MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • DMart Business Model : स्वस्तात सामान विकूनही हजारो कोटींचा नफा; काय आहे डी-मार्टचं बिझनेस सिक्रेट?

DMart Business Model : स्वस्तात सामान विकूनही हजारो कोटींचा नफा; काय आहे डी-मार्टचं बिझनेस सिक्रेट?

डी-मार्टमध्ये एवढ्या स्वस्तात सामान मिळूनही कंपनीला बक्कळ नफा कसा होतो? घाऊक खरेदी, मालाची वेगाने होणारी विक्री आणि खर्चावर नियंत्रण... हजारो कोटींचा नफा कमावणाऱ्या 'अव्हेन्यू सुपरमार्ट्स' कंपनीच्या यशाचं नेमकं गुपित काय आहे?

4 Min read
Author : Karishma R
Published : Oct 09 2026, 03:38 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
19
डी मार्टचं थक्क करणारं बिझनेस सिक्रेट!
Image Credit : Asianet News

डी-मार्टचं थक्क करणारं बिझनेस सिक्रेट!

आपण सुपर मार्केटमध्ये जातो, तेव्हा इतर दुकानांच्या तुलनेत काही वस्तू आपल्याला खूप स्वस्तात मिळतात. विशेषतः किराणा माल, साबण, बिस्किटे आणि खाद्यतेल खरेदी करण्यासाठी अनेकजण डी-मार्टला (D-Mart) पसंती देतात.

ग्राहकांना एवढ्या कमी किमतीत वस्तू देऊनही डी-मार्ट नफा कसा कमवतं? प्रत्येक वस्तू जास्त किमतीला विकूनच नफा मिळतो का? या प्रश्नांची उत्तरं कंपनीच्या बिझनेस स्ट्रॅटेजीमध्ये दडली आहेत. कमी किंमत, जास्त विक्री, खर्चावर कडक नियंत्रण आणि मालाची वेगाने होणारी विक्री (Inventory Turnover) हाच त्यांच्या यशाचा पाया आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
29
घाऊक खरेदीचा फायदा
Image Credit : Asianet News

घाऊक खरेदीचा फायदा

उत्पादकांकडून थेट आणि मोठ्या प्रमाणावर माल खरेदी करणं, ही डी-मार्टची सर्वात मोठी रणनीती आहे. समजा, एखादं छोटं दुकान साबणाचे फक्त १०० बॉक्स खरेदी करतं, तिथे डी-मार्टसारखी मोठी कंपनी हजारो बॉक्सची ऑर्डर देते. या मोठ्या ऑर्डरमुळे उत्पादक कंपनीला चांगला डिस्काउंट देतात. यामुळे खरेदीचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होतो.

उदाहरणार्थ, १०० रुपये खरेदी किंमत असलेली वस्तू डी-मार्ट घाऊक खरेदीमुळे ९५ रुपयांना घेतं आणि ९८ रुपयांना विकतं. तरीही त्यांना एका वस्तूमागे ३ रुपये नफा मिळतो आणि ग्राहकालाही ती वस्तू बाजारापेक्षा स्वस्तात मिळते. (हे फक्त समजण्यासाठी दिलेलं उदाहरण आहे; कंपनीचा थेट नफा असाच मोजला जात नाही).

Related Articles

Related image1
DMart Vs Reliance Smart Vs More : डीमार्ट, रिलायन्स की मोअर... महिन्याच्या किराणासाठी कोणतं बेस्ट?
Related image2
DMart Carry Bag : डीमार्टमध्ये कॅरी बॅगसाठी पैसे देताय? हा निकाल नक्की वाचा
39
कमी नफा, पण विक्रीचा आकडा मोठा
Image Credit : Gemini AI

कमी नफा, पण विक्रीचा आकडा मोठा

एका वस्तूवर १० रुपये नफा कमावण्यापेक्षा, कमी नफा ठेवून तीच वस्तू मोठ्या प्रमाणावर विकली तर एकूण नफा जास्त होतो, हे या कंपनीने सिद्ध केलंय. समजा, एका वस्तूवर ५ रुपये नफा मिळतोय. दिवसाला १०० वस्तू विकल्या तर ५०० रुपये, १००० वस्तू विकल्या तर ५,००० रुपये आणि १०,००० वस्तू विकल्या तर ५०,००० रुपये मिळतात. हा खर्चापूर्वीचा अंदाजित हिशोब आहे. कर्मचाऱ्यांचा पगार, वीज, वाहतूक यांसारखे खर्च वजा केल्यानंतरच निव्वळ नफा ठरतो.

