5 वर्षापर्यंतच्या मुलांचे Aadhar Card असे करा ऑनलाइन अपडेट

| Published : Aug 24 2024, 08:45 AM IST / Updated: Aug 24 2024, 08:46 AM IST

Baal Aadhar Card Update

सार

सध्या आधार कार्ड भारतीय नागरिकाचे ओखळपत्र झाले आहे. अशातच लहान मुलं ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाचे आधार कार्ड काढले जाते. 5 वर्षापर्यंतच्या मुलांचे आधार कार्ड ऑनलाइन पद्धतीने कसे अपडेट करायचे याबद्दल जाणून घेऊया.

Baal Aadhar Card Online Update : वयाच्या 5 वर्षापर्यंतच्या मुलांचे ऑनलाइन पद्धतीने आधार कार्ड अपडेट करण्याची थेट अशी प्रक्रिया नाही. कारण लहान मुलांच्या बायोमेट्रिक डेटामध्ये सातत्याने बदल होत असतो. खरंतर, 5 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांना जारी केल्या जाणाऱ्या आधार कार्डला बाल आधार कार्ड असे म्हटले जाते. हे आधार कार्ड निळ्या रंगात असते.

बाल आधार कार्डवर 12 अंकांचा एक खास क्रमांक असतो. मुलाचे आधार कार्ड आई अथवा वडिलांच्या आधार कार्डसंबंधित असते. याशिवाय लहान मुलांच्या आधार कार्डसाठी कोणत्याही बायोमेट्रिक डेटाची गरज नसते. बाल आधार कार्डच्या माध्यमातून खातेधारक मुलं आणि त्याच्या आई-वडिलांना काही सुविधा मिळतात.

बाल आधार कार्डसाठी लागणारी कागदपत्रे

  • बाळाचा जन्मदाखला
  • रुग्णालयातून डिस्चार्ज केलेल सर्टिफिकेट
  • शाळेचे आयडी कार्ड

आई-वडिलांपैकी एकाचे आधार कार्ड, मतदान कार्ड, वाहन परवाना अथवा पासपोर्ट अशाकाही प्रमाणपत्राची आवश्यकता असते. निवासी पत्त्याच्या रुपात वीज बिल, आधार कार्डचा वापर केला जाऊ शकतो. बाल आधार कार्ड पाच वर्षांपर्यंत वैध असते. वयाच्या पाचव्या वर्षानंतर आधार कार्ड अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी बायोमॅट्रिक डेटाची आवश्यकता असते. यानंतर 15 वर्षांचे झाल्यानंतर पुन्हा आपला बायोमॅट्रिक डेटा अपडेट करावा लागतो.

ऑनलाइन अपडेट प्रक्रिया

  • सर्वप्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट देत तेथे Log In वर क्लिक करा
  • बाल आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड दाखल करत Send OTP वर क्लिक करा
  • फोनवर आलेला OTP द्या आणि Log In वर क्लिक करा
  • कागदपत्रे अपडेच करण्याच्या पर्यायावर क्लिक करा
  • डेमोग्राफिक डिटेल्स पडताळून पाहा आणि ओखळपत्र व पत्त्याच्या वेरिफिकेशनसाठी नवे कागदपत्र अपलोड करा.

बाल आधार कार्डसाठी ऑफलाइन पद्धत
घराजवळच्या आधार केंद्रावर जाऊन बाल आधार कार्डमध्ये अपडेट करू शकता. यासाठी तुम्हाला एक अर्जाचा फॉर्म दिला जाईल. फॉर्म भरल्यानंतर आई-वडिलांचे आधार कार्ड आणि मुलाचा जन्मदाखला अर्जासोबत जोडावा लागेल. मुलाचा जन्मदाखला नसल्यास त्याचे रुग्णालयातून डिस्चार्ज केल्याचे सर्फिकेट अथवा शाळेच्या आयडी कार्डचा वापर करता येऊ शकतो.

अर्जासह आई-वडिलांच्या आधार कार्डची माहिती आणि मोबाईल क्रमांक देखील द्यावा लागेल. अर्जाच्या फॉर्मवर आई अथवा वडिलांपैकी एकाने स्वाक्षरी करावी. यानंतर पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुलाचा फोटो लावला जाईल. याबद्दलचे अपडेट्स पालकांना त्यांच्या मोबाइल क्रमांकावर दिले जातील.

आणखी वाचा : 

Instagram प्रोफाइलवर फोटोसोबत म्युझिक लावता येणार, पाहा ट्रिक

Whatsapp Update: मोबाईल नंबरशिवाय वापरा व्हॉट्सॲप, प्रायव्हसीसाठी नवे फीचर्स!