फ्लिपकार्टचा बहुचर्चित 'बिग बिलियन डेज' सेल ९ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या सेलमध्ये सॅमसंगच्या स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काउंट मिळणार आहे. Galaxy S25 FE, S25 आणि Z Fold 8 सारख्या मॉडेल्सवर भारी ऑफर्स आहेत. याशिवाय निवडक बँक कार्ड्सवर १० टक्के अतिरिक्त सूटही मिळेल.
मुंबई : फ्लिपकार्टच्या सर्वात मोठ्या 'बिग बिलियन डेज' सेलची सगळेच आतुरतेने वाट पाहत असतात. आता हा सेल ९ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या सेलमध्ये सॅमसंगच्या अनेक स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट मिळणार आहे. Galaxy S25 FE आणि Galaxy S25 सोबतच लेटेस्ट Galaxy Z Fold 8 सिरीजवरही खास ऑफर्स असणार आहेत.
फ्लिपकार्टने दिलेल्या माहितीनुसार, Galaxy S25 FE हा फोन तुम्ही ५० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकाल. या फोनची मूळ किंमत ५९,९९९ रुपये आहे. सेलमध्ये हा फोन नेमका कितीला मिळेल हे अजून स्पष्ट नसलं तरी, त्याची किंमत ४० हजारांच्या घरात (4X,XXX) असेल असा अंदाज आहे. यासोबतच Galaxy S25 मॉडेलवरही मोठी सूट मिळत आहे. ८०,९९९ रुपये किंमतीचा हा प्रीमियम स्मार्टफोन ६० हजार रुपयांच्या खाली मिळेल, असं फ्लिपकार्टने सांगितलं आहे. पण या फोनची नेमकी ऑफर प्राईस नंतर जाहीर केली जाईल.
इतर सॅमसंग फोन्सवरही भन्नाट ऑफर्स
Galaxy A36 मॉडेलवरही तुम्हाला भारी डिस्काउंट मिळेल. हा फोन ३० हजार रुपयांच्या आत मिळू शकतो. तसंच Galaxy F70 Pro फोनची किंमतही ३० हजारांच्या खाली येण्याची शक्यता आहे. याशिवाय Galaxy F70e मॉडेल २० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल, असे संकेत फ्लिपकार्टने दिले आहेत. सॅमसंगच्या नवीन फ्लॅगशिप Galaxy S26 सिरीजच्या फोन्सवरही सेलमध्ये खास ऑफर्स असतील.
Galaxy Z Fold 8 आणि Galaxy Z Fold 8 Ultra मॉडेल्सवरही सूट मिळेल. पण या प्रीमियम मॉडेल्सच्या नेमक्या किंमती फ्लिपकार्टने अजून उघड केलेल्या नाहीत. स्मार्टफोन्सच्या किंमतीत मिळणाऱ्या या डिस्काउंटसोबतच ग्राहकांना बँक ऑफर्सचाही फायदा घेता येईल. ॲक्सिस बँक (Axis Bank) आणि आयसीआयसीआय बँकेचे (ICICI Bank) कार्ड वापरल्यास १० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सूट मिळेल. यूपीआय (UPI) पेमेंटवरही खास फायदे आहेत. याशिवाय सुपरकॉईन ऑफर्स आणि ईएमआयची (EMI) सुविधाही उपलब्ध असेल.
९ ऑक्टोबरपासून सेलला सुरुवात
येत्या ९ ऑक्टोबरपासून फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल सर्वांसाठी खुला होईल. पण फ्लिपकार्ट प्लस आणि फ्लिपकार्ट ब्लॅक मेंबर्सना ८ ऑक्टोबरपासूनच या सेलचा फायदा घेता येईल. सॅमसंग व्यतिरिक्त आयफोन आणि गुगल पिक्सल स्मार्टफोन्सवरही या सेलमध्ये विशेष डिस्काउंट मिळणार असल्याचं फ्लिपकार्टने स्पष्ट केलं आहे.


