Jio OTT Pass: फक्त 200 रुपयांत 15 OTT फ्री, आता नेटफ्लिक्स-प्राइमचं टेन्शन नाही!
Jio OTT Pass: Reliance Jio ने एक नवीन 'OTT पास' लाँच केला आहे. यात फक्त 200 रुपयांमध्ये 15 प्रीमियम ओटीटी, 1000 पेक्षा जास्त लाइव्ह टीव्ही चॅनेल्स आणि अनलिमिटेड 5G डेटा मिळत आहे. जाणून घ्या या जबरदस्त प्लॅनबद्दल.

जिओचा नवा धमाका: फक्त 200 रुपयांत 15 OTT!
रिलायन्स जिओने एक जबरदस्त गुड न्यूज दिली आहे. OTT सबस्क्रिप्शनसाठी हजारो रुपये खर्च करून कंटाळलेल्या लोकांसाठी जिओने एक भन्नाट ऑफर बाजारात आणली आहे. कंपनीने फक्त 200 रुपयांमध्ये तब्बल 15 टॉप OTT ॲप्सचा ॲक्सेस देणारा 'जिओ ओटीटी पास' (Jio OTT Pass) लाँच केला आहे. बुधवारपासून ही ऑफर देशभरात उपलब्ध झाली आहे. महिन्याला जवळपास 1500 रुपये किमतीचे फायदे यात फक्त 200 रुपयांत मिळत आहेत.

YouTube प्रीमियमसह 15 OTT ॲप्स मोफत
या 200 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या OTT ॲप्सची यादी पाहून कुणीही चकित होईल. जाहिरातींशिवाय व्हिडिओ पाहण्यासाठी यामध्ये YouTube प्रीमियम सबस्क्रिप्शन दिलं आहे. यासोबतच, हॉलिवूड कंटेंट आणि लाइव्ह स्पोर्ट्ससाठी जिओ हॉटस्टार मोबाईल आणि ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ मोबाईल एडिशनचाही या पॅकमध्ये समावेश आहे. याशिवाय सोनी लिव्ह, झी5, लायन्सगेट प्ले, डिस्कव्हरी प्लस, सन नेक्स्ट, फॅनकोड, चौपाल, होईचोई यांसारख्या इतर 12 लोकप्रिय OTT ॲप्सचाही तुम्ही आनंद घेऊ शकता.
1000+ लाइव्ह चॅनेल्स आणि अनलिमिटेड डेटा
हा OTT पास फक्त सिनेमांपुरता नाही. JioTV ॲपद्वारे 1000 हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल्स मोफत पाहण्याची संधी मिळते. यात 150 हून अधिक पेड चॅनेल्स आहेत. जिओस्टार, सोनी नेटवर्क, सन टीव्ही नेटवर्क, वॉर्नर ब्रदर्स, ईटीव्हीचे सर्व प्रमुख एंटरटेनमेंट, स्पोर्ट्स आणि न्यूज चॅनेल्स लाइव्ह दिसतील. या प्लॅनमध्ये 30 जीबी हाय-स्पीड 4G/5G डेटा मिळतो. तसेच, तुमच्या बेस प्लॅनच्या व्हॅलिडिटीनुसार अनलिमिटेड 5G डेटाही वापरता येतो. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे.
अटी लागू: ऑफर कशी ॲक्टिव्हेट करायची?
हा जबरदस्त OTT पास ॲक्टिव्हेट करणं खूप सोपं आहे. तुम्ही तुमच्या फोनमधील MyJio ॲप, जिओची अधिकृत वेबसाइट किंवा जिओ रिटेल स्टोअरमधून रिचार्ज करू शकता. इतकंच नाही, तर गुगल पे, फोनपे सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सवरही हा प्लॅन उपलब्ध आहे. पण इथे एक छोटी अट आहे. हा 200 रुपयांचा OTT पास फक्त एक ॲड-ऑन पॅक आहे. म्हणजे, यातील फायदे मिळवण्यासाठी तुमच्या मोबाईल नंबरवर आधीपासून कोणताही एक ॲक्टिव्ह बेस रिचार्ज प्लॅन सुरू असणं आवश्यक आहे.

