MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • वाहनधारकांना झटका! १ एप्रिलपासून 'फास्टॅग' वार्षिक पास महागणार; पैसे वाचवण्यासाठी उरले फक्त काही तास!

वाहनधारकांना झटका! १ एप्रिलपासून 'फास्टॅग' वार्षिक पास महागणार; पैसे वाचवण्यासाठी उरले फक्त काही तास!

FASTag annual pass price hike: नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने (NHAI) फास्टॅग वार्षिक पासच्या दरात वाढ केली आहे, जे १ एप्रिल २०२६ पासून लागू होईल. या पासची किंमत ७५ रुपयांनी वाढून ३,०७५ रुपये होणार आहे. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 30 2026, 05:59 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
वाहनधारकांना झटका! १ एप्रिलपासून 'फास्टॅग' वार्षिक पास महागणार
Image Credit : Google

वाहनधारकांना झटका! १ एप्रिलपासून 'फास्टॅग' वार्षिक पास महागणार

FASTag Annual Pass Price Hike: नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने (NHAI) फास्टॅग अॅन्युअल पासच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिल २०२६ पासून हे नवीन दर देशभर लागू होतील. जर तुम्हीही महामार्गावर वारंवार प्रवास करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 

25
किती रुपयांनी वाढला भाव?
Image Credit : Freepik

किती रुपयांनी वाढला भाव?

टोल टॅक्सवर बचत करण्यासाठी अनेकजण फास्टॅगचा वार्षिक पास (Annual Pass) वापरतात. या पासच्या किमतीत झालेली वाढ खालीलप्रमाणे आहे:

जुना दर: ३,००० रुपये.

नवीन दर (१ एप्रिलपासून): ३,०७५ रुपये.

वाढ: ७५ रुपये.

१५ ऑगस्ट २०२५ रोजी लाँच झाल्यापासून हा पास खाजगी वाहनधारकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला असून, सध्या देशातील सुमारे ५६ लाख वाहने या सुविधेचा लाभ घेत आहेत. 

Related Articles

Related image1
शेतकऱ्यांची दिवाळी! २ लाखांच्या कर्जमाफीत आता 'या' मोठ्या कर्जांचाही समावेश; २४ लाख शेतकऱ्यांना थेट फायदा!
Related image2
MHADA Mumbai Lottery 2026: मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार साकार! म्हाडाची २६४० घरांसाठी मोठी लॉटरी; आजपासूनच करा अर्ज!
35
अजूनही संधी आहे! असे वाचवा ७५ रुपये
Image Credit : Google

अजूनही संधी आहे! असे वाचवा ७५ रुपये

जर तुमच्या पासचे नूतनीकरण (Renewal) जवळ आले असेल किंवा तुम्हाला नवीन पास घ्यायचा असेल, तर ३१ मार्चच्या रात्री ११:५९ वाजेपर्यंत तुम्ही जुन्या दरात म्हणजेच ३,००० रुपयांत हा पास खरेदी करू शकता. १ एप्रिलची पहाट होताच तुम्हाला वाढीव किंमत मोजावी लागेल. 

45
घरबसल्या पास कसा खरेदी/रिन्यू कराल?
Image Credit : Gemini AI

घरबसल्या पास कसा खरेदी/रिन्यू कराल?

तुम्ही 'राजमार्ग यात्रा' अॅप किंवा NHAI च्या अधिकृत वेबसाइटवरून काही मिनिटांत हा पास मिळवू शकता.

१. NHAI वेबसाइटवरून अधिकृत वेबसाइटवर जाऊन लॉग-इन करा.

मेन्यूमध्ये ‘FASTag Annual Pass’ पर्याय निवडा.

वाहनाची माहिती भरून पात्रता तपासा आणि ऑनलाइन पेमेंट करा.

२. 'राजमार्ग यात्रा' (Rajmarg Yatra) अॅपवरून

अॅप डाऊनलोड करून मोबाईल नंबरने लॉग-इन करा.

तुमचा फास्टॅग लिंक करा आणि 'Annual Pass' सेक्शनमध्ये जा.

पेमेंट यशस्वी होताच तुमचा पास त्वरित ॲक्टिव्हेट होईल. 

55
महत्त्वाची टीप
Image Credit : Asianet News

महत्त्वाची टीप

नवीन दर आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी लागू असतील. तांत्रिक अडथळे टाळण्यासाठी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता आजच आपला पास अपडेट करून घ्या.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
High-Paying Job: वर्षातून फक्त 2 दिवस काम, पगार 1 कोटी! 2000 फुटांवर तुम्ही हे काम करू शकाल का?
Recommended image2
Pahadi Earrings: चांदबालीपासून झुमक्यांपर्यंत, पाहा एकापेक्षा एक हटके डिझाइन्स
Recommended image3
Maangtika for Kids: लहान मुलींसाठी 6 क्युट आणि सिंपल मांगटिका, प्रत्येक फंक्शनमध्ये तुमची परी दिसेल राजकुमारी
Recommended image4
Filigree Earrings: हवा खेळती राहील, घामाचा त्रास नाही! उन्हाळ्यासाठी वापरा 'या' 6 जाळीदार इअररिंग्स
Recommended image5
Summer Fruits: उन्हाळ्यात आवर्जून खावीत अशी ७ फळं, शरीर राहील हायड्रेटेड आणि निरोगी
Related Stories
Recommended image1
शेतकऱ्यांची दिवाळी! २ लाखांच्या कर्जमाफीत आता 'या' मोठ्या कर्जांचाही समावेश; २४ लाख शेतकऱ्यांना थेट फायदा!
Recommended image2
MHADA Mumbai Lottery 2026: मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार साकार! म्हाडाची २६४० घरांसाठी मोठी लॉटरी; आजपासूनच करा अर्ज!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved