MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • १० तासांचा प्रवास अवघ्या ३ तासांत! मुंबई–पुणे–हैदराबाद हायस्पीड बुलेट ट्रेन, ११ स्थानकांची भव्य योजना; तुमचं शहर आहे का यादीत?

१० तासांचा प्रवास अवघ्या ३ तासांत! मुंबई–पुणे–हैदराबाद हायस्पीड बुलेट ट्रेन, ११ स्थानकांची भव्य योजना; तुमचं शहर आहे का यादीत?

Mumbai Pune Hyderabad Bullet Train Project: केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई–पुणे–हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरला अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. हा ७६७ किमीचा प्रकल्प १० तासांचा प्रवास अवघ्या ३ तासांवर आणणार असून, यात ११ स्थानकांचा समावेश आहे. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 02 2026, 03:46 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
१० तासांचा प्रवास अवघ्या ३ तासांत! मुंबई–पुणे–हैदराबाद हायस्पीड बुलेट ट्रेन
Image Credit : x

१० तासांचा प्रवास अवघ्या ३ तासांत! मुंबई–पुणे–हैदराबाद हायस्पीड बुलेट ट्रेन

मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम जोरात सुरू असतानाच आता पुणेकरांसह महाराष्ट्रासाठी आणखी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई–पुणे–हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरला अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे केवळ प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार नाही, तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या तीन राज्यांमधील औद्योगिक, व्यापारी आणि आर्थिक संबंधांना नवे बळ मिळणार आहे. 

26
७६७ किमीचा हायस्पीड मार्ग; ११ महत्त्वाची स्थानके
Image Credit : Gemini

७६७ किमीचा हायस्पीड मार्ग; ११ महत्त्वाची स्थानके

या प्रस्तावित हायस्पीड रेल्वे मार्गाची एकूण लांबी ७६७ किलोमीटर असून, या संपूर्ण मार्गावर ११ स्थानके उभारण्याचा प्रस्ताव आहे. ही स्थानके मोठ्या शहरांसह महत्त्वाच्या औद्योगिक आणि धार्मिक केंद्रांना जोडणार आहेत. 

Related Articles

Related image1
Budget 2026 : महाराष्ट्रावर अर्थसंकल्पातून ‘लक्ष्मीवर्षाव’; हायस्पीड रेल्वे, हजारो कोटींचे प्रकल्प जाहीर
Related image2
Tractor Subsidy Scheme: ट्रॅक्टर खरेदीसाठी 90% अनुदान! बचत गटांसाठी सुवर्णसंधी; अर्ज, पात्रता आणि कागदपत्रांची सविस्तर माहिती
36
प्रस्तावित स्थानकांची यादी
Image Credit : ANI

प्रस्तावित स्थानकांची यादी

मुंबई

नवी मुंबई

लोणावळा

पुणे

दौंड

अकलूज

पंढरपूर

सोलापूर

कलबुर्गी

जहिराबाद

हैदराबाद

या मार्गामुळे तीनही राज्यांतील अंतर्गत आणि आंतरराज्यीय कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात सुधारेल. 

46
प्रवासाच्या वेळेत क्रांतिकारी बदल
Image Credit : Getty

प्रवासाच्या वेळेत क्रांतिकारी बदल

सध्या मुंबई–पुणे प्रवासासाठी रस्ते किंवा रेल्वेमार्गे ३ ते ४ तास लागतात. मात्र हायस्पीड बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या ६० मिनिटांत पूर्ण होणार आहे. त्याचप्रमाणे, पुणे ते हैदराबाद हे सध्या ८ ते १० तासांचे अंतर फक्त ३ तासांत पार करता येणार आहे. यामुळे व्यवसाय, पर्यटन आणि दैनंदिन प्रवास अधिक सुलभ होणार आहे. 

56
तांत्रिक रचना आणि आर्थिक नियोजन
Image Credit : Getty

तांत्रिक रचना आणि आर्थिक नियोजन

या हायस्पीड प्रकल्पासाठी सध्याच्या रेल्वे रुळांचा वापर न करता पूर्णपणे स्वतंत्र आणि नवीन लोहमार्ग उभारण्यात येणार आहे. प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) आधीच सादर करण्यात आला असून, २०२६ ते २०३० या कालावधीत प्रत्यक्ष काम सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

66
तिसरी-चौथी मार्गिका की हायस्पीड रेल्वे?
Image Credit : Generated by google gemini AI

तिसरी-चौथी मार्गिका की हायस्पीड रेल्वे?

मुंबई–पुणे दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेचा प्रश्न अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. आता हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाल्यामुळे, हे नवीन ट्रॅक जुन्या प्रस्तावाचा भाग असतील की पूर्णपणे स्वतंत्र प्रकल्प म्हणून उभारले जातील, याबाबत लवकरच स्पष्टता अपेक्षित आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Marble Dining Table: रॉयल लुक, स्वच्छ करायला सोपं; पाहा लेटेस्ट डिझाइन्स
Recommended image2
Red Beads Anklet: विवाहित महिलांसाठी लाल मण्यांची 7 खास पैंजण डिझाइन्स
Recommended image3
Home gardening tips: आता फक्त 3 सोप्या पद्धतीने बाल्कनीत उगवा कमळ! जाणून घ्या...
Recommended image4
Gold Pearl Drop Earrings: दैनंदिन वापरासाठी बनवा पर्ल ड्रॉप इअररिंग्स
Recommended image5
ऑफिसमध्ये घालून पहा ब्रेसलेट मंगळसूत्र, लग्नात पाहुण्यांमध्ये पडेल छाप
Related Stories
Recommended image1
Budget 2026 : महाराष्ट्रावर अर्थसंकल्पातून ‘लक्ष्मीवर्षाव’; हायस्पीड रेल्वे, हजारो कोटींचे प्रकल्प जाहीर
Recommended image2
Tractor Subsidy Scheme: ट्रॅक्टर खरेदीसाठी 90% अनुदान! बचत गटांसाठी सुवर्णसंधी; अर्ज, पात्रता आणि कागदपत्रांची सविस्तर माहिती
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved