Health care : सकाळी उठल्यावर पाठदुखी हैरण करते? जाणून घ्या कारण, लगेच सवयी बदला!
Health care : दिवसभराच्या श्रमांनंतर रात्रभर चांगली झोप घेऊनही सकाळी उठल्यावर पाठदुखीने हैराण होता का? याची कारणं येथे जाणून घ्या आणि काही सवयी देखील बदला.

सकाळच्या पाठदुखीची कारणे
'रात्री चांगली झोप लागते पण सकाळी पाठ दुखते' अशी तक्रार काहीजण करतात. तुम्हालाही रोज हाच त्रास होतो का? तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. रोज सकाळी उठल्यावर पाठदुखी का होते, याची कारणे आता आपण येथे पाहूया.
झोपण्याची पद्धत
रात्री चांगली झोप घेऊनही सकाळी पाठ दुखण्याचे मुख्य कारण म्हणजे चुकीच्या पद्धतीने झोपणे. तसेच, उशीचा योग्य वापर न करणे, हे देखील एक कारण आहे. त्यामुळे, तुमची झोपण्याची पद्धत आणि उशी ठेवण्याची पद्धत योग्य असेल, तर सकाळी उठल्यावर पाठदुखी होणार नाही.
कोणत्या स्थितीत झोपावे?
एका कुशीवर झोपल्यास पाठदुखी आणि कंबरदुखी कमी होते. पण, 'मला सरळ झोपायची सवय आहे, कुशीवर झोप येत नाही' अशी तुमची तक्रार आहे का? तर तुम्ही गुडघ्याखाली उशी ठेवून झोपा. यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी आराम मिळेल.
खराब गादीवर झोपणे
सकाळी उठल्यावर पाठदुखीने त्रस्त असाल, तर याला तुमची गादी जबाबदार आहे, असं सांगितलं तर विश्वास बसेल का? पण हे खरं आहे. हो, खराब क्वालिटीची गादी वापरल्यास सकाळी उठल्यावर पाठ दुखते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी चांगली गादी खरेदी करा. यामुळे वेदना होणार नाहीत आणि रात्रभर शांत झोप लागेल.
हे लक्षात ठेवा:
- ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे, त्यांनी पोटावर झोपणे टाळावे. या स्थितीत झोपल्याने वेदना आणखी वाढू शकतात.
- बसण्याची स्थिती बदलल्यास वेदना पूर्णपणे नियंत्रणात आणता येतात. त्यामुळे बसताना नेहमी ताठ बसा. तसेच चालताना वाकून न चालता सरळ चाला.
- पाठदुखी कमी करण्यासाठी काही व्यायाम केल्यास वेदना कमी होऊ शकतात.

