EPFO Update : 2025-26 या आर्थिक वर्षासाठी PF खात्यात व्याज जमा करायला सुरुवात केली आहे. तुमच्या पासबुकमध्ये अजून व्याज दिसत नसेल, तर UMANG ॲप, SMS, मिस्ड कॉल आणि पासबुकद्वारे ते कसं तपासायचं, हे जाणून घ्या.

मुंबई : तुम्ही नोकरदार आहात आणि तुमचं Employees Provident Fund (EPF) खातं आहे? मग तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 2025-26 या आर्थिक वर्षाचं व्याज खात्यांमध्ये जमा करायला सुरुवात केली आहे. अनेक खातेधारकांच्या खात्यात व्याजाची रक्कम दिसू लागली आहे. पण, जर तुमच्या पीएफ खात्यात किंवा पासबुकमध्ये अजूनही व्याज दिसत नसेल, तर तुम्ही काही सोप्या पद्धतींनी तुमच्या पीएफमधील व्याज आणि बॅलन्सची माहिती मिळवू शकता.

  • UMANG ॲपवरून पीएफ व्याज असं तपासा

तुम्ही UMANG ॲपद्वारेही EPFO च्या सेवांचा लाभ घेऊ शकता. यासाठी आधी UMANG ॲप उघडा.

त्यात 'EPFO Services' हा पर्याय निवडा.

तुमचा UAN आणि इतर माहिती टाकून लॉग इन करा.

लॉग इन झाल्यावर तुम्ही तुमचा पीएफ बॅलन्स आणि जमा झालेलं व्याज पाहू शकता.

  • मिस्ड कॉल आणि SMS ने PF तपासा

जर तुमचा मोबाईल नंबर आधीच UAN शी लिंक असेल आणि KYC अपडेटेड असेल, तर तुम्ही इंटरनेटशिवायही तुमच्या पीएफ खात्याची माहिती मिळवू शकता.

यासाठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून 9966044425 या नंबरवर मिस्ड कॉल द्या.

थोड्याच वेळात तुमच्या मोबाईलवर SMS द्वारे पीएफ बॅलन्सची माहिती येईल.

  • SMS द्वारे पीएफ बॅलन्स कसा तपासायचा?

तुमच्या मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये जा.

तिथे EPFOHO UAN असं टाइप करा.

हा मेसेज 7738299899 या नंबरवर पाठवा.

यानंतर तुम्हाला SMS द्वारे पीएफ बॅलन्स आणि खात्याची माहिती मिळेल.

SMS सेवेचा वापर करण्यासाठी तुमचा UAN ॲक्टिव्हेटेड (सक्रिय) असणं आणि मोबाईल नंबर त्याच्याशी लिंक असणं गरजेचं आहे.

  • पीएफ पासबुक कुठे आणि कसं पाहायचं?

EPFO च्या अधिकृत पासबुक वेबसाईट passbook.epfindia.gov.in वर जा.

तुमचा UAN आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.

तुमची संबंधित मेंबर आयडी (Member ID) निवडा.

पासबुकमध्ये 2025-26 या वर्षाची नोंद किंवा 'Interest Credit' सेक्शनमध्ये जाऊन व्याजाची माहिती तपासा.

  • पीएफ खात्यात व्याज जमा झालं नसेल तर काय करावं?

वरचे सर्व मार्ग वापरूनही तुमच्या पीएफ खात्यात व्याज दिसत नसेल, तर तुम्ही EPFO च्या तक्रार निवारण पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदवू शकता.

यासाठी ईपीएफओच्या अधिकृत तक्रार पोर्टलवर जा.

तुमचा UAN आणि इतर आवश्यक माहिती भरा.

तुमची समस्या सविस्तर लिहून तक्रार सबमिट करा.

तक्रार नोंदवल्यानंतर तुम्ही तिचं स्टेटसही ऑनलाइन तपासू शकता.