MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • कोल्हापूर-कोकण रेल्वेचे ४० वर्षांचे स्वप्न अखेर सत्यात! १०७ किमीचा मार्ग, २७ बोगदे; जाणून घ्या संपूर्ण प्लॅन

कोल्हापूर-कोकण रेल्वेचे ४० वर्षांचे स्वप्न अखेर सत्यात! १०७ किमीचा मार्ग, २७ बोगदे; जाणून घ्या संपूर्ण प्लॅन

Kolhapur-Vaibhavwadi Railway Line Project : पश्चिम महाराष्ट्र, कोकणला जोडणारा ऐतिहासिक 'कोल्हापूर–वैभववाडी' रेल्वे मार्ग अखेर सत्यात उतरणार आहे. केंद्र सरकारच्या भरीव निधीमुळे या १०७ किमीच्या मार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 02 2026, 05:20 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
कोल्हापूर कोकण रेल्वेचे ४० वर्षांचे स्वप्न अखेर सत्यात! १०७ किमीचा मार्ग
Image Credit : Asianet News

कोल्हापूर-कोकण रेल्वेचे ४० वर्षांचे स्वप्न अखेर सत्यात! १०७ किमीचा मार्ग

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणच्या डोंगररांगांना एकमेकांशी जोडणारा ऐतिहासिक 'कोल्हापूर–वैभववाडी' रेल्वे मार्ग आता प्रत्यक्षात उतरणार आहे. तब्बल चार दशकांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाला केंद्राच्या भरघोस निधीमुळे नवा वेग मिळाला असून, २०२७ पर्यंत या मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत. 

25
निधीचा पाऊस, केंद्राचा मोठा वाटा
Image Credit : ANI

निधीचा पाऊस, केंद्राचा मोठा वाटा

केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला आलेल्या ३०,००० कोटींपैकी ३,४११ कोटी रुपये थेट या मार्गासाठी मंजूर करण्यात आले आहेत. एकूण ६,३०० कोटींच्या या प्रकल्पात केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकी ५०% वाटा उचलणार आहेत. भूसंपादनासाठी लागणारे १,२०० कोटी रुपये देण्याची तयारी राज्य सरकारने दर्शवल्यामुळे आता जमिनीच्या कामाला लवकरच सुरुवात होईल. 

Related Articles

Related image1
Budget 2026 : महाराष्ट्रावर अर्थसंकल्पातून ‘लक्ष्मीवर्षाव’; हायस्पीड रेल्वे, हजारो कोटींचे प्रकल्प जाहीर
Related image2
१० तासांचा प्रवास अवघ्या ३ तासांत! मुंबई–पुणे–हैदराबाद हायस्पीड बुलेट ट्रेन, ११ स्थानकांची भव्य योजना; तुमचं शहर आहे का यादीत?
35
प्रकल्पाचे 'इंजिनिअरिंग मार्वल', २७ बोगदे अन् १० स्टेशन्स
Image Credit : Social Media

प्रकल्पाचे 'इंजिनिअरिंग मार्वल', २७ बोगदे अन् १० स्टेशन्स

हा रेल्वे मार्ग तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक आणि निसर्गरम्य असणार आहे.

मार्गाची लांबी: १०७.६५ किलोमीटर.

बोगद्यांचे जाळे: सह्याद्रीच्या कडांमधून हा मार्ग जाणार असल्याने यात २७ बोगदे असतील, ज्यांची एकूण लांबी २८ किमी आहे. (सर्वात मोठा बोगदा ३.९६ किमी).

पुलांची मालिका: प्रवाशांच्या सोयीसाठी ५५ मोठे पूल आणि रस्त्यावरील ५५ उड्डाणपूल उभारले जाणार आहेत.

नवे थांबे: या मार्गावर एकूण १० रेल्वे स्थानके असतील, ज्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळण सुधारेल.

45
कोणत्या भागातून जाणार मार्ग?
Image Credit : Social Media

कोणत्या भागातून जाणार मार्ग?

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, पन्हाळा आणि गगनबावडा या तालुक्यांना थेट कोकणातील वैभववाडीशी जोडले जाईल. यासाठी सुमारे ६३८.६ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. 

55
व्यापार आणि पर्यटनाला मिळणार 'बूस्टर'
Image Credit : South Western Railways - SWR

व्यापार आणि पर्यटनाला मिळणार 'बूस्टर'

कोल्हापूरची महालक्ष्मी आणि कोकणातील समुद्रकिनारे आता रेल्वेने अवघ्या काही तासांच्या अंतरावर येतील. यामुळे केवळ पर्यटनालाच नाही, तर कोकणातील आंबा-काजू आणि पश्चिम महाराष्ट्रातील साखर-दूध उद्योगाला मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल. ५५ महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
ऑफिसमध्ये घालून पहा ब्रेसलेट मंगळसूत्र, लग्नात पाहुण्यांमध्ये पडेल छाप
Recommended image2
Aditya L1: दोन मोठ्या सौरवादळांमध्ये पृथ्वी विचित्र का वागली? इस्रोच्या यानाने शोधलं कारण
Recommended image3
Pulsar: आकाशगंगेच्या मध्यभागी सापडला 'डेड स्टार', शास्त्रज्ञही चक्रावले
Recommended image4
DIY Scrubber: नारळाची शेंडी फेकू नका! घरच्या घरी बनवा भांड्यांसाठी मोफत आणि मजबूत स्क्रबर
Recommended image5
Smart TV Privacy: तुमचा टीव्ही तुमच्यावर गुपचूप नजर ठेवतोय? हे फीचर लगेच बंद करा!
Related Stories
Recommended image1
Budget 2026 : महाराष्ट्रावर अर्थसंकल्पातून ‘लक्ष्मीवर्षाव’; हायस्पीड रेल्वे, हजारो कोटींचे प्रकल्प जाहीर
Recommended image2
१० तासांचा प्रवास अवघ्या ३ तासांत! मुंबई–पुणे–हैदराबाद हायस्पीड बुलेट ट्रेन, ११ स्थानकांची भव्य योजना; तुमचं शहर आहे का यादीत?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved