Kidney Health Tips: किडनी सुरक्षित ठेवायची आहे?, मग ‘या’ गोष्टी आजपासूनच करून पाहा!
Kidney Health Tips: सध्या किडनीच्या आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढत असून यामागे अनियमित जीवनशैली, चुकीचे खानपान आणि पाण्याचे अपुरे सेवन ही प्रमुख कारणे आहेत. किडनीचं आरोग्य टिकवण्यासाठी योग्य सवयी अंगीकारणं गरजेचं आहे.

किडनी सुरक्षित ठेवण्यासाठी 'या' गोष्टी करून पाहा
किडनीच्या आरोग्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, हे जाणून घेऊया.
शाकाहारी पदार्थ आणि फायबर
किडनीच्या आरोग्यासाठी सर्वात आधी खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. यासाठी आहारात शाकाहारी आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा.
मीठ आणि साखरेचे प्रमाण कमी करा
आहारातील मीठ आणि साखरेचे प्रमाण कमी करणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे किडनी स्टोनचा धोका कमी होतो.
भरपूर पाणी प्या
पाणी प्यायल्याने किडनी स्टोनचा धोका कमी होतो. निरोगी व्यक्तीने दिवसातून ८ ते १० ग्लास पाणी प्यावे, असे डॉक्टर सांगतात.
धूम्रपान करणे सोडा
धूम्रपान पूर्णपणे सोडा. धूम्रपानामुळे शरीरातील रक्तवाहिन्यांचे नुकसान होते. यामुळे रक्तप्रवाह मंदावतो आणि किडनी खराब होऊ शकते.
मद्यपान करणे टाळा
मद्यपान टाळणे देखील किडनीच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
या आजारांवर नियंत्रण ठेवा
मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारखे आजारही किडनीच्या कार्यावर परिणाम करू शकतात. त्यामुळे या आजारांना नियंत्रणात ठेवा.
शरीराचे वजन नियंत्रणात ठेवा
जास्त वजन असलेल्या लोकांच्या किडनीचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीराचे वजन नियंत्रणात ठेवा.
नियमित व्यायाम करा
नियमित व्यायाम करण्याची सवय लावा. व्यायाम करणे किडनीच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.