Health care : काही ठिकाणी दूषित पाण्याचा पुरवठा होतो. दूषित पाणी प्यायल्याने गंभीर आरोग्य समस्या निर्माण होतात. उलट्या, जुलाब, डिहायड्रेशन, ताप यांसारख्या अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात. तुम्ही काळजी घेणे आवश्यक आहे.

Health care : हिवाळा हा शारीरिक स्वास्थ्याच्या दृष्टीने हितकारक समजला जातो. या काळात श्वसनविकार तसेच कफ प्रकृतीच्या व्यक्तींची दुखणी अधिक बळावतात. मात्र, काही वेळेस इतर गोष्टींचेही निमित्त होते. काही आजरांचे धोके उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूत समानच असतात. विशेषत:, दूषित अन्न आणि दूषित पाणी. आहारावर नियंत्रण ठेवता येते, पण पाण्यावर काही उपाय आहे का? याबद्ददलच माहिती जाणून घेऊया - 

दूषित पाणी प्यायल्याने गंभीर आरोग्य समस्या निर्माण होतात. अनेकदा रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येते. दूषित पाणी प्यायल्याने कोणत्या समस्या होतात, ते जाणून घेऊया.

1. दूषित पाणी प्यायल्याने जुलाब आणि उलट्या होतात, ज्यामुळे शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते. याशिवाय पोटदुखी, ताप आणि थकवा येण्याची शक्यताही जास्त असते.

2. दूषित पाणी प्यायल्याने लहान मुले, वृद्ध, गर्भवती आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता जास्त असते. यामुळे शरीरात डिहायड्रेशन होऊन गंभीर आजार होऊ शकतात.

3. नियमितपणे दूषित पाणी प्यायल्याने दीर्घकाळ टिकणारे आजार होण्याची शक्यता असते. यामुळे तुमचे यकृत आणि किडनी खराब होऊ शकते. दूषित पाणी प्यायल्याने कॅन्सरचा धोकाही वाढतो.

4. दूषित पाणी प्यायल्याने जलजन्य आजार होतात. पाणी प्यायल्यानंतर काही वेळातच उलट्या आणि जुलाब होत असतील तर लक्ष देणे आवश्यक आहे. तर काही प्रकरणांमध्ये, पाणी प्यायल्यानंतर काही आठवड्यांनी लक्षणे दिसू लागतात.

5. नेहमी उकळून थंड केलेले पाणी पिण्याची सवय लावा. पिण्याचे पाणी स्वच्छ ठिकाणी साठवावे. नेहमी घर आणि परिसर स्वच्छ ठेवा.