MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • आधार कार्डला नवा मोबाईल नंबर लिंक करायचाय? आता आधार सेंटरच्या चकरा मारण्याची गरज नाही; घरबसल्या करा 'हे' काम!

आधार कार्डला नवा मोबाईल नंबर लिंक करायचाय? आता आधार सेंटरच्या चकरा मारण्याची गरज नाही; घरबसल्या करा 'हे' काम!

Aadhaar mobile number update online: आता आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी आधार सेंटरला जाण्याची गरज नाही. UIDAI ने आधार ॲपमध्ये फेस ऑथेंटिकेशनसारखे नवीन फिचर आणले आहे, ज्यामुळे तुम्ही घरबसल्या काही मिनिटांत तुमचा मोबाईल नंबर अपडेट करू शकता.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 24 2026, 06:23 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
आधार कार्डला नवा मोबाईल नंबर लिंक करायचाय? आता आधार सेंटरच्या चकरा मारण्याची गरज नाही
Image Credit : X

आधार कार्डला नवा मोबाईल नंबर लिंक करायचाय? आता आधार सेंटरच्या चकरा मारण्याची गरज नाही

Aadhaar Mobile Number Update: आधार कार्ड हे आजच्या काळात केवळ ओळखीचा पुरावा नसून सर्व सरकारी आणि खाजगी कामांची गुरुकिल्ली आहे. आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर सक्रिय असणे अत्यंत आवश्यक असते, कारण सर्व 'ओटीपी' (OTP) याच नंबरवर येतात. जर तुमचा जुना नंबर बंद झाला असेल किंवा तुम्हाला नवा नंबर अपडेट करायचा असेल, तर आता तासनतास रांगेत उभे राहण्याची गरज नाही. UIDAI ने आपल्या अधिकृत ॲपमध्ये मोठे बदल केले असून, आता तुम्ही घरबसल्या तुमच्या स्मार्टफोनवरून मोबाईल नंबर अपडेट करू शकता. 

25
आधार ॲपच्या नव्या फिचरचा धमाका!
Image Credit : Asianet News

आधार ॲपच्या नव्या फिचरचा धमाका!

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) आधार ॲप अधिक सक्षम केले आहे. ज्यांना कामामुळे आधार सेंटरवर जाणे शक्य नाही, अशा लोकांसाठी हे वरदान ठरणार आहे. अँड्रॉइड किंवा आयफोन वापरकर्ते आता काही मिनिटांत ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. 

Related Articles

Related image1
रेल्वे प्रवाशांना मोठा झटका! तिकीट कॅन्सल करण्याचे नियम बदलले; आता खिशाला बसणार कात्री, पाहा काय आहेत नवे बदल
Related image2
Mumbai-Pune Expressway Toll Update: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर सलग ३ दिवस 'टोल माफी'! पण प्रवासापूर्वी 'हे' एक पत्र सोबत ठेवा; पाहा संपूर्ण नियम
35
 मोबाईल नंबर अपडेट करण्याची स्टेप-बाय-स्टेप पद्धत
Image Credit : Google

मोबाईल नंबर अपडेट करण्याची स्टेप-बाय-स्टेप पद्धत

१. सर्वात आधी तुमच्या फोनमध्ये Aadhaar App इंस्टॉल करा (असल्यास लेटेस्ट व्हर्जनवर अपडेट करा).

२. ॲप ओपन केल्यानंतर 'Mobile Number Update' या पर्यायावर क्लिक करा.

३. नवीन मोबाईल नंबर टाका, त्यावर आलेला OTP प्रविष्ट करून व्हेरिफिकेशन पूर्ण करा.

४. आता 'Face Authentication' ची प्रक्रिया होईल, यामध्ये ॲप तुमचा चेहरा स्कॅन करून ओळख पटेल.

५. व्हेरिफिकेशन यशस्वी झाल्यानंतर, डेमोग्राफिक अपडेटसाठी ७५ रुपये फी ऑनलाईन भरा.

६. पेमेंट यशस्वी होताच तुमचा नवीन नंबर आधार डेटाबेसमध्ये अपडेट होण्यासाठी सबमिट होईल. 

45
नवीन फोनमध्ये आधार ॲप आधीच येणार?
Image Credit : Gemini AI

नवीन फोनमध्ये आधार ॲप आधीच येणार?

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सरकार आता सर्व नवीन स्मार्टफोन्समध्ये आधार ॲप 'प्री-इंस्टॉल' (आधीपासूनच डाऊनलोड केलेले) देण्याच्या विचारात आहे. यामुळे वापरकर्त्यांना ॲप शोधण्याची आणि डाऊनलोड करण्याची कटकट राहणार नाही. मात्र, ॲपल, गुगल आणि सॅमसंग सारख्या मोठ्या कंपन्या सध्या या प्रस्तावाला विरोध दर्शवत आहेत. 

55
महत्त्वाची टीप
Image Credit : X @UIDAI

महत्त्वाची टीप

तुमची बायोमेट्रिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी नेहमी अधिकृत आधार ॲपचाच वापर करा आणि कुणाशीही आपला आधार ओटीपी शेअर करू नका.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या
Recommended Stories
Recommended image1
Rattan Decor: घराला द्या गावाकडचा टच, 1k बजेटमध्ये खरेदी करा हे 4 स्टायलिश आयटम्स!
Recommended image2
रेल्वे प्रवाशांना मोठा झटका! तिकीट कॅन्सल करण्याचे नियम बदलले; आता खिशाला बसणार कात्री, पाहा काय आहेत नवे बदल
Recommended image3
Soap Hacks: साबणाच्या वड्या फेकू नका! या ५ जुगाडातून वाचतील तुमचे पैसे
Recommended image4
घरी बसून पासपोर्ट काढा, जाणून घ्या प्रोसेस
Recommended image5
Ear Climbers: सिंगल स्टडचा जमाना गेला, आता ट्रेंड आहे इयर क्लायंबरचा! ₹300 मध्ये पाहा 8 भन्नाट डिझाइन्स
Related Stories
Recommended image1
रेल्वे प्रवाशांना मोठा झटका! तिकीट कॅन्सल करण्याचे नियम बदलले; आता खिशाला बसणार कात्री, पाहा काय आहेत नवे बदल
Recommended image2
Mumbai-Pune Expressway Toll Update: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर सलग ३ दिवस 'टोल माफी'! पण प्रवासापूर्वी 'हे' एक पत्र सोबत ठेवा; पाहा संपूर्ण नियम
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved