MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Gold Pledge Or Sell : सोनं गहाण ठेवायचं की विकायचं? काही वेळा सोनं विकणं का फायद्याचं ठरतं?

Gold Pledge Or Sell : सोनं गहाण ठेवायचं की विकायचं? काही वेळा सोनं विकणं का फायद्याचं ठरतं?

पैशांची गरज असते तेव्हा सोनं गहाण ठेवून कर्ज घ्यावं की ते थेट विकावं, असा प्रश्न अनेकांना पडतो. पण काही विशिष्ट परिस्थितींमध्ये सोनं विकण्याचा निर्णय का योग्य ठरू शकतो.

3 Min read
Author : Karishma R
Published : Oct 04 2026, 04:00 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
सोन्याचे दागिने गहाण ठेवून कर्ज घेण्याचा विचार
Image Credit : Asianet News

सोन्याचे दागिने गहाण ठेवून कर्ज घेण्याचा विचार

अचानक पैशांची गरज लागते, तेव्हा घरातले सोन्याचे दागिने गहाण ठेवून कर्ज घेण्याचा विचार आपल्या मनात सर्वात आधी येतो. सोनं आपल्याकडेच राहील आणि कर्ज फेडल्यावर दागिने परत मिळतील, त्यामुळे हा पर्याय सोयीचा वाटतो.

पण गोल्ड लोन म्हणजे फुकट मिळणारा पैसा नाही. घेतलेल्या कर्जावर तुम्हाला व्याज भरावं लागतं. काही कर्जांमध्ये प्रोसेसिंग फी आणि व्हॅल्युएशन फी यांसारखे इतर छुपे खर्चही असतात. त्यामुळे प्रत्येक वेळी सोनं गहाण ठेवणं हाच सर्वोत्तम निर्णय असतो असं नाही. काही वेळा सोनं विकण्याचा विचारही तुम्ही करू शकता.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
महत्त्वाच्या बाबी
Image Credit : Asianet News

महत्त्वाच्या बाबी

गोल्ड लोनमध्ये तुम्हाला दागिन्यांच्या संपूर्ण मूल्याइतकं कर्ज मिळत नाही. कर्ज देणारी संस्था सोन्याची किंमत, शुद्धता आणि त्यांच्या नियमांनुसार एका ठराविक मर्यादेपर्यंतच कर्ज देते. शिवाय, घेतलेल्या कर्जावर तुम्हाला व्याजही द्यावं लागतं.

उदाहरणार्थ, तुम्हाला तातडीने २ लाख रुपयांची गरज आहे. तुम्ही सोनं गहाण ठेवून २ लाख रुपये कर्ज घेतलं, तर फक्त ते २ लाख रुपये परत करून चालत नाही. कराराप्रमाणे त्यावर व्याज आणि इतर लागू होणारे शुल्कही आकारले जातात.

काही कर्ज देणाऱ्या कंपन्या प्रोसेसिंग, व्हॅल्युएशन आणि प्री-क्लोजरसाठीही फी घेतात. उदाहरणार्थ, HDFC Bank च्या सध्याच्या गोल्ड लोन चार्जेसच्या यादीत प्रोसेसिंग फी आणि व्हॅल्युएशन फीचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे गोल्ड लोनचा एकूण खर्च किती येतो, याचा हिशेब तुम्ही आधी करायला हवा.

Related Articles

Related image1
Gold Hallmark Scam : हॉलमार्क बघून सोनं घेताय? ते फेक असू शकतं, या 5 गोष्टी नक्की तपासा
Related image2
Antique Gold Earrings : साडीवर शोभून दिसणारे भन्नाट अँटिक गोल्ड इअररिंग्स
35
आर्थिक बोजा
Image Credit : Asianet News

आर्थिक बोजा

सोनं गहाण ठेवून कर्ज घेतल्यानंतर, तुम्हाला एका ठराविक वेळेत मुद्दल आणि व्याज भरावं लागतं. जर तुम्हाला एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज घ्यावं लागत असेल, किंवा तुमच्या मासिक उत्पन्नातून कर्जाचे हप्ते भरणं शक्य नसेल, तर हे गोल्ड लोन तुमच्यावरचा आर्थिक बोजा आणखी वाढवू शकतं.

अशा परिस्थितीत, जर त्या दागिन्याशी तुमच्या जास्त भावना जोडलेल्या नसतील आणि पैशांची खरोखरच अत्यंत गरज असेल, तर सोनं विकून पैसे उभे करणं हा एक सोपा आर्थिक निर्णय ठरू शकतो. यामुळे एका कर्जातून बाहेर पडण्यासाठी दुसरं कर्ज घेण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही.

पण हा नियम सर्वांनाच लागू होत नाही. दागिन्याचं भावनिक मूल्य, लागणाऱ्या पैशांची रक्कम आणि भविष्यात तो दागिना पुन्हा विकत घेता येईल का, या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही करायला हवा.

45
सोन्याचा भाव, सोन्याचं वजन
Image Credit : Getty

सोन्याचा भाव, सोन्याचं वजन

सोन्याचे दागिने विकताना, 'आजचा सोन्याचा भाव × दागिन्याचं एकूण वजन' या हिशेबाने तुम्हाला पूर्ण पैसे मिळतील, असा विचार करू नका. दागिन्यांमधले खडे आणि इतर धातूंचं वजन यातून वजा केलं जातं. सोन्याची शुद्धता, सोन्याचं निव्वळ वजन आणि सोनं विकत घेणाऱ्या दुकानाचे नियम या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुम्हाला मिळणाऱ्या अंतिम रकमेवर होतो.

याशिवाय, दागिने घेताना तुम्ही दिलेली घडणावळ (मेकिंग चार्जेस) आणि इतर खर्च विकताना परत मिळतील, अशी अपेक्षा तुम्ही ठेवू शकत नाही. त्यामुळे जर तुम्ही सोनं विकायचा निर्णय घेतलाच, तर एकापेक्षा जास्त विश्वासार्ह दुकानांमध्ये मिळणारा भाव आणि कपातीची तुलना करा आणि मगच योग्य तो निर्णय घ्या.

55
सोनं गहाण ठेवायचं की विकायचं, हे ठरवण्यापूर्वी स्वतःला या चार गोष्टी नक्की विचारा:
Image Credit : Getty

सोनं गहाण ठेवायचं की विकायचं, हे ठरवण्यापूर्वी स्वतःला या चार गोष्टी नक्की विचारा:

१. किती पैशांची गरज आहे? छोट्या रकमेसाठी दीर्घ मुदतीचं कर्ज घेणं योग्य आहे का, हे तपासा.

२. कर्ज कधी फेडू शकाल? जर तुमचं उत्पन्न निश्चित असेल, तर कर्ज फेडणं सोपं जातं. नाहीतर व्याजाचा बोजा वाढत जातो.

३. गोल्ड लोनचा एकूण खर्च किती? फक्त व्याजच नाही, तर प्रोसेसिंग, व्हॅल्युएशन आणि इतर लागू होणाऱ्या शुल्कांचाही हिशेब करा.

४. दागिन्याचं भावनिक मूल्य किती आहे? जर तो दागिना पिढीजात असेल किंवा कुटुंबाच्या आठवणींशी जोडलेला असेल, तर फक्त पैशांचा विचार करून निर्णय घेता येत नाही.

जर तुम्ही गोल्ड लोन फेडू शकला नाहीत, तर कर्ज देणाऱ्या संस्थेच्या नियमांनुसार गहाण ठेवलेलं सोनं लिलावात काढण्याची वेळ येऊ शकते. RBI च्या नियमांमध्ये गोल्ड लोनच्या लिलावा प्रक्रियेबाबत स्पष्ट नियम आहेत.

त्यामुळे सोनं गहाण ठेवणं नेहमीच चांगलं किंवा सोनं विकणं नेहमीच चांगलं, असं ठामपणे सांगता येत नाही. तुमची पैशांची गरज, कर्ज फेडण्याची क्षमता, कर्जाचा एकूण खर्च आणि दागिन्याचं महत्त्व यावरच तुमचा योग्य निर्णय अवलंबून असतो.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Gold Jewellery Cleaning : टूथपेस्ट आणि बेकिंग सोड्याने सोन्याचे दागिने साफ करताय? ही आहे योग्य पद्धत
Recommended image2
CNG Car Safety : सीएनजी भरताना तुम्हीही या चुका करताय? वेळीच सावध व्हा
Recommended image3
iPhone 18 Pro EMI : झिरो पर्सेंट EMI वर आयफोन घेताय? थांबा, हे छुपे चार्जेस माहिती आहेत का?
Recommended image4
Electric Cars : दिवाळीची भन्नाट ऑफर; 1 किमीसाठी फक्त 2.60 रुपये खर्च, बजेटमध्ये येतील 5 नव्या ईव्ही
Recommended image5
Credit Card Security : क्रेडिट कार्ड वापरताय? या 7 सेटिंग्स ऑफ केल्या नाहीत तर अकाउंट होईल रिकामं
Related Stories
Recommended image1
Gold Hallmark Scam : हॉलमार्क बघून सोनं घेताय? ते फेक असू शकतं, या 5 गोष्टी नक्की तपासा
Recommended image2
Antique Gold Earrings : साडीवर शोभून दिसणारे भन्नाट अँटिक गोल्ड इअररिंग्स
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved