Jio युजर्सला पुन्हा झटका, Amazon Prime व्हिडीओ, Zee5 सह 'या' OTT प्लॅटफॉर्मची सुविधा असणारे प्लॅन केले बंद

| Published : Jul 06 2024, 11:39 AM IST

jiocinema premium plans

सार

Reliance Jio Plans : रिलायन्स जिओने आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये मोठे बदल केले आहेत. यानुसार, रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवण्यासह त्यासोबत फ्री दिले जाणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मची सुविधा बंद केली आहे. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर...

Reliance Jio Plans : दिग्गज टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने नुकत्याच आपल्या काही निवडक प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत. यामुळे अन्य टेलिकॉम कंपन्यांनीही काही रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ केली आहे. जिओच्या जवळजवळ 19 रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. यामध्ये पोस्टपेड आणि प्रीपेड प्लॅनचा समावेश आहे. 28 दिवसांचा ते वर्षभरासाठीची वैधता असणाऱ्या प्लॅनच्या किंमतीत बदल करण्यात आला आहे. नव्या प्लॅनची लिस्ट 3 जुलैपासून लागू करण्यात आली आहे.

ओटीटीची सुविधा देणारे पॅक केले बंद
जिओ कंपनीने रिचार्ज प्लॅन वाढण्यासह ओटीटीची सुविधा देणारे काही पॅकही बंद केले आहेत. याआधी कंपनीकडून मनोरंजनासाठीची सुविधा देणारे 21 प्लॅन ऑफर करत होता. आता जिओने केवळ 7 प्लॅन उपलब्ध करुन दिले आहेत. जिओकडून मनोरंजनात्मक प्लॅन हटवण्यात आले आहेत. अशातच युजर्सला Amazon prime video, Zee5, SonyLiv सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मची मजा परवडणाऱ्या किंमतीत घेता येणार नाही. जाणून घेऊया कोणते मनोरंजनात्मक पॅक केले बंद याबद्दल अधिक...

जिओचे 1 हजार रुपयांखालील प्लॅन
जिओकडून 1 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीचे तीन प्लॅन उपलब्ध करुन देण्यात आले होते. यामध्ये 803 रुपयांच्या प्लॅनसह युजर्सला प्रति दिन 2GB डेटा, Zee5 आणि SonyLiv सारखे बेनिफिट्स 84 दिवसांसाठी मिळत होते. याशिवाय 806 रुपयांच्या प्लॅनची वैधता 84 दिवसांची होती. यामध्येही 805 रुपयांसारख्या सुविधा युजर्सला दिल्या जात होत्या. दुसरा अन्य पॅक 909 रुपयांचा होता, यामध्ये 806 आणि 805 रुपयांच्या प्लॅनपेक्षा थोडे अधिक बेनिफिट्स दिले जात होता. या प्लॅनमध्ये दररोज 2.5GB डेटाचा युजर्सला दिला जात होता. या तीन मनोरंजनात्मक प्लॅनव्यतिरिक्त जिओने आणखी काही प्लॅनही बंद केले आहेत.

5 हजार रुपयांखालील जिओचे प्लॅन
रिलायन्स जिओचे 5 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीमधील मनोरंजनात्मक प्लॅन बंद केले आहे. हे सर्व प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतात. दरम्यान, डेटाची जीबी आणि ओटीटी प्लॅटफॉर्मची संख्या वाढल्याने प्लॅनच्या किंमतीतबी वाढ करण्यात आली आहे.

  • जिओच्या 2999 रुपयांच्या प्लॅनसह प्रतिदिन 2.5GB डेटाचा फायदा युजर्सला घेता येत होता. पण या प्लॅनला देखील जिओने बंद केले आहे.
  • जिओच्या 3178 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला प्रतिदिन 2.5GB डेटा दिला जात होता. पण यासोबत Disney+Hotstar चे सब्सक्रिप्शनचाही समावेश होता.
  • SonyLiv आणि Zee5 च्या सब्सक्रिप्शनसोबत येणारा 3225 आणि 32226 रुपयांचा प्लॅन देखील बंद करण्यात आला आहे.
  • प्रतिदिन 2GB डेटा आणि Amazon Video सब्सक्रिप्शनसोबत येणारा 3227 रुपयांचा प्लॅनही बंद करण्यात आला आहे.
  • 3662 रुपयांच्या प्लॅनमध्ये 2.5GB डेटासह Sony Liv आणि Zee5 ची सुविधा युजर्सला दिली जात होती. हा देखील प्लॅन जिओकडून बंद करण्यात आला आहे.
  • प्रतिदिन 2GB डेटासह येणारा 4498 रुपयांचा प्लॅन JioTV Premium सब्सक्रिप्शन आणि 78GB बोनस डेटासोबत येत होता. हा देखील प्लॅन कंपनीने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा : 

Aadhaar free update: आधार कार्ड तपशील मोफत अपडेट करण्यासाठी नवीन अंतिम मुदत जाहीर, जाणून घ्या अधिक माहिती

Apple कंपनीची मोठी घोषणा, iPhone स्मार्टफोनमध्येही कॉल रेकॉर्ड करता येणार, जाणून घ्या सोपी ट्रिक