१० रुपयात त्वचेवर येणार ग्लो, या सोप्या पद्धतीला करा फॉलो
पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करण्याऐवजी, तुम्ही घरच्या घरी स्वस्तात बॉडी पॉलिशिंग करू शकता. कॉफी पावडर, मध आणि खोबरेल तेल वापरून तयार केलेला हा स्क्रब डेडस्कीन काढून त्वचा हायड्रेटेड, मऊ आणि चमकदार बनवतो, ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो.

१० रुपयात त्वचेवर येणार ग्लो, या सोप्या पद्धतीला करा फॉलो
बॉडी पॉलिशिंग सारखी गोष्ट पार्लरमध्ये जाऊन जर करायची असेल तर त्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागतात पण तेच जर घरी करायचं असेल तर अतिशय कमी पैशांमध्ये करू शकणार आहेत.
घरच्याघरी कस करायचं स्क्रब
आपण आता घरच्याघरी स्क्रब करू शकणार आहेत. आपण एकदम स्वस्तात घरीच हे स्क्रब करू शकता, त्यासाठी नेमकं काय करायला हवं त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
पद्धत घ्या जाणून
आपण त्याची पुढची पद्धत जाणून घेणार आहोत. आपण त्यामध्ये आता पाव कप कॉफी पावडर घाला. डेडस्कीन काढून टाकण्यासाठी आपल्याला या कॉफी पावडरचा एकदम योग्य प्रकारे वापर होतो.
मधाचा असा करा वापर
आपण वरील मिश्रणात आता मध टाका. त्यामध्ये ३ टेबलस्पून मध टाका. मधामुळे त्वचा हि हायड्रेटेड राहायला खऱ्या अर्थाने मदत मिळते.
नारळाच्या तेलाचा करा समावेश
आपण या मिश्रणात आता नारळाच्या तेलाचा वापर करू शकणार आहेत. त्यामध्ये २ चमचे हे खोबरेल तेल घाला. खोबरेल तेलामुळे त्वचा कोरडी होत नाही आणि छान, मऊ आणि कोमल राहायला मदत मिळते.
बॉडी वॉश टाकून त्यानं करा अंघोळ
त्यानंतर यामध्ये बॉडी वॉश टाका. त्यानंतर स्क्रब करून अंघोळ करा, तुम्हाला एकदम फ्रेश वाटून जाईल. आपल्याला त्यानंतर त्वचेवर ग्लो आल्याचं लक्षात येईल.

