Income Tax Return भरताना या 12 मार्गांनी मिळवलेल्या पैशांवर लागत नाही टॅक्स, पाहा संपूर्ण लिस्ट

| Published : Jul 11 2024, 10:58 AM IST

Budget 2024 Income tax exemption can be given on interest received on savings account

सार

Income Tax Return : इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अखेरची तारीख 31 जुलै 2024 देण्यात आली आहे. अशातच इन्कम टॅक्स रिटर्न भरताना काही विशेष मार्गांनी मिळवलेल्या पैशांवर टॅक्स लागणार नाही आहे. याचीच संपूर्ण लिस्ट जाणून पाहूया...

Income Tax Return Updates : आर्थिक वर्ष 2023-24 साठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अखेरची तारीख जवळ येत आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी करदात्यांना 31 जुलैपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. अशातच इन्कम टॅक्स भरण्याआधी काही गोष्टींबद्दलची माहिती असणे आवश्यक आहे. अन्यथा तुमचेच नुकसान होऊ शकते.

खरंतर, काहीवेळा असे दिसून आले आहे इन्कम टॅक्स भरण्यासाठी कमी दिवस राहिल्याने इन्कम टॅक्सच्या वेबसाइटवर काही समस्या येतात. अशातच करदात्यांना इन्कम टॅक्स भरणे कठीण होते. यामुळे शेवटच्या काही दिवसांमध्ये इन्कम टॅक्स भरण्याएवजी अंतिम तारखेआधीच तो भरावा असा सल्ला दिला जातो. पण इन्कम टॅक्स भरताना कोणत्या 12 मार्गांनी कमावलेल्या उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा टॅक्स लागत नाही याची लिस्ट आधी पाहूया...

 • शेतीकामातून मिळवलेल्या कमाईवर भारतात कोणत्याही प्रकारचा टॅक्स द्यावा लागत नाही. NRE खात्यावर मिळणाऱ्या व्याजावर कोणत्याही प्रकारचा टॅक्स लावला जात नाही हे लक्षात असू द्या. याशिवाय ग्रॅच्युटी रक्कम 20 लाखांपर्यंत करदात्यांना कोणताही टॅक्स भरावा लागत नाही.
 • शहरी शेतजमिनीच्या बदल्यात मिळालेल्या भरपाईवर कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही.
 • पार्टनरशिप फर्मवर मिळणाऱ्या नफ्यावरही देखील कोणत्याही प्रकारचा टॅक्स द्यावा लागत नाही.
 • शासकीय अथवा खासगी शाळा किंवा महाविद्यालयाच्या माध्यमातून मिळणाऱ्या स्कॉलरशिपवरही टॅक्स लावला जात नाही.
 • पीएफ खात्यातील रक्कमेवर टॅक्स लावला जात नाही.
 • लीव्ह इनकॅशमेंटला अंशत: रुपात टॅक्स स्लॅबपासून वगळण्यात आले आहे. शासकीय कर्मचारी 10 महिन्यांपर्यंत लीव्ह इनकॅशमेंटवर टॅक्स सूटचा फायदा घेऊ शकतात. याशिवाय खासगी कर्मचाऱ्यांसाठी ही मर्यादा 25 लाख रुपयांपर्यंत आहे.
 • 15 हजार रुपयांपेक्षा कमी फॅमिली पेन्शनवर टॅक्स द्यावा लागत नाही. वॉलेंटरी रियार्मेंटवर 5 लाख रुपयांच्या रक्कमेवर कोणत्याही प्रकारचा टॅक्स लावला जात नाही.
 • एखाद्याला परदेशातून मिळणाऱ्या भरपाई अथवा इन्शुरन्स कंपनीद्वारे मॅच्युरिटी रक्कमेवरही कोणताही टॅक्स लावला जात नाही.

31 जुलैपर्यंत इन्कम टॅक्स न भरल्यास…
इन्कम टॅक्स रिटर्न येत्या 31 जुलैपर्यंत न भरल्यास तुम्हाला काही नुकसान होऊ शकते. याची लिस्ट पुढीलप्रमाणे...

 • अखेरच्या दिवशी इन्कम टॅक्सच्या वेबसाइटवर एखादी समस्या आल्यास रिटर्न फाइन करता येणार नाही. यामुळे तुम्हाला दंड भरावा लागेल.
 • 31 जुलैनंतर आयटीआर भरल्यास लेट फी द्यावी लागेल. तुमचा आयटीआर 5 लाख रुपयांच्या टॅक्स सूट अंतर्गत येत असल्यास 1 हजार रुपयांची फी द्यावी लागेल. काही प्रकरणात फी 5 हजार रुपयांपर्यंतही असू शकते.
 • 31 जुलैपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न न भरल्यास आणि तुमच्यावर शासकीय टॅक्स देणेही शिल्लक असल्यास टॅक्स व्याजावर आणखी दंड भरावा लागेल.
 • वेळीच इन्कम टॅक्स फाइल केल्यास एक मोठा फायदा असा होतो की, सरकारकडून रिफंड येणार असल्यास तुम्हाला वेळीआधीच ते पूर्ण मिळते.

आणखी वाचा : 

जाणून घ्या काय आहे Naked Resignation, लोकांना असा निर्णय का घ्यावा लागतोय

Jio युजर्सला पुन्हा झटका, Amazon Prime व्हिडीओ, Zee5 सह 'या' OTT प्लॅटफॉर्मची सुविधा असणारे प्लॅन केले बंद