PNR Status Check Online : रेल्वेचं तिकीट काढल्यावर PNR नंबर सर्वात महत्त्वाचा असतो. या नंबरमुळे तुमची सीट कन्फर्म झाली आहे की नाही, हे समजतं. तिकीट कन्फर्म (CNF) आहे, RAC आहे की वेटिंग लिस्टवर (WL) आहे, याची सगळी माहिती मिळते. त्यामुळे प्रवासाचं नियोजन करणं सोपं जातं.
How to Check PNR Status Online: ट्रेनचा प्रवास जितका भारी वाटतो, तितकंच तिकीट बुकिंगचं टेन्शन असतं. त्यातही तिकीट वेटिंग लिस्टवर (Waiting List) असेल तर विचारायलाच नको! मोबाईलच्या स्क्रीनवर 'WL 45' किंवा 'WL 15' असं काही दिसलं की मनात एकच प्रश्न येतो, 'चार्ट बनेपर्यंत सीट कन्फर्म होईल की नाही?' तुम्हीही ट्रेनचं तिकीट बुक केलं असेल आणि ते वेटिंगवर असेल, तर टेन्शन घेऊ नका. आज आम्ही तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगणार आहोत की तुम्ही फक्त १ मिनिटात तुमच्या मोबाईलवरून PNR स्टेटस कसं तपासू शकता. सोबतच, तुमची सीट कन्फर्म होण्याची शक्यता किती आहे, हेही जाणून घेऊया...

PNR नंबर म्हणजे काय आणि तो कुठे असतो?
PNR चा फुल फॉर्म 'पॅसेंजर नेम रेकॉर्ड' (Passenger Name Record) असा आहे. हा १० अंकी एक युनिक नंबर असतो. जेव्हा तुम्ही रेल्वे काऊंटरवरून किंवा IRCTC ॲपवरून तिकीट बुक करता, तेव्हा हा नंबर तुमच्या तिकीटावर डाव्या बाजूला सर्वात वर दिलेला असतो. ऑनलाइन तिकीट काढल्यास तो तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि ईमेलवरही पाठवला जातो. या एका नंबरमध्ये तुमच्या प्रवासाची, ट्रेनची, कोचची आणि सीटची संपूर्ण माहिती असते.
PNR स्टेटस तपासण्याचे ३ सर्वात सोपे आणि फास्ट मार्ग
IRCTC वेबसाइटवरून
- सर्वात आधी IRCTC ची अधिकृत वेबसाइट उघडा.
- PNR Status या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा १० अंकी PNR नंबर टाका.
- Check Status वर क्लिक करा.
- तुम्हाला लगेच पूर्ण स्टेटस दिसेल.
IRCTC ॲपवरून
- IRCTC Rail Connect किंवा इतर कोणतंही ट्रेन ॲप उघडा.
- 'Train' सेक्शनमध्ये जाऊन 'PNR Enquiry' वर क्लिक करा.
- तुमचा नंबर टाकून सर्च करा.
- इथे तुम्हाला सध्याच्या स्टेटससोबत तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता (Probability) किती आहे, याचाही अंदाज येतो.
इंटरनेटशिवाय SMS ने
- जर इंटरनेट नसेल, तरीही तुम्ही PNR स्टेटस तपासू शकता.
- तुमच्या मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन PNR
तुमचा १० अंकी नंबर टाईप करा. - हा मेसेज 139 या रेल्वेच्या नंबरवर पाठवा.
- लगेच तुमच्या फोनवर PNR चं सध्याचं स्टेटस येईल.
ट्रेनच्या तिकीटावरील कोडचा अर्थ
CNF - Confirmed म्हणजे तुमची सीट पक्की झाली आहे.
RAC - Reservation Against Cancellation म्हणजे अर्धी सीट मिळाली आहे.
WL, GNWL - वेटिंग लिस्ट म्हणजे अजून कोणतीही सीट मिळालेली नाही.
ट्रेनचं तिकीट कन्फर्म होणार की नाही?
हे पूर्णपणे किती सीट रिकाम्या आहेत, किती लोक तिकीट रद्द करतात, ट्रेनचा चार्ट कधी तयार होतो आणि तुमचा वेटिंग नंबर किती आहे यावर अवलंबून असतं. साधारणपणे, चार्ट तयार झाल्यावरच फायनल स्टेटस समजतं. वेटिंग तिकीट कन्फर्म होण्याच्या शक्यतेबद्दल बोलायचं झाल्यास, जर तुमचं तिकीट WL 1 ते WL 20 च्या दरम्यान असेल, तर कन्फर्म होण्याची शक्यता जास्त असते. WL 20 पेक्षा जास्त असेल, तर धोका वाढतो. RAC असेल तर बहुतेक वेळा सीट मिळतेच.