49
सप्लायर्सना ताबडतोब पेमेंट
Image Credit : gemini ai

सप्लायर्सना ताबडतोब पेमेंट

माल पुरवणाऱ्या उत्पादकांना आणि वितरकांना त्यांचे पैसे कधी मिळतात, हे खूप महत्त्वाचं असतं. सप्लायर्सना वेगाने पेमेंट करणं, हा डी-मार्टच्या खरेदी धोरणाचा एक महत्त्वाचा भाग असल्याचं बिझनेस रिपोर्ट्स सांगतात.

पैसे लवकर मिळत असल्याने सप्लायर्स ते पैसे पुन्हा उत्पादनात गुंतवू शकतात. याच्या बदल्यात, मोठ्या ऑर्डर्स आणि त्वरित पेमेंटसाठी उत्पादक डी-मार्टला अतिरिक्त डिस्काउंट देतात. यामुळेच ग्राहकांना कमी किमतीत वस्तू विकणं कंपनीला शक्य होतं.

59
दुकानाच्या खर्चावर कडक नियंत्रण
Image Credit : DMart

दुकानाच्या खर्चावर कडक नियंत्रण

सुपर मार्केटच्या व्यवसायात माल खरेदी करण्याव्यतिरिक्त दुकानाचं भाडं, कर्मचाऱ्यांचा पगार, वीज, इंटिरिअर आणि वाहतूक यांसारख्या खर्चाचा थेट परिणाम नफ्यावर होतो.

डी-मार्ट अनेक ठिकाणी स्वतःच्या मालकीच्या इमारती वापरतं. स्वतःच्या इमारतींमुळे भाड्याचा खर्च वाचतो, तरीही देखभाल आणि कराचा खर्च असतोच. पण डी-मार्ट दुकानात भपकेबाज सजावट करत नाही. वस्तूंची मांडणी आणि जागेचा योग्य वापर करून ते खर्चात मोठी बचत करतात.

69
मालाची वेगाने विक्री (Inventory Turnover)
Image Credit : Gemini AI

मालाची वेगाने विक्री (Inventory Turnover)

दुकानात माल जास्त काळ पडून राहिला, तर गुंतवलेला पैसा अडकून पडतो. शिवाय साठवणुकीचा खर्च वाढतो आणि माल खराब होण्याची किंवा एक्सपायर होण्याची भीती असते.

डी-मार्ट रोजच्या गरजेच्या वस्तू वेगाने विकतं आणि लगेच नवीन माल आणतं. यामुळे पैसा व्यवसायात वेगाने फिरतो. उदाहरणार्थ, १ लाख रुपयांचा माल वेगाने विकून त्याच पैशातून पुन्हा नवीन माल खरेदी केला जातो. कोणत्या वस्तू वेगाने विकल्या जातात आणि कोणत्या पडून राहतात, यावर कंपनी बारकाईने लक्ष ठेवते.

79
स्वतःच्या ब्रँड्सचा (Private Labels) वाटा
Image Credit : Asianet News

स्वतःच्या ब्रँड्सचा (Private Labels) वाटा

डी-मार्टमध्ये त्यांच्या स्वतःच्या ब्रँडच्या (Private Labels) अनेक वस्तू विकल्या जातात. विशेषतः किराणा माल, धान्य आणि घरगुती वापराच्या वस्तूंमध्ये हे ब्रँड्स पाहायला मिळतात.

अशा उत्पादनांमुळे मध्यस्थांचा खर्च वाचतो आणि किमतीवर कंपनीचं नियंत्रण राहतं. अर्थात, यात पॅकेजिंग, क्वालिटी कंट्रोल, वाहतूक आणि उत्पादनाचा खर्चही समाविष्ट असतो.

