ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये उबर कॅब ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने आपल्या एका दिवसाच्या कमाईचा तपशील सोशल मीडियावर शेअर केला आहे. सुमारे 10 तास काम करून त्याने कमावलेली रक्कम पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत.
डोके असेल तर पानांवरही जगता येते, अशी एक म्हण आहे. हुशार व्यक्ती कुठेही कष्ट करून जगू शकते. काम करण्याची इच्छा असेल तर आयुष्य हजारो मार्ग दाखवते. त्याचप्रमाणे, एका तरुणाने कॅब ड्रायव्हर म्हणून काम करून फक्त एका दिवसात किती पैसे कमावले, हे सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्याची ही पोस्ट आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. tusharbareja नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला असून, ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये उबर कॅब चालवून कमावलेल्या पैशांबद्दल सांगितले आहे.
मेलबर्नमध्ये 10 तास UberX चालवण्याचा हा खरा अनुभव आणि खरे उत्पन्न आहे. दिवसभर ड्रायव्हिंग करणे कसे असते हे मी येथे दाखवत आहे. हे फायदेशीर आहे की नाही? शेवटपर्यंत पाहा, असे लिहून त्याने व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये त्याला दिवसभरात मिळालेल्या भाड्याचा तपशील आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याने आपल्या दिवसाची सुरुवात पहाटे 4 वाजता केली. त्यावेळी त्याच्या स्थानिक परिसरात प्रवास करणे कठीण असल्याने, त्याने आधी शहराच्या दिशेने गाडी चालवली.
शहरातून बरेजा विमानतळावर गेला. तिथे त्यांनी 47 ऑस्ट्रेलियन डॉलर्स (सुमारे 2,600 रुपये) कमावले. सकाळी 7 वाजेपर्यंत त्याची एकूण कमाई 98 ऑस्ट्रेलियन डॉलर्स (सुमारे 5,400 रुपये) झाली होती. त्यानंतर गाडीत इंधन भरल्यानंतर, रस्त्यावर उतरण्यापूर्वी त्याने सँडविचसह नाश्ता करण्यासाठी थोडा ब्रेक घेतला.
यानंतर त्याला 25 ऑस्ट्रेलियन डॉलर्सची (सुमारे 1,400 रुपये) आणखी एक ट्रिप मिळाली. अशाप्रकारे त्याने दिवसभर गाडी चालवणे सुरू ठेवले. सुमारे 10 तासांच्या कामानंतर, बरेजाने किराणा मालाची खरेदी करून आपल्या दिवसाची शिफ्ट संपवली. त्या एका दिवसात त्याची एकूण कमाई 330 ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे 18,200 रुपये होती, असे त्याने व्हिडिओमध्ये उघड केले आहे.
मेलबर्नमध्ये 12 तास UberX चालवणे. खरा अनुभव. खरे उत्पन्न. चाकाच्या मागे एक पूर्ण दिवस कसा दिसतो हे शेअर करत आहे, असे त्याने लिहिले आहे. बरेजाने स्वतःला दिलेले 12 तासांचे आव्हान पूर्ण करण्याचा विचार केला होता, पण तो खूप थकल्यामुळे त्याने फक्त 10 तासांतच त्या दिवसाचे काम संपवले. तुषार बरेजा हा एक कंटेंट क्रिएटर असून तो ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये राहतो आणि सोशल मीडियावर आपले अनुभव शेअर करत असतो. त्याने शेअर केलेला हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल झाला असून, त्यावर अनेक कमेंट्स येत आहेत. आम्हालाही ऑस्ट्रेलियाला यायचे आहे, अशी कमेंट अनेकांनी केली आहे. भारतात एका महिन्याचा पगारही एवढा मिळत नाही, असे एकाने म्हटले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, कमेंट करून सांगा.

