कंबर आणि पाठ दुखण्याने अनेक लोक त्रस्त असतात, आणि यामुळे रोजच्या कामातही अडचणी येतात. परंतु घाबरू नका, तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करून यावर आराम मिळवू शकता!
पाठीच्या, कंबरेच्या वेदनेवर व्यायाम एक प्रभावी उपाय ठरू शकतो. हलक्या योगासना, स्ट्रेचिंगमुळे स्नायूंना आराम मिळतो. वेदनाही कमी होतात. एक साधा व्यायाम दिवसाच्या सुरुवातीला करा.
अपघात झाल्यावर किंवा ताणमुळे कंबर दुखत असेल, तर बर्फाचा शेक उपयोगी पडतो. बर्फामुळे रक्त गोठते आणि आराम मिळतो. तसेच गरम पाण्याचा शेक दिल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि कंबरला आराम मिळतो
एका जागी बसून, झोपताना चुकीची स्थिती ठेवली की, कंबरवर ताण येतो. यामुळे वेदना वाढू शकतात. योग्य पद्धतीने झोपणे, पाठीला सरळ ठेवणे महत्त्वाचे आहे. काम करताना खूप वेळ बसून राहणे टाळा!
तुमच्या शरीरातील वेदनांना मानसिक तणाव कारणीभूत ठरू शकतो. मानसिक आरोग्याची काळजी घ्या, तणाव कमी करण्यासाठी ध्यान, योग, विश्रांती घ्या. तुमच्या शरीराचे स्नायू देखील रिलॅक्स होतात
कंबर, पाठ दुखण्यावर झोपेचा थोडा जास्त प्रभाव आहे. तज्ज्ञांच्या मते, कमी झोप घेतल्याने वेदना वाढू शकतात. ७ ते ८ तासांची झोप घ्या, त्यामुळे तुमच्या शरीराचे स्नायू आराम करतील.