Health Tips: दिवसभरात 'या' वेळी प्यायलेलं पाणी ठरतं अमृतासमान, जाणून घ्या माहिती
Health Tips : पाण्याला जीवन असे म्हटले जाते. ते दिवसभरात आपण कधीही सोयीनुसार पिऊ शकतो. पण, कोणत्या वेळी प्यायलेलं पाणी अमृतासारखं काम करतं हे तुम्हाला माहीत आहे का? आरोग्यासाठी हितकारक वेळ नक्की कोणती, ते जाणून घ्या…

पाणी हे पृथ्वीवरील अमृत आहे, हे अनेकांना माहीत आहे. पाणी सर्वजण पितात.
पण, पाणी कोणत्या वेळी प्यावे आणि कोणत्या वेळी पिऊ नये, हे अनेकांना माहीत नसते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जेवणानंतर किंवा नाश्त्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. पोट भरल्यानंतर किमान ३० मिनिटांनी पाणी प्यावे.
एकाच वेळी जास्त पाणी पिण्याऐवजी, एका वेळी एक ग्लास किंवा तहान लागेल तेवढेच पाणी पिणे चांगले आहे, असे आरोग्य शास्त्र सांगते.
पाणी म्हणजे ते शुद्धच असले पाहिजे. अशुद्ध पाणी पिऊन आरोग्य आणि पोट खराब करू नये.
तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. स्टीलचे भांडेही चालेल, असे म्हटले जाते.
अनेक गावांमध्ये पाणी माठात किंवा तांब्याच्या भांड्यात साठवतात. पण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात माठातील थंड पाणी पिणे टाळावे. सामान्य तापमानाचे पाणी पिणे उत्तम.
रात्रीच्या वेळी आवश्यक तेवढेच पाणी प्यावे. झोपण्याच्या २ तास आधीच आवश्यक पाणी पिऊन घ्यावे. झोपताना जास्त पाणी प्यायल्यास रात्री झोपमोड होऊ शकते.
सकाळी उठल्यावर पाणी पिणे अमृतासमान आहे. रात्रभर झालेल्या पाण्याच्या वापरामुळे सकाळी शरीराला पाण्याची गरज असते. यावेळी प्यायलेले पाणी 'अमृता'सारखे काम करते. म्हणून सकाळी उठल्यावर पाणी प्या.

