कोकण रेल्वेमध्ये मोठी भरती, पाहा अधिक माहिती

| Published : May 16 2024, 10:21 AM IST

kokan railway

सार

कोकण रेल्वेमध्ये विविध पदांसाठी उमेदवारांकडून नोकरीचा अर्ज मागवण्यात येत आहे. नेमकी कोणती आणि किती पदे रिक्त आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासंदर्भातील अधिकची माहिती खालील बातमीमधून जाणून घ्यावी.

 

कोकण रेल्वेमध्ये विविध पदांसाठी उमेदवारांकडून नोकरीचा अर्ज मागवण्यात येत आहे. नेमकी कोणती आणि किती पदे रिक्त आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासंदर्भातील अधिकची माहिती खालील बातमीमधून जाणून घ्यावी.

पद आणि पदसंख्या :

कोकण रेल्वेमध्ये खालील पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. EE/करार या पदासाठी एकूण ३ पदांवर भरती करण्यात येणार आहे. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल या पदासाठी एकूण ३ पदांवर भरती करण्यात येणार आहे. ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल या पदासाठी एकूण १५ पदांवर भरती करण्यात येणार आहे. ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/सिव्हिल या पदासाठी एकूण ४ पदांवर भरती करण्यात येणार आहे. डिझाईन असिस्टंट/इलेक्ट्रिकल या पदासाठी एकूण २ पदांवर भरती करण्यात येणार आहे. तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल या पदासाठी एकूण १५ पदांवर भरती करण्यात येणार आहे. अशा एकूण ४२ रिक्त जागांवर कोकण रेल्वेमध्ये भरती करण्यात येणार आहे.

शैक्षाणिक पात्रता :

EE/करार या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनीयरिंगमधील पदवी/डिप्लोमा असणे आवश्यक आहे. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे, इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनीयरिंगमधील पदवी / डिप्लोमा असणे आवश्यक आहे. ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे सिव्हिल इंजिनीयरिंगमधील पदवी / डिप्लोमा असणे आवश्यक आहे. ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/सिव्हिल या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे ITI (ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल))/इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे. डिझाईन असिस्टंट/इलेक्ट्रिकल या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही ट्रेडमधील मान्यताप्राप्त संस्थेतून ITI शिक्षण असावे. तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनीयरिंगमधील पदवी/डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

वेतन :

EE/करार या पदावर उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना ५६,१००/- रुपये इतके वेतन देण्यात येईल. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल या पदावर उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना ४४,९००/- रुपये इतके वेतन देण्यात येईल. ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल या पदावर उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना ३५,४००/- रुपये इतके वेतन देण्यात येईल. ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/सिव्हिल या पदावर उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना ३५,४००/- रुपये इतके वेतन देण्यात येईल. डिझाईन असिस्टंट/इलेक्ट्रिकल या पदावर उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना ३५,४००/- रुपये इतके वेतन देण्यात येईल. तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल या पदावर उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना २५,५००/- रुपये इतके वेतन देण्यात येईल.

कोकण रेल्वे अधिकृत वेबसाईट लिंक: https://konkanrailway.com/

अर्ज आणि अर्ज प्रक्रिया :

वरील पदांसाठी नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी नोकरीसाठी मुलाखत द्यायची आहे.

मुलाखतीचा पत्ता :

मुलाखतीचा पत्ता – एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल्वे विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. जवळ, सीवूड्स रेल्वे स्टेशन, सेक्टर-४०, सीवूड्स (पश्चिम), नवी मुंबई वरील नोकरीच्या मुलाखती या ५ जून २०२४ ते २१ जून २०२४ दरम्यान घेण्यात येणार आहेत.

नोट:

मुलाखतीसाठी जाताना उमेदवारांनी आपला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवणे बंधनकारक आहे.