MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Aadhaar Verification : आता एकाच ॲपमध्ये होणार आधार व्हेरिफिकेशन, UIDAI चं नवं जबरदस्त टूल

Aadhaar Verification : आता एकाच ॲपमध्ये होणार आधार व्हेरिफिकेशन, UIDAI चं नवं जबरदस्त टूल

आता आधार फेस व्हेरिफिकेशनसाठी सारखं ॲप बदलावं लागणार नाही. UIDAI ने एक नवीन सिस्टीम आणली आहे, ज्यामुळे बँकिंग आणि इन्शुरन्स ॲपमध्येच व्हेरिफिकेशन पूर्ण करता येईल.

2 Min read
Author : Karishma R
Published : Sep 11 2026, 03:21 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
दोन नवीन टूल्स लाँच
Image Credit : Asianet News

दोन नवीन टूल्स लाँच

मुंबई : बँक खातं उघडायचं असो किंवा इन्शुरन्स पॉलिसी घ्यायची, KYC लागतंच. आतापर्यंत आधार फेस व्हेरिफिकेशनसाठी एका ॲपमधून दुसऱ्या ॲपवर जावं लागायचं. पण आता UIDAI ने ही प्रक्रिया सोपी केली आहे. ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 मध्ये UIDAI ने 'आधार फेस ऑथेंटिकेशन SDK' आणि 'आधार फेस ऑथेंटिकेशन सँडबॉक्स' ही दोन नवीन टूल्स लाँच केली आहेत. यामुळे बँका, फिनटेक कंपन्या थेट त्यांच्या ॲपमध्येच व्हेरिफिकेशन करू शकतील.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
प्रक्रिया अधिक सोपी आणि वेगवान
Image Credit : Chatgpt

प्रक्रिया अधिक सोपी आणि वेगवान

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयानुसार, सध्याच्या पद्धतीत फेस व्हेरिफिकेशनसाठी 'FaceRD' नावाचं वेगळं ॲप वापरावं लागतं. यामुळे युझर्सना सतत ॲप्स बदलावं लागत असल्याने त्रास होतो. पण आता नवीन SDK सिस्टीममुळे (जी अँड्रॉइड आणि iOS दोन्हीला सपोर्ट करते) युजर्स थेट बँकिंग किंवा इन्शुरन्स ॲपमध्येच व्हेरिफिकेशन पूर्ण करू शकतील. यामुळे डिजिटल KYC आणि सरकारी योजनांची नोंदणी प्रक्रिया खूप वेगवान होईल.

Related Articles

Related image1
ChatGPT : आता फायनान्सवाल्यांसाठी आलं खास व्हर्जन, बँकिंग आणि गुंतवणुकीची कामं होणार सोपी
34
आधार फेस ऑथेंटिकेशन सँडबॉक्स
Image Credit : Asianet News

आधार फेस ऑथेंटिकेशन सँडबॉक्स

UIDAI ने 'आधार फेस ऑथेंटिकेशन सँडबॉक्स' नावाचं एक टेस्टिंग प्लॅटफॉर्मही सुरू केलं आहे. ही एक सुरक्षित लॅब आहे, जिथे कंपन्या आपल्या सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याआधी फीचर्सची चाचणी करू शकतात. या सँडबॉक्समध्ये फेस कॅप्चर, युझरची परवानगी, व्हेरिफिकेशन आणि एरर हँडलिंग यांसारख्या गोष्टी तपासता येतात. विशेष म्हणजे, यासाठी कोणत्याही बायोमेट्रिक हार्डवेअरची गरज नाही.
44
फसवणूक रोखण्यास मदत होणार
Image Credit : Getty

फसवणूक रोखण्यास मदत होणार

या नवीन SDK टूलमध्ये सुरक्षेला सर्वाधिक महत्त्व दिलं आहे. यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि मशीन लर्निंग (ML) आधारित 'लाइव्हनेस' आणि 'अँटी-स्पूफिंग' फीचर्स आहेत. हे फीचर्स बनावट फोटो किंवा व्हिडिओद्वारे होणारी फसवणूक रोखतात. सुरक्षित डेटा ट्रान्सफरसाठी एन्क्रिप्शन सपोर्टही आहे. हे टूल सर्व प्रकारच्या स्मार्टफोनवर व्यवस्थित काम करतं. यामुळे सरकारी विभाग आणि बँकिंग क्षेत्राला आपल्या सेवा अधिक वेगाने देता येतील.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Bajaj Pulsar RS200: टेस्टिंगमध्ये दिसली नवी पल्सर, USD फोर्क्स आणि TFT डिस्प्लेसह होणार लाँच
Recommended image2
Skincare Hacks: चेहऱ्यावरील ओपन पोर्समुळे फोटो खराब येतायत? हा सोपा उपाय नक्की ट्राय करा
Recommended image3
ChatGPT Plus Free: चॅटजीपीटी प्लस आता मोफत! OpenAI देतंय १ ते ४ महिन्यांची फ्री ऑफर
Recommended image4
FD Vs Gold Investment : हातात 1 लाख रुपये आहेत? मग एफडी की सोनं, कुठे गुंतवणूक करणं ठरेल फायद्याचं?
Recommended image5
Mumbai Barber : मुंबईत एका न्हाव्याची महिन्याची कमाई 1 लाख रुपये, सरकारी नोकरीलाही दिला नकार
Related Stories
Recommended image1
ChatGPT : आता फायनान्सवाल्यांसाठी आलं खास व्हर्जन, बँकिंग आणि गुंतवणुकीची कामं होणार सोपी
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved