- Home
- Utility News
- नव्या वर्षाची धमाकेदार भेट! देशातील पहिली 'वंदे भारत स्लीपर' ट्रेन धावणार; गुवाहाटी ते कोलकाता प्रवास आता हाय-टेक
नव्या वर्षाची धमाकेदार भेट! देशातील पहिली 'वंदे भारत स्लीपर' ट्रेन धावणार; गुवाहाटी ते कोलकाता प्रवास आता हाय-टेक
Vande Bharat Sleeper Train : भारतीय रेल्वेने देशातील पहिली 'वंदे भारत स्लीपर' ट्रेन गुवाहाटी ते कोलकाता मार्गावर जाहीर केली. PM मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणारी ही ट्रेन अत्याधुनिक सोयीसुविधा, कवच सुरक्षा प्रणालीसह प्रवाशांना फाईव्ह स्टार अनुभव देईल

नव्या वर्षाची धमाकेदार भेट! देशातील पहिली 'वंदे भारत स्लीपर' ट्रेन धावणार
नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या मुहूर्तावर भारतीय रेल्वेने देशवासीयांना एक ऐतिहासिक भेट दिली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज, १ जानेवारी २०२६ रोजी देशातील पहिल्या 'वंदे भारत स्लीपर' ट्रेनचा मार्ग जाहीर केला आहे. ही पहिली अत्याधुनिक ट्रेन गुवाहाटी ते कोलकाता दरम्यान धावणार असून, ईशान्य भारत आणि पश्चिम बंगालला वेगवान रेल्वेने जोडण्याचे सरकारचे स्वप्न साकार झाले आहे.
१७ जानेवारीला होणार उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. १७ किंवा १८ जानेवारी रोजी या ट्रेनचा अधिकृत शुभारंभ होण्याची शक्यता आहे. अलीकडेच कोटा-नागदा विभागात या ट्रेनची १८० किमी प्रति तास वेगाने घेतलेली हाय-स्पीड चाचणी यशस्वी ठरली आहे.
वंदे भारत स्लीपरची 'फाईव्ह स्टार' वैशिष्ट्ये
ही ट्रेन केवळ वेगवान नाही, तर सुखसोयींनी युक्त एखादे हॉटेल असल्याचा अनुभव प्रवाशांना देईल.
डब्यांची रचना: एकूण १६ डबे असतील. यात ११ थर्ड एसी, ४ सेकंड एसी आणि १ फर्स्ट एसी कोचचा समावेश आहे.
विशाल आसनक्षमता: एका वेळी ८२३ प्रवासी आरामात प्रवास करू शकतील.
आधुनिक बर्थ: मऊ आणि आरामदायी बर्थसह डब्यांमध्ये 'ऑटोमॅटिक डोअर्स' आणि कमी आवाजाची (Noise Reduction) विशेष यंत्रणा असेल.
सुरक्षा कवच: ट्रेनमध्ये 'कवच' (Kavach) सुरक्षा प्रणाली आणि आपत्कालीन 'टॉक-बॅक' सिस्टम देण्यात आली आहे.
खानपानाचे खास आकर्षण
या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी विशेष सोय केली आहे. गुवाहाटीहून सुटणाऱ्या ट्रेनमध्ये अस्सल आसामी पदार्थ, तर कोलकाताहून सुटणाऱ्या ट्रेनमध्ये चविष्ट बंगाली जेवण दिले जाईल.
प्रवासाचा खर्च किती? (अंदाजित भाडे)
सुविधांच्या तुलनेत रेल्वेने भाडे अत्यंत वाजवी ठेवले आहे.
थर्ड एसी: ₹२,३००
सेकंड एसी: ₹३,०००
फर्स्ट एसी: ₹३,६००
२००० च्या अखेरीस अशा १२ ट्रेन धावणार!
रेल्वे मंत्र्यांनी स्पष्ट केले की, २०२६ हे 'रेल्वे सुधारणांचे वर्ष' असेल. पुढील सहा महिन्यांत अशा ८ गाड्या, तर वर्षाच्या अखेरीस एकूण १२ वंदे भारत स्लीपर ट्रेन देशात सुरू होतील. भविष्यात अशा २०० ट्रेनचे जाळे विणण्याचे सरकारचे ध्येय आहे.

