काम नाहीतर खिशाला बसणार मोठा फटका!
High-Security Number Plates: वाहनचालकांनो थांबा जरा! नोव्हेंबरपूर्वीच करा हे काम नाहीतर खिशाला बसणार मोठा फटका!
High-Security Number Plates: वाहनधारकांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. ही मुदत चुकवल्यास दंडात्मक कारवाई होणार असून, अद्याप 1 कोटीहून अधिक वाहनांवर ही प्रक्रिया बाकी आहे.

‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ नसेल तर दंड ठोठावला जाईल
मुंबई: राज्यातील वाहनधारकांसाठी नोव्हेंबर महिना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. ही मुदत ओलांडल्यास वाहनमालकांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन परिवहन विभागानं केलं आहे.
हाय सिक्युरिटी प्लेट म्हणजे काय आणि का आवश्यक आहे?
HSRP ही एक विशेष धातूची प्लेट असून, तिच्यावर क्रमांक लेसरने कोरला जातो. यामुळे वाहन चोरी, नंबर बदल किंवा बनावट प्लेट वापरणे अशक्य होते. त्यामुळे वाहनांची ओळख अधिक सुरक्षित राहते आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यात मदत मिळते.
आकडेवारी सांगतेय, अजूनही लाखो वाहनधारक उशिरात!
परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 86 लाख 3 हजार वाहनधारकांनी अर्ज दाखल केले असून, त्यापैकी 68 लाख 24 हजार वाहनांवर एचएसआरपी बसवण्यात आली आहे. मात्र अजूनही सुमारे 1 कोटी 13 लाख वाहनधारकांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात आरटीओ कार्यालयांवर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
2019 पूर्वीच्या वाहनांसाठी अनिवार्य नियम
2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी एचएसआरपी बसवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. या उपक्रमामुळे वाहनांची ओळख, सुरक्षा आणि तपास प्रक्रिया अधिक सुलभ होईल, असं परिवहन विभागानं स्पष्ट केलं आहे.
राज्य तीन झोनमध्ये विभागले, कंपन्यांची नियुक्ती पूर्ण
परिवहन विभागानं राज्यातील आरटीओ कार्यालयांना तीन झोनमध्ये विभागून, प्रत्येक झोनसाठी वेगवेगळ्या कंपन्यांना जबाबदारी दिली आहे.
झोन 1: बोरिवली, ठाणे, पनवेल, पुणे, कोल्हापूरसह 12 आरटीओ
झोन 2: मुंबई सेंट्रल, कल्याण, पेण, रत्नागिरी, सातारा आदी 16 आरटीओ
झोन 3: वडाळा, वाशी, सिंधुदुर्ग, नाशिक, सांगली, कऱ्हाडसह 27 आरटीओ
अंतिम तारीख – 30 नोव्हेंबर 2025
जर या तारखेपर्यंत वाहनावर एचएसआरपी बसवलेली नसेल किंवा उशिरा ऑर्डर केली असेल, तर दंडात्मक कारवाई निश्चित आहे. त्यामुळे वाहनधारकांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता, ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
अर्ज आणि शुल्क प्रक्रिया
एचएसआरपीची किंमत वाहनाच्या प्रकारावर अवलंबून बदलते दुचाकी, चारचाकी किंवा मोठ्या वाहनांसाठी वेगवेगळे दर आहेत. नागरिकांनी परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अपॉइंटमेंट घ्यावी, शुल्क भरावे (जीएसटीसह) आणि ठरवलेल्या तारखेला आरटीओ कार्यालयात जाऊन प्लेट बसवून घ्यावी.

