MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • PM Kisan 22nd Installment Date: होळी सरली तरी खात्यात २ हजार आले नाहीत? 'या' तारखेला जमा होणार पीएम किसानचा २२ वा हप्ता; मोदी सरकारची मोठी तयारी!

PM Kisan 22nd Installment Date: होळी सरली तरी खात्यात २ हजार आले नाहीत? 'या' तारखेला जमा होणार पीएम किसानचा २२ वा हप्ता; मोदी सरकारची मोठी तयारी!

PM Kisan 22nd Installment Date: पीएम किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ मार्च रोजी या हप्त्याचे वितरण करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 08 2026, 03:51 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
'या' तारखेला जमा होणार पीएम किसानचा २२ वा हप्ता
Image Credit : iSTOCK

'या' तारखेला जमा होणार पीएम किसानचा २२ वा हप्ता

मुंबई: होळीचा सण साजरा झाल्यानंतर आता देशातील करोडो शेतकऱ्यांच्या नजरा एकाच गोष्टीकडे लागल्या आहेत. ती म्हणजे पीएम किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता (PM Kisan 22nd Installment). सणाच्या मुहूर्तावर पैसे येतील अशी अपेक्षा होती, पण आता प्रतीक्षा संपण्याची वेळ आली आहे. सरकारकडून पुढील काही दिवसांतच शेतकऱ्यांच्या खात्यात आनंदाची बातमी धडकण्याची शक्यता आहे. 

25
१३ मार्चला होणार मोठा धमाका?
Image Credit : Getty

१३ मार्चला होणार मोठा धमाका?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ मार्च रोजी कोक्राझार (Kokrajhar) दौऱ्यावर असणार आहेत. याच कार्यक्रमातून पंतप्रधान देशातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात २२ व्या हप्त्याचे पैसे एका क्लिकवर जमा करण्याची दाट शक्यता आहे. जर या दिवशी घोषणा झाली, तर पुढील आठवड्याच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये जमा होतील. 

Related Articles

Related image1
Gas Saving Tips: गॅस सिलेंडर लवकर संपतोय? या ५ सोप्या टिप्स वापरा आणि महिन्याचे पैसे वाचवा!
Related image2
Pune Fuel Shortage Crisis: पुण्यात इंधन आणीबाणी! इराण-इस्रायल युद्धाचा विळखा; पेट्रोल, डिझेलसह गॅसचा मोठा तुटवडा?
35
बळीराजाला वर्षाला मिळतात ६,००० रुपये
Image Credit : iSTOCK

बळीराजाला वर्षाला मिळतात ६,००० रुपये

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना ६,००० रुपयांची आर्थिक मदत करते.

ही रक्कम २,००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते.

ही मदत थेट DBT (Direct Benefit Transfer) द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते, ज्यामुळे भ्रष्टाचार किंवा मध्यस्थांना थारा उरत नाही. 

45
तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? 'असे' तपासा स्टेटस
Image Credit : iSTOCK

तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? 'असे' तपासा स्टेटस

हप्ता जमा होण्यापूर्वी तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे की नाही, हे तपासणं अत्यंत गरजेचं आहे. खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा.

अधिकृत वेबसाईट: सर्वप्रथम pmkisan.gov.in वर जा.

Know Your Status: होमपेजवर 'तुमची स्थिती जाणून घ्या' या पर्यायावर क्लिक करा.

नोंदणी तपशील: तुमचा नोंदणी क्रमांक (Registration Number) टाका आणि मोबाईलवर आलेला OTP भरा.

निकाल: स्क्रीनवर तुम्हाला तुमच्या हप्त्याची सद्यस्थिती दिसेल.

स्मार्ट टिप: जर तुमचं e-KYC पूर्ण नसेल किंवा आधार बँक खात्याशी लिंक नसेल, तर तुमचा हप्ता अडकू शकतो. त्यामुळे ही कामे आजच पूर्ण करून घ्या!

55
लाभार्थी यादीत नाव कसे पाहायचे?
Image Credit : iSTOCK

लाभार्थी यादीत नाव कसे पाहायचे?

तुमच्या गावातील लाभार्थी यादी पाहण्यासाठी पोर्टलवर 'Beneficiary List' वर क्लिक करा. तिथे तुमचं राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा. यादीत नाव असल्यास तुम्हाला २२ व्या हप्त्याचा लाभ नक्की मिळेल.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
WhatsApp Update: आता लांबलचक चॅट वाचायची गरज नाही, WhatsApp आणतंय भन्नाट फीचर!
Recommended image2
Chanakya Niti: वडिलांच्या 'या' चुकांमुळे मुलांचं भविष्य होतं खराब!, आवर्जून वाचा...
Recommended image3
Birthday Mehndi: वाढदिवसाला हातांवर काढा खास मेहंदी, पाहा 7 सुंदर बॅकहँड डिझाइन्स
Recommended image4
Rahu Mars Mercury Conjunction: कुंभ राशीत राहू-मंगळ-बुधाची युती, ११ एप्रिलपर्यंत 'या' ३ राशींची कसोटी!
Recommended image5
Gold Rudraksha Bracelet : गोल्ड रुद्राक्ष ब्रेसलेट, शिवभक्तांसाठी ५ ग्रॅममधील मॉडर्न डिझाइन्स
Related Stories
Recommended image1
Gas Saving Tips: गॅस सिलेंडर लवकर संपतोय? या ५ सोप्या टिप्स वापरा आणि महिन्याचे पैसे वाचवा!
Recommended image2
Pune Fuel Shortage Crisis: पुण्यात इंधन आणीबाणी! इराण-इस्रायल युद्धाचा विळखा; पेट्रोल, डिझेलसह गॅसचा मोठा तुटवडा?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved