MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Train Rules : रात्री ट्रेनमध्ये प्रवास करताय? हे 5 नियम माहीत नसतील तर अडचण नक्की

Train Rules : रात्री ट्रेनमध्ये प्रवास करताय? हे 5 नियम माहीत नसतील तर अडचण नक्की

अनेकांना रात्री ट्रेनने प्रवास करायला आवडतं. पण रात्री ट्रेनमध्ये प्रवास करताना काही नियम पाळणं खूप गरजेचं आहे. नाहीतर तुम्हीच अडचणीत येऊ शकता.

2 Min read
Author : Karishma R
Published : Nov 18 2026, 11:37 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
12
तुम्हाला हे नियम माहीत आहेत का?
Image Credit : AI Image

तुम्हाला हे नियम माहीत आहेत का?

आपल्या देशात कोट्यवधी लोक प्रवासासाठी ट्रेनला पहिली पसंती देतात. दिवसाच्या प्रवासापेक्षा रात्रीचा प्रवास खूप शांत असतो. पण रात्री ट्रेनमध्ये प्रवास करताना सहप्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून भारतीय रेल्वे काही विशेष नियम राबवत आहे. रात्री ट्रेनमध्ये प्रवास करायचा असेल तर ५ नियम पाळणं बंधनकारक आहे. ते कोणते आहेत?

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
22
१. रात्री १० नंतर आवाजाचे प्रदूषण नको...
Image Credit : ఏఐ ఆధారంగా రూపొందించిన ప్రతీకాత్మక చిత్రం

१. रात्री १० नंतर आवाजाचे प्रदूषण नको...

रात्री १० वाजल्यानंतर सहप्रवाशांना त्रास होईल असं वागणं नियमांच्या विरोधात आहे. इअरफोनशिवाय लाउडस्पीकरवर गाणी ऐकणं, फोनवर मोठ्याने ओरडणं किंवा मोठ्याने बोलणं टाळावं. यामुळे झोपलेल्या इतर प्रवाशांना खूप त्रास होतो.

लाइट्सच्या वापरावर निर्बंध

रात्री सगळ्यांना शांतपणे झोपता यावं म्हणून फक्त 'नाईट लाईट' वापरावी. बाकीचे सर्व मुख्य दिवे बंद करणं चांगलं. मध्यरात्री प्रखर दिवे लावल्यास इतरांची झोपमोड होते.

मिडल बर्थचे नियम

ट्रेनमधील लोअर, मिडल आणि अप्पर बर्थच्या वाटपाबाबत स्पष्ट नियम आहेत. मिडल बर्थच्या प्रवाशांनी त्यांचा बर्थ फक्त रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत झोपण्यासाठी वापरावा. बाकीच्या वेळी मिडल बर्थ दुमडून ठेवावा. तसेच रात्री १० नंतर लोअर बर्थच्या प्रवाशांना त्रास होऊ न देण्याचे नियम पाळावेत.

रात्री जेवण ऑर्डर करताना..

बहुतांश गाड्यांमध्ये रात्री १० नंतर ऑनबोर्ड केटरिंग किंवा फूड सर्व्हिस थांबते. त्यामुळे रात्री भूक लागल्यास आधीच जेवणाची सोय करणं किंवा ई-केटरिंगद्वारे फूड ऑर्डर बुक करून तयार ठेवणं उत्तम.

मोबाईल, लॅपटॉप चार्जिंग..

सुरक्षेच्या कारणास्तव अनेक एक्स्प्रेस गाड्यांमध्ये रात्री ११ नंतर चार्जिंग पॉइंटवर वीजपुरवठा थांबवला जातो. त्यामुळे रात्री ११ पूर्वी तुमचे मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर गॅजेट्स चार्ज करून घेणं खूप महत्त्वाचं आहे.

ट्रेनचा प्रवास सगळ्यांचाच असतो.. सहप्रवाशांच्या सोयीचा आदर करत रेल्वेचे हे छोटे छोटे नियम पाळले तर आपला प्रवास अतिशय सुरक्षित आणि शांततेत पार पडेल.

Related Articles

Related image1
India Sri Lanka Distance : भारत आणि श्रीलंका यांच्यात फक्त 30 किलोमीटरचं अंतर, तरीही रस्ता किंवा रेल्वे मार्ग का नाही?
Related image2
Railway Station : रेल्वे स्टेशनच्या नावापुढे जंक्शन, सेंट्रल, टर्मिनस का लिहिलेले असते? याचा अर्थ काय?
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
EPFO WhatsApp : व्हॉट्सॲपवर फक्त 'Hi' पाठवा आणि पीएफ बॅलन्स पाहा, पासबुक असं तपासा
Recommended image2
Bajaj Pulsar 180 : रीलॉन्च होऊन 6 महिन्यातच गायब झाली बजाज पल्सर 180...कारण काय?
Recommended image3
Petrol Diesel Prices : पेट्रोल, डिझेलचे आजचे दर काय? मुंबईसह प्रमुख शहरांतील भाव तपासा
Recommended image4
Gold Rate Today : आजचे सोने-चांदीचे दर, 18 नोव्हेंबर; दिवाळीनंतर किती बदलला भाव?
Recommended image5
Chaat Masala Recipe: ५ मिनिटांत घरीच बनवा चटपटीत चाट मसाला, पाहा सोपी पद्धत
Related Stories
Recommended image1
India Sri Lanka Distance : भारत आणि श्रीलंका यांच्यात फक्त 30 किलोमीटरचं अंतर, तरीही रस्ता किंवा रेल्वे मार्ग का नाही?
Recommended image2
Railway Station : रेल्वे स्टेशनच्या नावापुढे जंक्शन, सेंट्रल, टर्मिनस का लिहिलेले असते? याचा अर्थ काय?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved