MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Social Media Age Verification India: सोशल मीडिया वापरण्यासाठी आता सांगावं लागणार 'वय'! केंद्र सरकारचा मोठा प्लॅन; लहान मुलांसाठी येणार कडक नियम?

Social Media Age Verification India: सोशल मीडिया वापरण्यासाठी आता सांगावं लागणार 'वय'! केंद्र सरकारचा मोठा प्लॅन; लहान मुलांसाठी येणार कडक नियम?

Social Media Age Verification India: केंद्र सरकार अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापरासाठी नवीन नियम आणण्याच्या तयारीत आहे. सायबर गुन्हेगारीपासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी 'एज-व्हेरिफिकेशन' आणि पॅरेंटल कंट्रोलसारख्या उपायांचा विचार केला जात आहे. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 30 2026, 07:04 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
सोशल मीडिया वापरण्यासाठी आता सांगावं लागणार 'वय'! केंद्र सरकारचा मोठा प्लॅन
Image Credit : stockPhoto

सोशल मीडिया वापरण्यासाठी आता सांगावं लागणार 'वय'! केंद्र सरकारचा मोठा प्लॅन

दिल्ली: फेसबुक, इन्स्टाग्राम आणि युट्यूबवर तासनतास वेळ घालवणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार आता कंबर कसणार आहे. लहान मुलांना सायबर गुन्हेगारी आणि चुकीच्या मजकुरापासून वाचवण्यासाठी सरकार 'एज-व्हेरिफिकेशन' (वयाची पडताळणी) यांसारख्या कडक नियमांचा विचार करत आहे. केवळ पूर्णपणे बंदी घालण्यापेक्षा, वयानुसार फीचर्सवर मर्यादा घालण्याचे मॉडेल सरकारसमोर आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
नेमकी योजना काय आहे?
Image Credit : Asianet News

नेमकी योजना काय आहे?

सध्या अनेक मुले खोटी जन्मतारीख टाकून सोशल मीडियावर अकाउंट उघडतात. हे रोखण्यासाठी सरकार उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करत आहे. यामध्ये खालील पर्यायांवर विचार सुरू आहे.

पॅरेंटल कंट्रोल: मुलांच्या अकाउंटवर पालकांचे नियंत्रण असणे.

स्क्रीन टाइम लिमिट: ठराविक वेळेनंतर ॲप आपोआप बंद होणे.

फीचर्सवर मर्यादा: १३ वर्षांखालील आणि १६ वर्षांखालील मुलांसाठी काही ठराविक फीचर्स (उदा. डायरेक्ट मेसेज किंवा रिल्स) ब्लॉक करणे.

प्लॅटफॉर्मची जबाबदारी: सोशल मीडिया कंपन्यांनी युझरचे वय तपासण्यासाठी अधिक सक्षम यंत्रणा राबवणे. 

Related Articles

Related image1
वाहनधारकांना झटका! १ एप्रिलपासून 'फास्टॅग' वार्षिक पास महागणार; पैसे वाचवण्यासाठी उरले फक्त काही तास!
Related image2
MHADA Mumbai Lottery 2026: मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार साकार! म्हाडाची २६४० घरांसाठी मोठी लॉटरी; आजपासूनच करा अर्ज!
34
नियम लागू करताना 'ही' आहेत मोठी आव्हाने
Image Credit : Asianet News

नियम लागू करताना 'ही' आहेत मोठी आव्हाने

सरकार यावर संतुलित मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असले, तरी तज्ज्ञांच्या मते काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात.

१. ग्रामीण भाग: अनेक गरीब कुटुंबांत एकच फोन पूर्ण कुटुंब वापरते, अशा वेळी 'युझर' नक्की कोण आहे (पालक की मूल) हे ओळखणे कठीण होईल.

२. प्रायव्हसी: वय तपासण्यासाठी ओळखपत्र मागितल्यास युझर्सच्या गोपनीयतेचा (Privacy) प्रश्न निर्माण होऊ शकतो.

३. डिजिटल ॲक्सेस: कडक नियमांमुळे मुलांचा माहिती मिळवण्याचा अधिकार मर्यादित होईल का? यावरही चर्चा सुरू आहे. 

44
काय बदलू शकतं?
Image Credit : Getty

काय बदलू शकतं?

आयटी (IT) नियमांमध्ये बदल करून सरकार हे नवीन नियम लागू करू शकते. सध्यातरी १६ ते १८ वर्षे वयोगटासाठी वेगळे नियम असावेत का, यावर अंतिम निर्णय झालेला नाही. सरकार सर्व बाजूंचा विचार करूनच यावर अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या
Recommended Stories
Recommended image1
Double Braids: १८+ मुलींमध्ये डबल वेणीचा ट्रेंड, नव्या हेअरस्टाईलने वाढवतेय सौंदर्य
Recommended image2
Home Decor Under 500: फक्त ५०० रुपयांत जुन्या घराला द्या नवा, प्रीमियम लुक!
Recommended image3
Butterfly Garden: तुमच्या बागेतही दिसेल फुलपाखरं आणि पक्षांचा थवा, फक्त या सोप्या गोष्टी करा
Recommended image4
Rose Plant Care: गुलाबावरची कीड घालवण्यासाठी वापरा हे ४ उपाय, फुलं पुन्हा टवटवीत होतील!
Recommended image5
Bugadi Designs: कान न टोचता घाला स्टायलिश बुगडी, 200 रुपयांत मिळतील 10 आकर्षक डिझाइन्स
Related Stories
Recommended image1
वाहनधारकांना झटका! १ एप्रिलपासून 'फास्टॅग' वार्षिक पास महागणार; पैसे वाचवण्यासाठी उरले फक्त काही तास!
Recommended image2
MHADA Mumbai Lottery 2026: मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार साकार! म्हाडाची २६४० घरांसाठी मोठी लॉटरी; आजपासूनच करा अर्ज!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved