- Home
- Utility News
- Jan Dhan account: जनधन खातेदारांसाठी महत्त्वाची सूचना!, 30 सप्टेंबरपूर्वी हे काम न केल्यास खाते होऊ शकते बंद
Jan Dhan account: जनधन खातेदारांसाठी महत्त्वाची सूचना!, 30 सप्टेंबरपूर्वी हे काम न केल्यास खाते होऊ शकते बंद
Jan Dhan account: 10 वर्षे पूर्ण झालेल्या जनधन खातेधारकांना 30 सप्टेंबर 2025 पूर्वी री-केवायसी (Re-KYC) करणे अनिवार्य आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास खाते गोठवले जाऊ शकते, ज्यामुळे सरकारी योजनांचे लाभ थांबतील.

जनधन खातेधारकांनो हे काम लगेच पूर्ण करा
Jan Dhan account: तुमचे जनधन खाते 10 वर्षांचे पूर्ण होत असल्यास, तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार, 30 सप्टेंबर 2025 पूर्वी तुम्ही री-केवायसी (Re-KYC) प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर तुमचे जनधन खाते गोठवले जाऊ शकते. म्हणजेच खात्यातून पैसे काढणे, भरवणे, किंवा सरकारी योजनांचे लाभ मिळवणे बंद होऊ शकते.
री-केवायसी का आवश्यक आहे?
री-केवायसी म्हणजे बँकेकडे तुमची माहिती जसे की पत्ता, मोबाईल नंबर, ओळखपत्र इत्यादी अपडेट करणे. यामुळे खात्याचा वापर योग्य व्यक्ती करत आहे याची खातरजमा केली जाते आणि फसवणुकीपासून संरक्षण मिळते.
कुठे आणि कसे कराल Re-KYC?
सरकारने 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2025 दरम्यान प्रत्येक ग्रामपंचायतीत विशेष केवायसी शिबिरे आयोजित केली आहेत. या शिबिरांमध्ये खातेदार फक्त आधार कार्ड आणि पत्त्याचा पुरावा घेऊन जाऊ शकतात आणि री-केवायसी सहज पूर्ण करू शकतात.
री-केवायसी न केल्यास काय होईल?
खाते सुस्पंक्त (inactive) होऊ शकते
सरकारी सबसिडी किंवा योजना थांबू शकतात
रुपे डेबिट कार्ड वापर करता येणार नाही
खाते पुन्हा सुरू करण्यासाठी प्रक्रिया गुंतागुंतीची होऊ शकते
केवायसी केल्यावर मिळणारे लाभ
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY)
वार्षिक ₹330 शुल्कात ₹2 लाखांचा जीवन विमा
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY)
वार्षिक फक्त ₹12 मध्ये ₹2 लाख अपघात विमा
अटल पेन्शन योजना (APY)
वृद्धापकाळात ₹1,000 ते ₹5,000 पर्यंत मासिक पेन्शनची सुविधा
जनधन योजनेचे अन्य फायदे
शून्य बॅलेन्स खाते उघडण्याची सुविधा
बचतीवर व्याज मिळते
रुपे डेबिट कार्डसह अपघात विमा (₹1-2 लाख पर्यंत)
ओव्हरड्राफ्ट सुविधा ₹10,000 पर्यंत
सरकारी अनुदान थेट खात्यात जमा (DBT प्रणालीद्वारे)
30 सप्टेंबरपूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण करा!
पंतप्रधानांनी 2 ऑगस्ट 2025 रोजी सांगितले की, देशात आजवर 55 कोटी जनधन खाती उघडण्यात आली आहेत. यातील लाखो खातेदारांनी यशस्वीरित्या Re-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे. तुम्हीही वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करून तुमचे खाते सुरक्षित व सक्रिय ठेवा आणि सरकारी योजनांचा संपूर्ण लाभ घ्या.

