नोकरी बदलतायत? PF बद्दलचे हे काम चुकूनही विसरू नका

| Published : Jan 13 2025, 12:31 PM IST

Warning given on EPFO ​​website

सार

नोकरी बदलताना बहुतांशजण पीएफचे खाते संयुक्त करण्यास विसरुन जातात. यामुळे पुढे जाऊन समस्या उद्भवली जाते. नव्या कंपनीमध्ये नोकरीला लागल्यानंतर जुन्या UAN क्रमांकावरुन नवे पीएफ खाते सुरू करता येते. 

Online EPF Account Merge Process :  खासगी कंपन्यांमध्ये नोकरी एका मदार्यादित कालांतराने सातत्याने बदलली जाते. यावेळी बहुतांशजण पीएफ खात्यासंदर्भातील एक महत्वाचे काम करणे विसरतात. यामुळे पुढे जाऊन समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशातच नव्या ठिकाणी नोकरीला लागल्यानंतर पीएफ खात्यासंदर्भात कोणते काम आधी करावे आणि का करावे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

पीएफबद्दलचे करा हे काम

नोकरी बदलणार असल्यास PF खाते संयुक्त (मर्ज) करा.कोणत्याही नव्या कंपनीमध्ये कामावर रुजू झाल्यानंतर तेथे जुना UAN क्रमांक दिल्यास त्याच्या माध्यमातून नवे पीएफ खाते सुरू केले जाते. पण नव्या पीएफ खात्यात जुन्या कंपनीमधील पीएफ खात्यामधील रक्कम येत नाही. अशातच पीएफ खातेधारकाने EPFO च्या वेबसाइटवर जाऊन अकाउंट मर्ज (EPF Account Merge)करावे. पीएफ खाते मर्ज झाल्यानंतर जुन्या पीएफ खात्यामधील रक्कम एकाच खात्यात दाखवली जाईल.

ऑनलाइन पद्धतीने असे करा पीएफ खाते मर्ज

  • सर्वप्रथम EPFO च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • येथे सर्विसेस पर्यायावर क्लिक करा. यानंतर One Employee One EPF Account दिसेल त्यावर क्लिक करा.
  • आता PF खाते मर्ज करण्यासाठी एक फॉर्म दाखवला जाईल त्यासाठी पीएफ खात्याला जोडलेला मोबाइल क्रमांक दाखल करा.
  • UAN आणि सध्या ID ची माहिती द्या. संपूर्ण डिटेल्स दिल्यानंतर Authentication साठी रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर OTP येईल.
  • ओटीपी दाखल केल्यानंतर जुन्या खात्याची सर्व माहिती दिसेल. यानंतर पीएफ अकाउंट क्रमांक भरुन सबमिट करा.
  • तुमची अकाउंट मर्ज होण्याची रिस्क्वेस स्विकारली जाईल. यापुढे वेरिफिकेशन झाल्यानंतर खाते आपोआप मर्ज झालेले दिसेल.

आणखी वाचा : 

एआयद्वारे १००० नोकऱ्यांसाठी अर्ज, झोपेत असतानाही मिळाली मुलाखत!

पोस्ट खातेधारकांसाठी बातमी, PAN Card च्या नावे होणाऱ्या फसवणूकीपासून असे रहा दूर