Viral News : चीनमध्ये राहणाऱ्या एका विवाहित व्यक्तीचे एका महिलेवर प्रेम होते. त्यांच्यात जवळीक वाढली, जवळीकीच्या सीमा ओलांडल्या गेल्या. पण पुढे जे घडले त्याची आता सर्वत्र चर्चा होत आहे.

Viral News : एक प्रसिद्ध म्हण आहे. "प्रेम आणि कस्तुरी लपवता येत नाही." आम्ही आपणांस हे का सांगत आहोत, ते तुम्हाला पुढे कळेलच. चीनमध्ये राहणाऱ्या एका विवाहित व्यक्तीचे एका महिलेवर प्रेम होते. त्यांच्यात जवळीक वाढली, जवळीकीच्या सीमा ओलांडल्या गेल्या. सर्व काही ठीक चालले होते. पण दरम्यान, कथेत एक ट्विस्ट आला. पुढे जे घडले त्याची आता सर्वत्र चर्चा होत आहे. 

ही घटना चीनच्या झेजियांग प्रांतात घडली आहे. मिरर यूकेच्या वृत्तानुसार, एक व्यक्ती आपल्या प्रेयसीसोबत हॉटेलच्या खोलीत असताना त्याची पत्नी तिथे पोहोचली. पत्नीपासून वाचण्यासाठी त्याने खिडकीतून उडी मारली आणि हॉटेलच्या इमारतीला धरून तो लटकत होता. हे दृश्य पाहून प्रत्येकजण क्षणभर घाबरला. कारण त्या व्यक्तीचा थोडा जरी तोल गेला असता, तर त्याचा मृत्यू झाला असता. अखेर या घटनेमागील कारण समोर आल्यावर लोकांना हसू आवरता आले नाही.

करायला गेलो एक अन् झाले भलतेच -

रिपोर्ट्सनुसार, एक विवाहित पुरुष आपल्या प्रेयसीसोबत झेजियांग प्रांतातील बोयू हॉटेलमध्ये आला होता. काही वेळाने त्याची पत्नीही तिथे पोहोचली. पत्नीपासून वाचण्यासाठी दुसरा मार्ग न दिसल्याने, ती व्यक्ती हॉटेलच्या खोलीच्या खिडकीतून बाहेर पडून त्याच हॉटेलच्या फलकाला धरून लटकत होती. त्याने फक्त बॉक्सर घातली होती. हॉटेलमधील इतर पाहुण्यांनी आपल्या खिडकीतून हे सर्व पाहिले. दरम्यान, कोणीतरी ही घटना कॅमेऱ्यात कैद केली आणि चार भिंतीआड राहणारी गोष्ट आता संपूर्ण जगाने पाहिली.

सोशल मीडियावर जोक्स व्हायरल -

या व्यक्तीची आता सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. एका युझरने उपहासाने म्हटले की, "हे अवैध संबंधांचे परिणाम आहेत. अशा कामांमध्ये गुंतलेल्या सर्वांनी उंच चढायला शिकले पाहिजे." तर दुसऱ्या युझरने कमेंट केली, "तुम्हाला तुमच्या पत्नीची फसवणूक केल्याची किंमत मोजावी लागेल."

हॉटेलच्या इमारतीला धरून लटकलेल्या या व्यक्तीची ओळख अद्याप समोर आलेली नाही, परंतु त्याच्याबद्दल सर्वत्र चर्चा होत आहे. हे काही पहिले प्रकरण नाही, याआधीही आपण अशी अनेक प्रकरणे पाहिली आहेत. अनैतिक संबंधात अडकण्याच्या भीतीने प्रेमींना पळून जावे लागल्याची अनेक उदाहरणे तुम्ही पाहिली असतील.

कोणीतरी स्टंट करतंय असं वाटलं -

सुरुवातीला, जेव्हा लोकांनी चार मजली इमारतीवरून लटकलेल्या व्यक्तीला पाहिले, तेव्हा त्यांना वाटले की "तो स्टंट करत आहे." पण काही वेळाने चित्र स्पष्ट झाले. तो व्यक्ती आपल्या खोलीच्या खिडकीतून बाहेर पडून काही अंतरावर असलेल्या हॉटेलच्या साइनबोर्डपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाला. तो तिथे बराच वेळ लटकत होता. खिडकी आणि साइनबोर्डमधील अंतर खूपच जास्त होते. जर तो घसरला असता, तर त्याचा थेट मृत्यू झाला असता. पण त्यावेळी त्या व्यक्तीने याकडे लक्ष दिले नाही. त्याचे ध्येय फक्त आपल्या पत्नीच्या नजरेतून वाचणे हे होते.