सार
Hidden Camera Find Tricks : बंगळुरु येथील कॉफी शॉपच्या वॉशरुममध्ये हिडन कॅमेरा लावला होता. अशातच हिडन कॅमेरा कसा शोधून काढायचा याबद्दलच्या काही ट्रिक्स जाणून घेऊया...
Hidden Camera Find Tricks : तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला जात असल्यास तेथे राहण्यासाठी हॉटेलमध्ये खोली बुकिंग करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. यावेळी खोलीतील हिडन कॅमेरा आहे की नाही हे तपासून पहा. आता बहुतांशजणांना प्रश्न पडला असेल हिडन कॅमेरा कसा शोधून काढावा याबद्दलच्या काही सोप्या ट्रिक्स जाणून घेऊया...
स्मार्टफोनच्या मदतीने असा शोधून काढा हिडन कॅमेरा
स्मार्टफोनमध्ये काही कॅमेरा आणि सेंसरचा ऑप्शन असतो. यामुळे काही गोष्टींपासून सुरक्षित राहण्यास मदत होऊ शकते. स्पाय कॅमेरा आणि सिक्युरिटी कॅमेरा तुम्ही फोनच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून शोधू शकता. यासाठी कॅमेरा सुरू करा आणि एखाद्या ठिकाणी पेटती लाइट दिसतेय का हे शोधा. तर पेटती लाइट दिसल्यास तेथे हिडन कॅमेरा असण्याची शक्यता आहे.
पंख्यामध्ये लपवलेला असू शकतो कॅमेरा
पंख्यामध्ये हलक्या छिद्रांमधून लाल रंगातील लाइट येतेय की नाही हे तपासून पाहा. यासाठी टॉर्च अथवा मोबाइलच्या लाइटचा वापर करू शकता. जर लाल रंगातील लाइट येत असल्यास तेथे हिडन कॅमेरा असू शकतो.
इलेक्ट्रिक वस्तू तपासून पाहा
हिडन कॅमेरा शोधण्यासाठी खोलीतील इलेक्ट्रिक वस्तू तपासून पाहा. येथून लाल रंगातील लाइट येत असल्याचे तेथे हिडन कॅमेरा असण्याची शक्यता आहे.
फायर अलार्म आणि स्मोक डिटेक्टर्स
फायर अलार्म आणि स्मोक डिटेक्टर्समध्ये हिडन कॅमेरा लावणे सामान्य बाब आहे. येथेही हिडन कॅमेरा आहे का तपासून पाहू शकता.
दरवाज्याचे हँडल तपासून पाहा
दरवाज्याच्या हँडलमध्येही हिडन कॅमेरा लावल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशातच हिडन कॅमेरा डिडेक्टरच्या मदतीने कॅमेरा शोधून काढू शकता.
लाइट बंद करुन शोधा कॅमेरा
कॅमेऱ्याची लाल लाइट शोधून काढण्यासाठी रात्रीच्या वेळेस अथवा खोलीतील सर्व लाइट्स बंद करुन पाहा. यावेळी लाल रंगातील लाइटची किरणे दिसून येत असल्यास तेथे हिडन कॅमेरा असू शकतो.
आणखी वाचा :
शूज साफ करण्यापासून ते लिपस्टिकचे डाग काढण्यापर्यंत, टूथपेस्टचे 11 उपयोग
SIP च्या 5 चुका तुम्हाला आणतील रस्त्यावर, मग तुमची हुशारी पण येणार नाही कामाला