- Home
- Utility News
- Big Change By IRCTC: IRCTC चा धक्कादायक नियम बदल! नो मील पर्याय हटला, प्रवाशांना भरावे लागणार अतिरिक्त पैसे
Big Change By IRCTC: IRCTC चा धक्कादायक नियम बदल! नो मील पर्याय हटला, प्रवाशांना भरावे लागणार अतिरिक्त पैसे
Big Change By IRCTC: IRCTC ने वंदे भारत, शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेसच्या तिकीट बुकिंगमध्ये बदल केला आहे, ज्यामुळे 'नो मील' पर्याय निवडणे कठीण झाले आहे. यामुळे प्रवाशांना जेवण नको असले तरी अतिरिक्त शुल्क भरावे लागत आहे.

प्रवाशांना मोठा झटका! IRCTC चा 'नो मील' पर्याय गायब?
मुंबई: भारतीय रेल्वेच्या प्रीमियम गाड्यांमधून प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आयआरसीटीसी (IRCTC) ने आपल्या तिकीट बुकिंग प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. या नव्या निर्णयामुळे वंदे भारत, शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेसमधील प्रवाशांच्या खिशावर आता 300 ते 400 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त भार पडणार आहे. आता प्रवास करताना तुम्ही “नो मील” किंवा “नो फूड” हा पर्याय निवडू शकत नाही. म्हणजेच, जेवण घ्यायचं नसेल तरीही तुम्हाला जेवणासह तिकीट खरेदी करावं लागणार आहे.
जेवण नको तरी द्यावे लागतील पैसे!
पूर्वी आयआरसीटीसीच्या वेबसाइट आणि मोबाईल ॲपवरून तिकीट बुक करताना प्रवाशांना “नो मील” हा पर्याय उपलब्ध होता. त्यामुळे ज्यांना प्रवासादरम्यान रेल्वेचं जेवण नको होतं, ते फक्त सीटसाठी पैसे भरू शकत होते. मात्र आता हा पर्याय बुकिंग पेजवरून गायब झाल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. अनेक प्रवाशांना आता अनावश्यकपणे 300 ते 400 रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागत आहे.
प्रवाशांचा संताप सोशल मीडियावर
या निर्णयानंतर प्रवाशांनी सोशल मीडियावर आयआरसीटीसीवर “प्रवाशांची फसवणूक” केल्याचा आरोप केला आहे. एका प्रवाशाने “मी फक्त तीन तासांसाठी प्रवास करत आहे, तरीही मला जेवणासह तिकीट खरेदी करावं लागलं! हा प्रवाशांच्या खिशावरचा दरोडा आहे,” अशी तिखट प्रतिक्रिया एक्स (Twitter) वर दिली आहे.
रेल्वे प्रशासनाचं स्पष्टीकरण
या वादावर अखेर रेल्वे प्रशासनानं स्पष्टीकरण दिलं आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, “नो मील” हा पर्याय पूर्णपणे हटवलेला नाही, तर तो बुकिंग पेजवर थोडा खाली हलवण्यात आला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, “हा पर्याय अजूनही उपलब्ध आहे, मात्र अनेक प्रवाशांना तो लगेच दिसत नाही. पृष्ठ थोडं स्क्रोल केल्यास तो सापडतो,” असं त्यांनी सांगितलं.
प्रवाशांसाठी महत्त्वाचं
तिकीट बुक करताना “मील ऑप्शन” विभाग नीट तपासा.
पेज स्क्रोल करून “नो मील” पर्याय शोधा.
अन्यथा तुमचं तिकीट जेवणासह बुक होईल आणि अतिरिक्त शुल्क आकारलं जाईल.

