आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) टेक्नॉलॉजीचा गैरवापर रोखण्यासाठी देशात एक नवीन कायदा आणावा, अशी शिफारस संसदीय स्थायी समितीने केली आहे. फक्त सध्याच्या कायद्यांवर अवलंबून राहू नका, असंही समितीने म्हटलं आहे.

नवी दिल्ली: देशात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखण्यासाठी एक नवीन कायदा आणावा, अशी शिफारस संसदीय स्थायी समितीने केली आहे. सध्याच्या कायद्यांवरच अवलंबून राहणं पुरेसं नाही. AI साठी एक सर्वसमावेशक आराखडा (comprehensive framework) तयार करण्याची गरज आहे आणि त्यासाठी नवीन कायदाच आणला पाहिजे, असं समितीने स्पष्ट केलं आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

गेल्या काही वर्षांत AI च्या विकासाचा वेग प्रचंड वाढला आहे. त्याचे फायदे तर आहेतच, पण त्याचा गैरवापर रोखणंही तितकंच महत्त्वाचं आहे. याच पार्श्वभूमीवर संसदीय समितीने ही महत्त्वाची शिफारस केली आहे.