MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Gold Jewellery Cleaning : टूथपेस्ट आणि बेकिंग सोड्याने सोन्याचे दागिने साफ करताय? ही आहे योग्य पद्धत

Gold Jewellery Cleaning : टूथपेस्ट आणि बेकिंग सोड्याने सोन्याचे दागिने साफ करताय? ही आहे योग्य पद्धत

सोन्याचे दागिने चमकवण्यासाठी अनेक जण टूथपेस्ट किंवा बेकिंग सोडा वापरतात. पण हे प्रत्येक दागिन्यासाठी सुरक्षित नसतं. मग घरच्या घरी सोन्याचे दागिने सुरक्षितपणे कसे साफ करायचे? जाणून घ्या योग्य पद्धत.

2 Min read
Author : Karishma R
Published : Oct 04 2026, 03:45 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
सोन्याचे दागिने साफ करण्यासाठी टूथपेस्ट वापरताय?
Image Credit : our own

सोन्याचे दागिने साफ करण्यासाठी टूथपेस्ट वापरताय?

रोजच्या वापरामुळे सोन्याचे दागिने काळे पडणं साहजिक आहे. त्वचेवरील तेल, घाम, साबण आणि सौंदर्यप्रसाधनांमुळे दागिन्यांची चमक कमी होते. ही चमक परत आणण्यासाठी अनेक जण टूथपेस्ट किंवा बेकिंग सोड्याने दागिने घासतात.

पण दागिन्यांना चमकवण्यासाठी कोणतीही गोष्ट वापरून ते घासणं योग्य नाही. 'जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिका' (GIA) च्या मते, टूथपेस्टमधील खरखरीत घटकांमुळे दागिन्यांच्या पृष्ठभागाचं नुकसान होऊ शकतं.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
बेकिंग सोडा आणि टूथपेस्ट दागिन्यांसाठी घातक!
Image Credit : Asianet News

बेकिंग सोडा आणि टूथपेस्ट दागिन्यांसाठी घातक!

सोन्याच्या दागिन्यांवर टूथपेस्टचा वापर टाळलेलाच बरा. यातील खरखरीत पदार्थ सोने आणि इतर धातूंच्या पृष्ठभागाला हानी पोहोचवू शकतात.

तसंच, बेकिंग सोड्याने दागिने घासणंही सुरक्षित मानलं जात नाही. विशेषतः खडे असलेल्या दागिन्यांवर घरगुती प्रयोग केल्यास त्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं.

शिवाय, सोन्याचे दागिने १००% शुद्ध सोन्याचे नसतात. दागिन्यांच्या दर्जानुसार त्यात इतर धातूंचं मिश्रण असतं. त्यामुळे कठोर रसायने किंवा खरखरीत वस्तूंचा वापर टाळायला हवा.

Related Articles

Related image1
Gold Jhumka Designs : सिल्क साड्यांवर शोभून दिसतील असे सुंदर झुमके
Related image2
Antique Gold Bangles : हातांना रॉयल लूक देणाऱ्या अँटिक गोल्ड आणि मोत्यांच्या बांगड्या
35
घरच्या घरी सोन्याचे दागिने कसे साफ करावेत?
Image Credit : our own

घरच्या घरी सोन्याचे दागिने कसे साफ करावेत?

घरच्या घरी सोन्याचे दागिने साफ करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. एका छोट्या भांड्यात कोमट पाणी घ्या. त्यात सौम्य डिशवॉश लिक्विडचे काही थेंब टाका.

दागिने थोडा वेळ या पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर मऊ ब्रशने दागिन्यांवरील घाण हलक्या हाताने काढा. शेवटी स्वच्छ पाण्याने धुवून मऊ कापडाने दागिने पुसून कोरडे करा.

GIA च्या मते, बहुतांश दागिने आणि खड्यांसाठी कोमट पाणी, सौम्य साबण आणि मऊ ब्रश वापरणं हीच सर्वात सुरक्षित पद्धत आहे.

45
खड्यांचे दागिने साफ करताना घ्या विशेष काळजी!
Image Credit : Asianet News

खड्यांचे दागिने साफ करताना घ्या विशेष काळजी!

सगळेच सोन्याचे दागिने एकाच पद्धतीने साफ करता येत नाहीत. हिरा, मोती, पोवळे, टर्क्युइज अशा वेगवेगळ्या खड्यांसाठी वेगळी काळजी घ्यावी लागते.

विशेषतः मोत्यांसारखे नाजूक किंवा सच्छिद्र खडे रसायनांमुळे खराब होऊ शकतात. जुने दागिने किंवा ज्यांचे खडे सैल झाले आहेत, असे दागिने जास्त घासू नयेत.

जर खडे हलत असतील, हुक सैल असेल किंवा दागिन्यांमध्ये खूप घाण साचली असेल, तर घरी प्रयोग करण्यापेक्षा ज्वेलर्सकडे जाऊन ते साफ करून घेणं जास्त सुरक्षित ठरतं.

55
दागिन्यांची चमक टिकवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा!
Image Credit : Getty

दागिन्यांची चमक टिकवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा!

सोन्याचे दागिने साफ करण्यासाठी टूथपेस्ट, कठोर पावडर किंवा खरखरीत वस्तूंचा वापर टाळा. रोजच्या वापरातील दागिन्यांवर साचलेला घाम, तेल आणि घाण वेळोवेळी मऊ कापडाने पुसून काढल्यास फायदा होतो.

दागिने साफ करताना बेसिनजवळ विशेष काळजी घ्या. छोटे खडे किंवा दागिने चुकून ड्रेनेजमध्ये पडण्याचा धोका असतो.

थोडक्यात सांगायचं तर, दागिन्यांना चमकवण्यासाठी टूथपेस्ट किंवा बेकिंग सोड्यासारख्या घरगुती वस्तूंचे प्रयोग करण्यापेक्षा कोमट पाणी, सौम्य साबण आणि मऊ ब्रश वापरणं हाच सर्वात सुरक्षित पर्याय आहे.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Menstrual Blood Clots: मासिक पाळीत जास्त रक्तस्राव आणि गाठी का होतात? ही ५ कारणं असू शकतात
Recommended image2
Cancer In Young Adults: तरुणांमध्ये कॅन्सरचा धोका वाढतोय? 'ही' लक्षणे अजिबात इग्नोर करू नका
Recommended image3
Mahalakshmi Rajyogam 2026 : दिवाळीपूर्वी या ४ राशींना लागणार लॉटरी! पैशांचा पाऊस पडणार
Recommended image4
Indian Railways : ट्रेनमध्ये रात्री फोन चार्जिंगवर बंदी? रेल्वेचा मोठा निर्णय
Recommended image5
Gold Rate Today : दिवाळीपूर्वी सोन्याचे दर पुन्हा घसरले, तुमच्या शहरातील 22K आणि 24K चे भाव तपासा
Related Stories
Recommended image1
Gold Jhumka Designs : सिल्क साड्यांवर शोभून दिसतील असे सुंदर झुमके
Recommended image2
Antique Gold Bangles : हातांना रॉयल लूक देणाऱ्या अँटिक गोल्ड आणि मोत्यांच्या बांगड्या
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved