धनत्रयोदशीनिमित्त सोन्याएवजी Paper Gold मध्ये करा गुंतवणूक, वाचा फायदे

| Published : Oct 29 2024, 10:07 AM IST / Updated: Oct 29 2024, 10:08 AM IST

Gold
धनत्रयोदशीनिमित्त सोन्याएवजी Paper Gold मध्ये करा गुंतवणूक, वाचा फायदे
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

धनत्रयोदशीला सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. यामुळे सोन्याचे भावही वाढलेले दिसतात. पण यंदाच्या धनत्रयोदशीला सोन्याएवजी पेपर गोल्डमध्ये गुंतवणूक करू शकता. जाणून घेऊया पेपर गोल्ड म्हणजे नक्की काय आणि फायदे सविस्तर....

Gold Investment on Dhanteras 2024 : धनत्रयोदशीच्या वेळी गुंतवणूकदार सोन्यामध्ये मोठी गुंतवणूक करतात. सध्या सोन्यासह डिजिटल गोल्डमध्येही गुंतवणूक केली जाते. अशातच पेपर गोल्डमध्ये यंदा गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल हा पर्याय बेस्ट आहे. पेपर गोल्ड, डिजिटल गोल्डसह सॉवरेन गोल्ड बॉन्ड, गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड म्युचअल फंड पेपरमध्ये देखील धनत्रयोदशीवेळी गुंतवणूक करू शकता. जाणून घेऊया पेपर गोल्ड म्हणजे नक्की काय आणि अन्य गुंतवणूकीच्या पर्यायांबद्दल सविस्तर...

गोल्ड ETF मध्ये करू शकता गुंतवणूक
गोल्ड इटीएफ असे फंड्स ज्यामध्ये खऱ्या स्वरुपात सोन्यात गुंतवणूक केली जाते. शेअर मार्केटमधील शेअर्सप्रमाणे स्टॉक्स एक्सचेंजवर गुंतवणूक केली जाते. गोल्ड ईटीएफ खरेदी करण्यासाठी रजिस्टर्ड स्टॉकब्रोकरकडून डीमॅट आणि ट्रेडिंग खाते सुरु करावे लागते. सध्याच्या काळात निप्पॉन इंडिया गोल्ड इटीएफ, एचडीएफसी गोल्ड इटीएफ अशाप्रकारचे काही लोकप्रिय इटीएफ मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही स्वत:हून रिसर्च करुन देखील गुंतवणूक करू शकता.

सॉवरेन गोल्ड बॉन्ड
सॉवरेन गोल्ड बॉन्डची योजना वर्ष 2015 मध्ये सुरू झाली होती. सॉवरेन गोल्ड बॉन्ड आरबीआय सरकारकडून जारी केले जातात. यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर उत्तम परतावा दिला जातो. गुंतवणूकीवर गुंतवणूकदारांना 2.5 टक्क्यांनी व्याज दिले जाते. हे पैसे प्रत्येक सहा महिन्यांनी गुंतवणूकदारांच्या बँक खात्यात जमा केले जातात. दरम्यान, सॉवरेन गोल्ड बॉन्डच्या योजनेचा कालावधी 8 वर्षांचा असून मॅच्युरिटीनंतरच पूर्ण पैसे काढता येतात.

गोल्ड म्युचअल फंडमध्ये करा गुंतवणूक
गोल्ड म्युचअल फंड मुख्य रुपात इटीएफमध्ये गुंतवणूक केल्यासारखेच आहे. सोन्यामध्ये अप्रत्यक्षपणे गुंतवणूक करण्याचा हा एक प्रकार आहे. एचडीएफसी गोल्ड फंड किंवा एसबीआय गोल्ड फंडसारख्या वेगवेगळ्या गोल्ड म्युचअल फंडात गुंतवणूक करू शकता. याशिवाय थेट म्युचअल फंडच्या वेबसाइट अथवा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणाऱ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकता.

आणखी वाचा : 

गृहकर्ज सोपे करा, बजाज फिनसर्व्ह ईएमआय कॅल्क्युलेटरसह

सोने खरेदी करताना ५ गोष्टींची काळजी घ्या, नाहीतर होईल फसवणूक

Read more Articles on