MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Fastag New Rules 2026: हायवेवर खिशाला कात्री बसण्यापूर्वी हे वाचा! FASTag चे 'हे' ५ नवे नियम बदलणार तुमचा प्रवासाचा अनुभव

Fastag New Rules 2026: हायवेवर खिशाला कात्री बसण्यापूर्वी हे वाचा! FASTag चे 'हे' ५ नवे नियम बदलणार तुमचा प्रवासाचा अनुभव

Fastag New Rules 2026: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) २०२६-२७ साठी फास्टॅगचे नवीन नियम लागू केले आहेत. यामध्ये फास्टॅग योग्य ठिकाणी लावण्यापासून ते रस्त्यांच्या दुरुस्तीदरम्यान अर्धा टोल भरण्यापर्यंतच्या नियमांचा समावेश आहे. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 18 2026, 08:48 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
हायवेवर खिशाला कात्री बसण्यापूर्वी हे वाचा!
Image Credit : Asianet News

हायवेवर खिशाला कात्री बसण्यापूर्वी हे वाचा!

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्या असोत किंवा विकेंडची 'रोड ट्रिप', हायवेवरचा प्रवास आता फास्टॅगमुळे (FASTag) सुसाट झाला आहे. पण, कधी टोल नाक्यावर बॅलन्स असूनही स्कॅन होत नाही, तर कधी विनाकारण दुप्पट दंड भरावा लागतो. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) २०२६-२७ या वर्षासाठी नियमांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. हे नियम माहित असतील, तर तुमचे पैसेही वाचतील आणि मनस्तापही टळेल. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
१. फास्टॅग फक्त असून चालणार नाही, तो 'येथे' हवाच!
Image Credit : Google

१. फास्टॅग फक्त असून चालणार नाही, तो 'येथे' हवाच!

अनेकजण फास्टॅग काचेवर न चिकटवता डॅशबोर्डवर ठेवतात किंवा हातात धरून स्कॅन करण्याचा प्रयत्न करतात. आता सावधान! जर तुमचा फास्टॅग गाडीच्या विंडस्क्रीनवर (काचेवर) आतून योग्य ठिकाणी चिकटवलेला नसेल, तर तुमच्याकडे बॅलन्स असूनही दुप्पट टोल वसूल केला जाईल. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी तो नीट चिकटवलेला आहे ना, हे तपासा. 

Related Articles

Related image1
शिर्डीच्या साई प्रसादाला युद्धझळा! इराण युद्धाचा मोठा फटका; आशियातील सर्वात मोठ्या किचनमध्ये आता 'हा' बदल
Related image2
जमीन NA करण्यासाठी आता कलेक्टर ऑफिसचे हेलपाटे बंद! सरकारच्या 'या' ऐतिहासिक निर्णयाचा कोणाला होणार फायदा? वाचा सविस्तर
36
२. रस्त्याचं काम सुरू आहे? मग अर्धाच टोल द्या!
Image Credit : Google

२. रस्त्याचं काम सुरू आहे? मग अर्धाच टोल द्या!

हा नियम ९०% प्रवाशांना माहित नाही. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर एखाद्या नॅशनल हायवेवर दुरुस्ती किंवा रुंदीकरणाचे काम सुरू असेल, तर प्रवाशांकडून पूर्ण टोल घेता येत नाही. अशा वेळी तुम्हाला केवळ ५० टक्के (अर्धी रक्कम) टोल भरण्याचा अधिकार आहे. नियमाचा हा 'टाॅल' तुम्हाला नक्कीच पैसे वाचवून देईल. 

46
३. रोख रकमेपेक्षा 'UPI' ठरेल फायदेशीर
Image Credit : Google

३. रोख रकमेपेक्षा 'UPI' ठरेल फायदेशीर

जर तुमच्या गाडीत ॲक्टिव्ह फास्टॅग नसेल, तर रोख (Cash) पैसे दिल्यास पूर्वीप्रमाणेच दुप्पट दंड लागेल. पण डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने एक सुवर्णमध्य काढला आहे. रोख रकमेऐवजी जर तुम्ही UPI द्वारे पेमेंट केले, तर दुप्पट ऐवजी केवळ १.२५ पट (१२५%) शुल्क आकारले जाईल. थोडक्यात, खिशातून जास्तीचे पैसे जाण्यापेक्षा UPI चा वापर नक्कीच परवडणारा आहे. 

56
४. 'अ‍ॅनुअल पास'च्या दरात वाढ
Image Credit : Freepik

४. 'अ‍ॅनुअल पास'च्या दरात वाढ

जे प्रवासी एकाच टोलवरून वारंवार ये-जा करतात, त्यांच्यासाठी वार्षिक पास सोयीचा असतो. NHAI ने २०२६-२७ साठी या पासच्या दरात ७५ रुपयांची वाढ केली असून आता नवीन किंमत ३,०७५ रुपये झाली आहे. या पासमुळे तुम्ही वर्षातून २०० वेळा टोल ओलांडू शकता, ज्यामुळे वारंवार रिचार्ज करण्याची कटकट संपते. 

66
५. 'राजमार्ग यात्रा' अ‍ॅप, तुमचा हायवेवरील सोबती
Image Credit : stockPhoto

५. 'राजमार्ग यात्रा' अ‍ॅप, तुमचा हायवेवरील सोबती

प्रवासात काही अडचण आली किंवा टोलबाबत तक्रार असेल, तर १०३३ हा हेल्पलाईन नंबर डायल करा. तसेच, 'राजमार्ग यात्रा' (Rajmarg Yatra) हे अ‍ॅप तुमच्या फोनमध्ये असायलाच हवे. या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही 

फास्टॅग मॅनेज करू शकता.

जवळचा पेट्रोल पंप, रुग्णालय आणि ईव्ही चार्जिंग स्टेशन शोधू शकता.

हवामानाचे आणि रस्त्यावरील स्थितीचे लाइव्ह अपडेट्स मिळवू शकता.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Radhika Merchant: अंबानींच्या सूनबाई भारतात परतल्या! अमेरिकेतील करिअर का सोडलं?
Recommended image2
Graveyard Dating: Gen Z चे आता स्मशानात डेटिंग! काय आहे हे नवीन प्रकरण?
Recommended image3
Psychology Tricks: समोरच्याच्या मनात दडलंय काय? या 5 ट्रिक्सने लगेच ओळखा!
Recommended image4
Car Market: टाटा मोटर्सच्या गाड्या महागणार, कोणत्या मॉडेल्सच्या किमती वाढणार?
Recommended image5
Car Dashboard Lights: गाडी चालवताना या लाइट्सकडे दुर्लक्ष नको! जाणून घ्या कारणे
Related Stories
Recommended image1
शिर्डीच्या साई प्रसादाला युद्धझळा! इराण युद्धाचा मोठा फटका; आशियातील सर्वात मोठ्या किचनमध्ये आता 'हा' बदल
Recommended image2
जमीन NA करण्यासाठी आता कलेक्टर ऑफिसचे हेलपाटे बंद! सरकारच्या 'या' ऐतिहासिक निर्णयाचा कोणाला होणार फायदा? वाचा सविस्तर
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved