Instagram प्रोफाइलवर फोटोसोबत म्युझिक लावता येणार, पाहा ट्रिक

| Published : Aug 23 2024, 04:24 PM IST

Instagram

सार

Instagram Tricks : इंस्टाग्रामवर आता युजर्सला प्रोफाइल फोटोसोबत म्युझिक अथवा एखादे गाणे लावता येणार आहे. यासाठी खास ट्रिक जाणून घेऊया.

इंस्टाग्राम सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सर्वाधिक प्रसिद्ध प्लॅटफॉर्म मानले जाते. वेळोवेळी इंस्टाग्रामकडून युजर्ससाठी नवे फीचर रोलआउट केले जातात. अशातच इंस्टाग्रामने युजर्ससाठी एक नवे फीचर आणले आहे. यानुसार युजरला आपल्या प्रोफाइल फोटोवर एखादे म्युझिक अथवा पसंतीचे गाणे लावता येणार आहे.

प्रोफाइल फोटोसोबत म्युझिक लावता येणार
इंस्टाग्रामवर युजरला प्रोफाइलसोबत म्युझिकही लावता येणार आहे. इंस्टाग्रामच्या Bio च्या येथे प्रोफाइलवर गाणे लावण्याचे फीचर दिसेल. याशिवाय दुसरे गाणे लावणे अथवा आधीचे गाणे डिलीट करण्याचा पर्याय देखील युजर्सला मिळणार आहे. मायस्पेस अ‍ॅपमध्ये प्रोफाइलवर गाणे लावण्याचे फीचर आधीपासून देण्यात आले आहे. पण मायस्पेसारखे इंस्टाग्रामवर गाणे ऑटोप्ले होणार नाही. यासाठी युजर्सला प्रोफाइलवर क्लिक करुन गाणे ऐकावे आणि पोस्ट करावे लागणार आहे.

असे लावा गाणे
इंस्टाग्रामवर Edit Profile ऑप्शनवर जाऊन तेथून गाणे प्रोफाइलवर लावता येणार आहे. यासाठी इंस्टाग्राम लायब्रेरीमध्ये आपल्या पसंतीचे गाणे निवडा. लायब्रेरीमध्ये रिल्स आणि पोस्टसाठी गाणी मिळतात. प्रोफाइलर केवळ 30 सेकंदाचे गाणे लावू शकता. सध्या इंस्टाग्रामवर गाणे लावण्याचे ऑप्शन दिसून येत आहे.

इंस्टाग्रामवरील गाणे तुम्ही डिलिट करत नाही तोवर ते प्रोफाइलवर दिसत राहणार आहे. म्युझिक संदर्भात आणखी एक फीचर इंस्टाग्रामवर आणले. यानुसार रीलमध्ये 20 ट्रॅक जोडण्याचा ऑप्शन होता. याशिवाय रिपोर्ट्सनुसार, मेटा इंस्टा युजरच्या फीडच्या स्ट्रक्चरमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करत आहे.

आणखी वाचा : 

Whatsapp Update: मोबाईल नंबरशिवाय वापरा व्हॉट्सॲप, प्रायव्हसीसाठी नवे फीचर्स!

Jio कडून नवा रिचार्ज प्लॅन लाँच, 75 रुपयांत मिळणार अनलिमिडेट कॉल-डेटा