सार

ISRO Job Offer : इस्रोमध्ये नोकरी करण्याची संधी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण इस्रोमध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी नोकर भरती केली जात आहे. या नोकरीसाठी अर्ज कसा करायचा, पात्रता काय याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

ISRO Job Offer :  भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो, केरळमधील तिरुवनंतपुरम येथे लिक्विड प्रोपल्शन सिस्टिम सेंटरअंतर्गत वेगवेगळ्या पदांवर नोकर भरती केली जामार आहे. या नोकर भरतीनुसार वेल्डर, फिटर, मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल, टर्नर, मशीनिस्ट, हेव्ही व्हिकल ड्रायव्हर 'ए' सह अन्य काही पदांवर एकूण 30 जागांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यामुळे इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना नोकरीचा अर्ज इस्रोची अधिकृत वेबसाइट https.www.isro.gov.in येथे भेट द्यावी लागेल.

अर्ज प्रक्रियेसाठी महत्वाच्या तारखा

  • अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख - 27 ऑगस्ट, 2024
  • अर्ज प्रक्रियेची अखेरची तारीख - 10 सप्टेंबर, 2024

नोकरीसाठी वेतन

निवड केलेल्या उमेदवारांना नोकरीसाठी पद आणि योग्यतेनुसार 1,42,000 रुपयांपर्यंत वेतन मिळण्याची शक्यता आहे.

असा करा अर्ज

  • सर्वप्रथम इस्रोची अधिकृत वेबसाइट https.www.isro.gov.in  येथे भेट द्या
  • होमपेजवर आपला मोबाइल क्रमांक आणि अन्य माहिती द्या
  • रजिस्टर आयडी आणि पासवर्ड तयार होईल
  • आयडी आणि पासवर्डचा वापर करुन अर्ज प्रक्रिया सुरु करा
  • अर्जासाठी मागितलेली कागदपत्रे सादर करत अपलोड करा
  • अर्ज भरल्यानंतर ऑनलाइन शुल्क भरावा लागेल
  • अर्जाचे पेमेंट केल्यानंतर डाउनलोड करून ठेवा

शैक्षणिक योग्यता

  • टेक्निकल पदासाठी उमेदवाराकडे मॅकेनिकल इंजिनिअरिंगमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा प्रथम श्रेणी असावी.एनसीवीटीमध्ये वेल्डर ट्रेडमध्ये एसएसएलसी/एसएससी उत्तीर्ण असावे.
  • भारी वाहन चालक 'ए' पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड अथवा संस्थेतून 10 वी परिक्षा उत्तीर्ण असावी. याशिवाय पाच वर्षांचा अनुभव असावा. यामध्येही कमीत कमी 3 वर्षांचा भारी वाहन चालकाचा अनुभव ग्राह्य धरला जाईल. उमेदवाराकडे एचवीडी परवाना आणि पब्लिक सर्विस बॅचही असावा.
  • लाइट व्हिकल ड्रायव्हर 'ए' पदासाठी उमेदवाराचे 10 वी शिक्षण पूर्ण असावे. उमेदवाराकडे लाइट व्हिकल ड्रायव्हरच्या रुपात तीन वर्षांचा अनुभव असावा. याशिवाय वैध एलवीडी परवाना असावा.
  • कुक पदासाठी उमेदावाराने SSLC/SSC उत्तीर्ण असावे. कोणत्याही प्रतिष्ठित हॉटेल, कँटीनमध्ये कुकच्या रुपात पाच वर्षे काम केल्याचा अनुभव असावा.
  • मॅकेनिस्ट, फिटर, इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक आणि टर्नरच्या पदासाठी उमेदवाराचे 10 वी शिक्षण पूर्ण असावे. याशिवाय संबंधित ट्रेडमध्ये आयटीआयचे प्रमाणपत्र असावे. या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे वयोगटातील असावे.

आणखी वाचा : 

युनिफाइड पेन्शन योजना म्हणजे काय?, कोणाला मिळणार लाभ; मंत्रिमंडळाने दिली मंजूरी

5 वर्षापर्यंतच्या मुलांचे Aadhar Card असे करा ऑनलाइन अपडेट