89
आर्थिक वर्ष २०२५-२६: कंपनीचा खरा नफा किती?
Image Credit : Gemini AI

आर्थिक वर्ष २०२५-२६: कंपनीचा खरा नफा किती?

डी-मार्ट चालवणाऱ्या 'अव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड' (Avenue Supermarts Limited) च्या २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालानुसार:

कंपनीचा एकूण महसूल (Revenue from Operations) सुमारे ६६,९६८ कोटी रुपये आहे.

कर भरल्यानंतरचा नफा (Profit After Tax - PAT) सुमारे ३,२२४ कोटी रुपये आहे.

नफ्याचं प्रमाण (PAT Margin) - सुमारे ४.८%

म्हणजेच, प्रत्येक १०० रुपयांच्या महसुलामागे कंपनीने कर भरल्यानंतर सुमारे ४.८० रुपये नफा कमावला आहे. हा संपूर्ण कंपनीच्या हिशोबावर आधारित दर आहे, प्रत्येक वस्तूमागे ४.८० रुपये नफा मिळतो असा याचा अर्थ होत नाही.

99
व्यवसायापुढील नवी आव्हाने
Image Credit : X

व्यवसायापुढील नवी आव्हाने

फक्त कमी किमतीत वस्तू विकून कायमस्वरूपी यश मिळत नाही. ग्राहकांच्या खरेदीच्या सवयी बदलणं, स्पर्धक कंपन्यांचे डिस्काउंट्स, कर्मचारी आणि वाहतुकीचा वाढता खर्च, नवीन शाखा उघडण्यासाठी लागणारी गुंतवणूक या गोष्टी नफ्यावर परिणाम करतात.

विशेषतः अलीकडच्या काळात वेगाने वाढणाऱ्या 'क्विक कॉमर्स' (Quick Commerce) म्हणजेच १० मिनिटांत डिलिव्हरी देणाऱ्या कंपन्यांमुळे पारंपारिक सुपर मार्केटला मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

डी-मार्टचं यश एका रात्रीत मिळालेलं नाही. मोठी खरेदी, सप्लायर्ससोबतचे चांगले आर्थिक संबंध, मालाची वेगाने विक्री, खर्चावर नियंत्रण आणि स्वतःची उत्पादने या सगळ्या गोष्टींमुळेच कंपनीने हे यश मिळवलं आहे. एका वस्तूवर जास्त नफा न शोधता, अनेक वस्तू सतत विकून आणि प्रत्येक खर्चावर बारकाईने नियंत्रण ठेवून एखादी कंपनी कशी मोठी होऊ शकते, याचं डी-मार्ट हे उत्तम उदाहरण आहे.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Amazon Laptop Deals : ५० हजारांच्या आत मिळतायत टॉप ५ लॅपटॉप, SBI कार्डवर बंपर डिस्काउंट
Recommended image2
Jeff Bezos : AI मुळे नोकऱ्या जातील का? जेफ बेझोस म्हणतात, 'भविष्यात आठवड्यातून फक्त 3 दिवस काम करावं लागेल'
Recommended image3
iPhone 18 Pro : आयफोन 18 प्रो ची डिमांड घटली? ॲपलने कमी केल्या ऑर्डर्स, शेअर्सही घसरले
Recommended image4
Credit Card : क्रेडिट कार्डवर मिळणारे '45 दिवसांचे फ्री टाइम' खरंच फायद्याचे असते का? हे नक्की जाणून घ्या
Recommended image5
Indian Railway Child Ticket Rules : ट्रेनमध्ये लहान मुलांसाठी 50% तिकीट... वयाची अट माहितीये का?
Related Stories
Recommended image1
DMart Vs Reliance Smart Vs More : डीमार्ट, रिलायन्स की मोअर... महिन्याच्या किराणासाठी कोणतं बेस्ट?
Recommended image2
DMart Carry Bag : डीमार्टमध्ये कॅरी बॅगसाठी पैसे देताय? हा निकाल नक्की वाचा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved