थंडीत त्वचा कोरडी पडते. अशावेळी दोन चमचे कोरफड जेल आणि थोडे तांदळाचे पीठ एकत्र करून पॅक बनवा. हा पॅक चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. 20 मिनिटांनी धुवा. ब्लॅकहेड्स काढून टाकण्यासाठी आणि चेहरा सुंदर करण्यासाठी हा पॅक उत्तम आहे. 

कोरफड ही बहुगुणी आहे. तिचा औषधासारखा वापर केला जातो. भाजले, जखम झाली तर कोरफडीचा वापर केला जातो. अगदी नव्या कोऱ्या बुटांमुळे पायाला जखम झाली तरी, त्याचा औषध म्हणून वापर करता येतो. त्यामुळे अनेक जण कोरफड जेल घरात ठेवतात. हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. चेहरा तर अनेकदा शुष्क होऊन जातो. अशा वेळी चेहरा तजेलदार ठेवण्यासाठी सुद्धा कोरफडीचा वापर योग्य ठरतो. कोरफडीचा फेस पॅक तयार करून चेहऱ्यावर लावावा. 

चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि डाग दूर करण्यासाठी कोरफड सर्वोत्तम आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई सारखी सौंदर्य टिकवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व प्रमुख जीवनसत्त्वे असतात. हे त्वचेच्या छिद्रांना हायड्रेटेड ठेवून त्वचा अधिक मऊ बनविण्यात मदत करते. चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी कोरफड कसे वापरावे ते जाणून घेऊया...

एक

मुरुमे आणि त्वचेच्या ॲलर्जीच्या समस्यांवर हळद हा एक उत्तम उपाय आहे. त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी देखील हे प्रभावीपणे काम करते. दोन चमचे कोरफड जेल आणि थोडी हळद एकत्र करून पॅक बनवा. हा पॅक चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. 15 मिनिटांनी धुऊन टाका.

दोन

दोन चमचे कोरफड जेल आणि थोडे तांदळाचे पीठ एकत्र करून पॅक बनवा. हा पॅक चेहऱ्यावर आणि मानेवर चांगला लावा. २० मिनिटांनी धुऊन टाका. ब्लॅकहेड्स काढून टाकण्यासाठी आणि चेहरा सुंदर करण्यासाठी हा पॅक उत्तम आहे.

तीन

केळे त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. मधात असलेले अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म त्वचेवरील बॅक्टेरिया काढून टाकतात. केळ्याची पेस्ट बनवून त्यात थोडे कोरफड जेल मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. हा पॅक चेहरा सुंदर बनवण्यासाठी मदत करेल.

चार

दोन चमचे कोरफड जेल आणि थोडे बेसन एकत्र करून पॅक बनवा. हा पॅक चेहऱ्यावर लावा. वाळल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.