HMD Skyline स्मार्टफोनमध्ये मिळणार 108MP कॅमेऱ्यासह धमाकेदार फीचर्स, जाणून घ्या खासियत

| Published : Jun 10 2024, 11:41 AM IST

HMD Skyline

सार

नोकिया फोन तयार करणारी कंपनी नवे डिवाइस लाँच करण्याच्या तयारीत आहे. याचे डिझाइन Nokia Lumia 920 सारखे असल्याचे बोलले जात आहे. जाणून घेऊया स्मार्टफोनच्या किंमतीसह अन्य खासयित सविस्तर...

HMD Skyline Features and Price : नोकियाचे फोन तयारी करणारी कंपनी HMD ग्लोबल लवकरच HMD Skyline नावाचा फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा स्मार्टफोन नोकिया लूमिया 920 स्मार्टफोनच्या डिझाइनसारखाच असण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यातच कंपनीने 90 च्या दशकातील क्लासिक नोकिया 3210 स्मार्टफोनमध्ये मोठे अपडेट दिले आहेत.

HMD स्कायलाइनसंदर्भात सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करण्यात आली आहे. यामध्ये एचएमडी स्कायलाइन रेंडर शेअर करत फोनचे डिझाइन झळकवण्यात आले आहे. या रेंडरला पाहून म्हटले जाऊ शकते फोनमध्ये Fabula डिझाइन लँग्वेंज असू शकते. नोकिया कंपनीने फॅब्यूला डिझाइन लँग्वेज Nokia N9 फोनमध्येही दिले होते.

फोनमधील स्पेसिफिकेशन
HMD Skyline च्या स्पेसिफिकेशनबद्दल अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण काही रिपोर्ट्सनुसार, फोनमध्ये फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, Qualcomm Snapdragon 7s Gen 2 SoC असे फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.

फोनमध्ये 108 मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेऱ्यासह अल्ट्रावाइड लेंस, मॅक्रो आणि डेप्थ सेंसरही मिळू शकतो. सेल्फीसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सल कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. एचएमडी स्कायलाइन फोनमध्ये 4900mAh बॅटरी दिली जाणार असून 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. याशिवाय फोन Android14 OS सह येणार आहे.

किंमत आणि लाँचिंग तारीख
HMD Skyline स्मार्टफोनची किंमत 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटसाठी €520 (जवळजवळ 46,926 हजार रुपये) असण्याची शक्यता आहे. फोनच्या लाँचिंगबद्दल बोलायचे झाल्यास येत्या जुलैमध्ये होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा : 

गुगलने सुरू केला मोफत एआय कोर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित शिकवल्या जाणार या गोष्टी

Android युजर्ससाठी आनंदाची बातमी, गुगल लाँच करणार हे धमाकेदार फीचर्स