एका किलोमीटरसाठी फक्त 47 पैसे खर्च.. ह्युंदाई प्राइम टॅक्सी कार लाँच
भारतातील टॅक्सी चालकांसाठी ह्युंदाईने आपली प्राइम टॅक्सी सिरीज लाँच केली आहे. ही कार कमी देखभाल खर्च, जास्त मायलेज आणि आधुनिक फीचर्ससह येते या स्पेशल टॅक्सीची किंमत आणि फीचर्सची माहिती या लेखात दिलेली आहे.

ह्युंदाई टॅक्सी कार
भारतातील टॅक्सी चालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Hyundai Motor India ने आपल्या Prime Taxi सिरीज अंतर्गत दोन नवीन कार लाँच केल्या आहेत. यासह, ह्युंदाईने अधिकृतपणे कमर्शियल मोबिलिटी विभागात प्रवेश केला आहे. या नवीन सिरीजमध्ये Prime HB (Grand i10 Nios वर आधारित हॅचबॅक) आणि Prime SD (Aura वर आधारित सेडान) या दोन मॉडेल्सचा समावेश आहे. कंपनीच्या मते, या गाड्या कमी देखभाल खर्च, जास्त उपयोगिता आणि दैनंदिन वापरासाठी योग्य आहेत.
किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Prime HB मॉडेलची किंमत ₹5,99,900 आणि Prime SD मॉडेलची किंमत ₹6,89,900 (एक्स-शोरूम) आहे. Prime Taxi सिरीजसाठी देशभरात ₹5,000 अनामत रक्कम भरून बुकिंग सुरू झाली आहे. तसेच, 72 महिन्यांपर्यंत सुलभ हप्त्यांची सुविधाही उपलब्ध आहे. ह्युंदाईचे म्हणणे आहे की, टॅक्सी चालकांच्या गरजा लक्षात घेऊन ही वाहने कमी खर्चात जास्त उत्पन्न देण्याच्या उद्देशाने तयार केली आहेत.
कमी खर्चाची टॅक्सी
दोन्ही मॉडेल्स 1.2L CNG इंजिनसह येतात. मायलेज 28.40 किमी/किलो पर्यंत आहे आणि चालवण्याचा खर्च फक्त 47 पैसे/किमी आहे. यात 6 एअरबॅग्ज आणि टाइप-सी चार्जर सारखे फीचर्स आहेत.

