आजकाल अनेकांमध्ये किडनी स्टोन म्हणजेच मुतखड्याची समस्या दिसून येते. किडनी स्टोन टाळण्यासाठी दैनंदिन जीवनात सात गोष्टी गोष्टी करायला हव्यात. त्या कोणत्या ते जाणून घेऊया.
एक छोटासा खडाही पोटात, कंबरेत किंवा पाठीत असह्य वेदना निर्माण करू शकतो. हा प्रकार म्हणजे किडनी स्टोन. या मुतखडा असेही म्हटले जाते. आजकाल अनेकांमध्ये किडनी स्टोनची समस्या दिसून येते. किडनी स्टोन टाळण्यासाठी काय गोष्टी करायला हव्यात, ते जाणून घेऊया.
1. पाणी
भरपूर पाणी प्यायल्याने किडनी स्टोन टाळण्यास मदत होते. त्यामुळे भरपूर पाणी प्या. म्हणजे लघवी फिकट पिवळी/पारदर्शक राहील इतके पाणी घ्या. हे शरीराच्या एकूण आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
2. मिठाचा वापर
मिठाच्या अतिवापरामुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो. त्यामुळे आहारात मिठाचे प्रमाण कमी करा.
3. साखरेचा अतिवापर
आहारातून साखरेचा अतिवापर देखील टाळा.
4. कृत्रिम शीतपेये
कोलासह कृत्रिम शीतपेये देखील आहारातून शक्यतो टाळावीत.
5. आरोग्यदायी आहार
आरोग्यदायी आहार पद्धतीचा अवलंब केल्यास किडनीमध्ये स्टोन जमा होण्यास प्रतिबंध होतो.
6. अतिरिक्त वजन कमी करा
जास्त वजन कमी केल्यानेही किडनी स्टोनला प्रतिबंध करण्यास मदत होते.
7. व्यायाम
नियमित व्यायाम करा. हे शरीराच्या एकूण आरोग्यासाठी चांगले आहे.


