जीमेल स्टोरेज नेहमी फुल होत असेल आणि महत्त्वाचे मेल्स येत नसतील, तर या सोप्या ट्रिक्स वापरून काही मिनिटांत हजारो मेल्स डिलीट करा, प्रमोशनल मेल्स हटवा आणि जीमेल स्टोरेज रिकामी करा. 

मुंबई : फोन वापरण्यासाठी Gmail ID असणे आवश्यक आहे. कुठल्याही अ‍ॅप किंवा वेबसाइटमध्ये साइन अप-लॉगिन करण्यासाठीही याचा वापर होतो. अशावेळी अनेकदा लोकांचे जीमेल फुल असल्याचे दिसून येते. ज्यामुळे ते येणारे महत्त्वाचे मेल्स वाचू शकत नाहीत. जर तुम्हीही याच समस्येने त्रस्त असाल आणि प्रयत्न करूनही जीमेल स्टोरेज रिकामी करू शकत नसाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला सोप्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने काही मिनिटांत Gmail Storage Free करता येईल. तर चला जाणून घेऊया कसे?

जीमेल वापरताना नकळत आपण अनेकदा अशा प्रमोशनल-ईमेल्स न्यूजलेटर्सचे सबस्क्रिप्शन घेतो जे दररोज अनेक मेल्स पाठवतात. ज्यामुळे हळूहळू १५ जीबी स्टोरेज फुल होते. आता एक-एक करून हजारो मेसेज डिलीट करणे सोपे नाही. ही स्टोरेज Gmail सोबत Google Drive- Google Photos ची देखील असते.

View post on Instagram

जीमेलमध्ये एका वर्षाचे मेल्स कसे डिलीट करायचे? (How to delete thousands of emails at once in Gmail?)

एकाच वेळी जीमेल डिलीट करताना महत्त्वाच्या गोष्टीही जाऊ शकतात. त्यामुळे आम्ही तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहोत ज्यांचा वापर करता येईल.

प्रमोशनल मेल्स कसे डिलीट करायचे? (How to delete all promotional mail?)

  • प्रमोशनल मेल्स डिलीट करण्यासाठी ब्राउजरमध्ये Gmail उघडा.
  • Inbox पर्यायावर जा.
  • Search Bar मध्ये Unsubscribe सर्च करून Enter दाबा.
  • असे केल्याने ज्या मेल्समध्ये Unsubscribe पर्याय आहे ते सर्व मेल्स येतील.
  • आता डावीकडे चेकबॉक्सवर क्लिक करा.
  • लगेच पहिल्या पानाचे ईमेल निवडले जातील.
  • नंतर Select all conversations that match this search वर क्लिक करा.
  • आता Trash वर क्लिक करून सर्व मेल्स काही सेकंदात डिलीट होतील.

मेल्स कसे डिलीट करायचे? (How to delete mail?)

  • जर तुम्हाला एकाच वेळी अनेक मेल्स डिलीट करायचे नसतील आणि एखादा विशिष्ट मेल डिलीट करायचा असेल तर त्याची पद्धत वेगळी आहे.
  • ज्यांना मेल पाठवला आहे त्यांचे नाव किंवा ID सर्च करा आणि थेट डिलीट करा.
  • मेल ID आठवत नसेल तर Sent Mail मध्ये जाऊनही डिलीट करता येते.