कोरफड केवळ आरोग्यासाठीच नाही, तर केसांसाठी देखील एक अत्यंत फायदेशीर घटक आहे. हिवाळ्यात तुमचे केस निरोगी ठेवण्यासाठी कोरफड जेल वापरण्याचे फायदे जाणून घ्या.
कोरफड जेल केसांतील कोंडा कमी करते, केसांची मऊपणा वाढवते आणि केसांना चमकदार बनवते. त्याचे अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म केसांच्या स्कॅलपवर होणारे संक्रमण कमी करतात.
1. कोरफड जेल काढा.
2. थेट केसांवर लावा.
3. एक तास थांबा आणि नंतर पाण्यात कडुनिंबाच्या पानांची पेस्ट मिसळून केस स्वच्छ धुवा.
फायदा: याने कोंडा कमी होईल आणि केस निरोगी होईल.
कोरफड आणि लिंबाचा वापर केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. 2-3 चमचे कोरफड जेल. 1 चमचा लिंबाचा रस. पेस्ट तयार करून एक तास आधी केसांवर लावा आणि नंतर सौम्य शॅम्पूने धुवा.
व्हिनेगरमध्ये अँटी-फंगल, अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. कोरफड जेलमध्ये अर्धा चमचा व्हिनेगर मिसळा. एक तास ठेवून नंतर सौम्य शॅम्पूने धुवा. यामुळे कोंडा, टाळूवरील इन्फेक्शन दूर होईल.
कोरफड आणि टी ट्री ऑइलच्या संयोजनामुळे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म वाढतात. तीन चमचे कोरफड जेल. टी ट्री ऑइलचे काही थेंब. 1 तास ठेवून सौम्य शॅम्पूने धुवा. कोंडा कमी होईल, दुर्गंधी दूर होईल
कोरफड आणि दही यांचे मिश्रण केसांसाठी आदर्श आहे. 2 चमचे कोरफड जेल. 1 चमचा दही आणि लिंबाचा रस. पेस्ट तयार करून केसांवर लावा आणि एक तास ठेवून धुवा. यामुळे केस मुलायम आणि चमकदार होतात.
हिवाळ्यात केसांची देखभाल करण्यासाठी कोरफड जेल वापरा. नियमितपणे या उपायांचा वापर केल्याने तुमचे केस निरोगी आणि चमकदार होतील.