- Home
- Utility News
- Honda Activa GST Cut : नवरात्रीला बहिणीला-पत्नीला घेऊन द्या होंडा अॅक्टिवा, पाहा बंपर डिस्काईंट असलेली नवीन किंमत!
Honda Activa GST Cut : नवरात्रीला बहिणीला-पत्नीला घेऊन द्या होंडा अॅक्टिवा, पाहा बंपर डिस्काईंट असलेली नवीन किंमत!
Honda Activa GST Cut मुळे होंडा ॲक्टिव्हा आता स्वस्त झाली आहे, इथे पाहा नवीन किमतींची यादी. GST कमी झाल्यामुळे स्कूटरच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी होत आहेत. लोकप्रिय आणि सर्वाधिक विकली जाणारी होंडा ॲक्टिव्हा आता स्वस्त दरात उपलब्ध आहे.

18 हजारांपेक्षा जास्त सूट
केंद्र सरकारने देशभरात जीएसटी कमी करण्याचा एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेक वस्तूंच्या किमती कमी होत आहेत. विशेषतः, वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण अनेक वाहनांच्या किमती खूप कमी होत आहेत. यामध्ये होंडा स्कूटर आणि बाईकच्या किमतीही कमी होत आहेत. होंडा स्कूटर आणि बाईकवर 18 हजार रुपयांपेक्षा जास्त सूट मिळत आहे.
होंडा ॲक्टिव्हाची किंमत
होंडा ॲक्टिव्हाच्या किमतीत मोठी घट झाली आहे. विशेषतः होंडा ॲक्टिव्हा 110 स्कूटरची किंमत 7,874 रुपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे होंडा ॲक्टिव्हा आता स्वस्त दरात उपलब्ध आहे. होंडा ॲक्टिव्हाच्या नावावर भारतात सर्वाधिक विक्रीचा विक्रम आहे. आता या किमतीतील कपातीमुळे ग्राहकांना खरेदीसाठी आणखी प्रोत्साहन मिळेल.
होंडा ॲक्टिव्हा 125
होंडा ॲक्टिव्हाच्या दुसऱ्या व्हेरिएंट 125 स्कूटरची किंमतही कमी झाली आहे. 125 स्कूटरची किंमत 8,259 रुपयांनी कमी झाली आहे. तर, होंडा डिओ 110 स्कूटरच्या किमतीत 7,157 रुपयांची कपात झाली आहे. होंडा डिओ 125 स्कूटरची किंमत 8,042 रुपयांनी कमी झाली आहे.
होंडा बाईकच्या किमतीतही घट
होंडा शाईन 100 बाईकची किंमत 5,672 रुपयांनी कमी झाली आहे. तर होंडा शाईन 100 डीएक्स बाईकची किंमत 6,256 रुपयांनी कमी झाली आहे. होंडा लिवो 110 बाईकची किंमत 7,165 रुपयांनी कमी झाली आहे. होंडा शाईन 125 बाईकची किंमत 7,443 रुपयांनी कमी झाली आहे.
होंडा एसपी ते सीबी 350
होंडा एसपी 125 बाईकची किंमत 8,447 रुपयांनी कमी झाली आहे. तर होंडा सीबी 125 हॉर्नेट बाईकची किंमत 9,229 रुपयांनी कमी झाली आहे. होंडा युनिकॉर्नची किंमत 9,948 रुपयांनी कमी झाली आहे. होंडा एनएक्स 200 बाईकची किंमत 13,978 रुपयांनी कमी झाली आहे. होंडा सीबी 250 हायनेसची किंमत 18,598 रुपये आणि सीबी 350 आरएसची किंमत 18,857 रुपयांनी कमी झाली आहे.

