भारतातील आघाडीची खाजगी बँक असलेल्या फेडरल बँकेने अनेक राज्यांमध्ये ऑफिस असिस्टंट पदांसाठी अर्ज मागवले आहेत. १०वी उत्तीर्ण पात्र उमेदवार ८ जानेवारी २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
गेल्या काही दिवसात बेरोजगारीची संख्या वाढत असताना आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतातील सर्वोत्तम खाजगी बँकांपैकी एक असलेल्या फेडरल बँकेने आपल्या शाखांमधील गरजा पूर्ण करण्यासाठी ऑफिस असिस्टंट पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. अर्ज बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर ८ जानेवारी २०२६ पर्यंत उपलब्ध असतील. ही भरती अनेक राज्यांमधील शाखांसाठी आहे.
पात्रता निकष -
१ डिसेंबर २०२५ रोजी १०वी उत्तीर्ण किंवा समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. ज्यांनी पदवी पूर्ण केलेली नाही, तेच अर्ज करू शकतात. संगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक आहे. वय १८ ते २० वर्षे (जन्म १ डिसेंबर २००५ ते २००७ दरम्यान). पदवीधरांसाठी वयोमर्यादेत सवलत आहे.
पगार दरमहा १९,५०० रुपये ते ३७,८१५ रुपये असून, अतिरिक्त लाभ देखील मिळतील. निवड ऑनलाइन चाचणी आणि मुलाखतीद्वारे होईल. परीक्षा विविध केंद्रांवर घेतली जाईल. परीक्षेमध्ये संगणक ज्ञान, इंग्रजी आणि गणित या विषयांवर प्रत्येकी १५ गुणांचे प्रश्न असतील.
अर्ज शुल्क -
सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५०० रुपये आणि SC/ST उमेदवारांसाठी १०० रुपये शुल्क आहे, जे ऑनलाइन भरता येईल. अर्ज करण्यासाठी, बँकेच्या वेबसाइटवरील करिअर पेजवर जाऊन माहिती भरा, फोटो अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा. महत्त्वाच्या तारखा: अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जानेवारी, हॉल तिकीट २३ जानेवारीपर्यंत उपलब्ध होणार आहे.


