Gold Rate Fall Today 18 November 2026 : सोने दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या आठवडाभरात सोनं १३ हजारांनी स्वस्त झालं आहे. तसंच मागील ११ महिन्यांनंतर आज सर्वाधिक उच्चांकावरुन दर घसरला आहे.

मुंबई : सोन्याचे दर सतत वाढत आहेत. अशात सोनं खरेदी करणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं. मात्र आता सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर चांगली संधी आहे. सोने दराबाबत बराच काळानंतर दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोने दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी जवळपास ३००० हून अधिक कमी झाला आहे. मागील आठवडाभरापासून सोनं जवळपास १३ हजारांनी स्वस्त झालं आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सोने दर घसरण सुरू आहे.

मागील अनेक काळापासून सोन्याचा दर १ लाख ८० हजार ते १ लाख ५० हजारांपर्यंत होता. २ लाखांजवळ सोन्याचा दर पोहोचला होता. आता मात्र सोन्याचा भाव कमी झाला आहे. आज बुधवारी सोने दरात ३००० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याचा आताचा भाव १ लाख ३३ हजारांवर आला आहे. या घसरणीसह सोन्याचा दर सर्वाधिक उच्चांकावरुन खाली आला आहे. डिसेंबर २०२५ नंतर आज नोव्हेंबर २०२६ मध्ये सोनं ११ महिन्यांच्या कालावधीनंतर मोठ्या प्रमााणात स्वस्त झालं आहे.

मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा १ ग्रॅमचा दर १३,३२६ रुपये इतका आहे. तर २२ कॅरेटचा १ ग्रॅमसाठीचा भाव १२,२१५ इतका आहे.

दरम्यान, दर सतत कमी होत असल्याने सोने खरेदी करणाऱ्यांसाठी, तसंच विवाहसोहळ्यांसाठी दागिने खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. या घसरणीमुळे सर्वसामान्यांना मोठा फायदा होत आहे. मात्र, ज्यांनी यापूर्वी जवळपास १ लाख ८० हजारांच्या जवळपास सोनं खरेदी केलं होतं, ते या घसरणीमुळे चिंतेत आहेत.

सोने दरात घसरण होत असताना दुसरीकडे चांदीचा दर स्थिर आहे. मुंबईत चांदीच्या एक किलोसाठीचा दर १,७६,००० इतका आहे.