Flying Taxi : आता ट्रॅफिकची चिंता सोडा! भारताची पहिली 'उडणारी' इलेक्ट्रिक टॅक्सी
शहरातल्या ट्रॅफिक जामला आता कंटाळायची गरज नाही. IIT मद्रासच्या एका स्टार्टअप'ने भारताची पहिली इलेक्ट्रिक एअर टॅक्सी 'e200X' सादर केली आहे. लवकरच आकाशातून वेगवान प्रवास शक्य होणार आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
15

Image Credit : Chatgpt
पायलटशिवाय उडणारी एअर टॅक्सी आली
शहरात गाडी रस्त्यावर काढली की तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकायला होतं. पण आता या समस्येवर लवकरच तोडगा निघणार आहे. चेन्नईच्या IIT मद्रासच्या 'द ई-प्लेन कंपनी' (The ePlane Company) या स्टार्टअप'ने भारताची पहिली इलेक्ट्रिक एअर टॅक्सी 'e200X - PT01' सादर केली आहे. IIT मद्रासच्या डिस्कव्हरी कॅम्पसमधील 60,000 चौरस फुटांच्या नवीन युनिटमध्ये हे विमान सादर करण्यात आलं. यामुळे शहरांमधील प्रवासाचा वेळ तर कमी होईलच, पण भारतीय विमान वाहतुकीतही मोठी क्रांती घडेल.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source

25
Image Credit : Chatgpt
हेलिकॉप्टरसारखं वर जाणार, विमानासारखं सुसाट धावणार
या फ्लाइंग टॅक्सीची खासियत म्हणजे, ती हेलिकॉप्टरप्रमाणे सरळ वर उडू शकते आणि हवेत गेल्यावर विमानासारखा वेग पकडते. याच्या टेक-ऑफ आणि लँडिंगसाठी मोठ्या विमानतळाची गरज नाही. फक्त 8x11 मीटर जागा, म्हणजे बास्केटबॉल कोर्टाच्या निम्म्या जागेतही हे विमान उतरू शकतं. त्यामुळे हॉस्पिटलच्या छतावर किंवा हेलिपॅडवरही याचा वापर करता येईल.
35
Image Credit : Gemini
रेंज किती? सुरक्षा कशी आहे?
या एअरक्राफ्टचं वजन सुमारे 2.2 टन आहे. एकदा चार्ज केल्यावर ते जवळपास 110 किलोमीटरपर्यंत उडू शकतं. म्हणजे मुंबई ते पुणे किंवा चेन्नई ते पुद्दुचेरीसारखं अंतर काही मिनिटांतच कापता येईल. सुरक्षेच्या बाबतीतही कंपनीने कोणतीही तडजोड केलेली नाही. यात 6 लिफ्ट रोटर आणि 4 फॉरवर्ड प्रोपेलर आहेत. प्रवासात एखादी मोटर किंवा पंखा खराब झाला, तरी बाकीचे पंखे विमान सुरक्षितपणे नियंत्रणात ठेवतात.
45
Image Credit : Gemini
सुरुवात एअर ॲम्ब्युलन्स म्हणून होणार
'ई-प्लेन कंपनी'चे संस्थापक आणि IIT मद्रासचे प्राध्यापक सत्य चक्रवर्ती यांनी सांगितलं की, सुरुवातीला या एअर टॅक्सीचा वापर 'एअर ॲम्ब्युलन्स' म्हणून केला जाईल. ट्रॅफिकमुळे रुग्णालयात पोहोचायला उशीर होतो, अशावेळी गंभीर रुग्णांना एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये काही मिनिटांत पोहोचवण्यासाठी याचा खूप उपयोग होईल. त्यानंतरच सामान्य प्रवाशांसाठी ही सेवा सुरू होईल. यात एका पायलटसोबत 200 किलोपर्यंतचं सामान नेता येऊ शकतं.
55
Image Credit : Gemini
पहिल्या प्रवासात पायलट नसणार.. पण का?
सुरक्षेच्या कठोर नियमांमुळे, या एअरक्राफ्टची सुरुवातीची चाचणी उड्डाणं पायलटशिवाय केली जाणार आहेत. 'फ्लाय-बाय-वायर' या आधुनिक तंत्रज्ञानामुळे पायलटशिवाय चाचणी करणं पूर्णपणे सुरक्षित असल्याचं प्रा. चक्रवर्ती यांनी सांगितलं. सर्व सुरक्षा चाचण्या यशस्वी होईपर्यंत यात माणसांना बसवलं जाणार नाही. इंडिगोचे माजी अध्यक्ष आणि 'ई-प्लेन'च्या बोर्डाचे सदस्य आदित्य घोष यांच्या मते, या विमानाची ग्राउंड टेस्टिंग पुढच्या वर्षी सुरू होईल. 2027 च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत उड्डाण चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे. DGCA कडून सर्व परवानग्या मिळाल्यानंतर, पुढील 3 ते 5 वर्षांत ही टॅक्सी व्यावसायिक वापरासाठी बाजारात येईल. कंपनीला आतापर्यंत 800 पेक्षा जास्त विमानांच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत आणि गुंतवणूकदारांकडून 21.5 मिलियन डॉलर्सचा निधीही मिळाला आहे.

