न्यूट्रिशनच्या जगात सध्या फास्ट आणि स्लो प्रोटीनची खूप चर्चा आहे. व्हे आयसोलेट आणि यीस्ट प्रोटीन एकत्र केल्याने शरीराला कसा फायदा होतो, ते समजून घेऊया.
प्रोटीनबद्दल बोलताना आपण नेहमी एकाच गोष्टीवर अडकतो, ती म्हणजे आपण किती प्रोटीन खातोय? फिटनेसची आवड असणारे लोक असोत किंवा हेल्दी फूड शोधणारे सामान्य लोक, सगळ्यांचा भर प्रोटीनच्या प्रमाणावरच असतो. पण आता न्यूट्रिशन सायन्स खूप पुढे गेलंय. त्यामुळे आता एक नवा प्रश्न समोर आलाय: आपण जे प्रोटीन खातोय, ते आपल्या शरीरात खरंच किती चांगलं काम करतंय?
या नव्या विचारामुळे फूड आणि न्यूट्रिशन कंपन्यांचा प्रोटीनकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय. आता एखाद्या प्रॉडक्टमध्ये फक्त प्रोटीनचे ग्रॅम वाढवून चालत नाही. तर आजच्या धावपळीच्या लाईफस्टाईलला आणि शरीराच्या गरजांना साजेसं असं स्मार्ट प्रोटीन देण्यावर कंपन्यांचा भर आहे.
सध्या फास्ट आणि स्लो प्रोटीनमधला फरक समजून घेण्यावर जास्त लक्ष दिलं जातंय. सोप्या भाषेत सांगायचं तर, फास्ट प्रोटीन लवकर पचतं आणि रक्तात अमिनो ॲसिड्स वेगाने पोहोचवतं. व्हे आयसोलेट (Whey isolate) हे याचं सर्वात उत्तम उदाहरण आहे. वर्कआऊटनंतर शरीराची झीज भरून काढण्यासाठी ॲथलीट्स आणि फिटनेस प्रेमींमध्ये हे खूप लोकप्रिय आहे.
स्लो प्रोटीन मात्र थोडं वेगळ्या पद्धतीने काम करतं. ते शरीरात एकदम शोषलं जात नाही, तर हळूहळू अमिनो ॲसिड्स रिलीज करतं. दोन जेवणांमध्ये जेव्हा जास्त अंतर असतं, तेव्हा शरीराला लागणारी प्रोटीनची गरज पूर्ण करण्यासाठी हे स्लो प्रोटीन खूप फायद्याचं ठरतं.
या दोन्हीमधला फरक प्रोटीन पचण्याची प्रक्रिया आणि अमिनो ॲसिडच्या उपलब्धतेवर अवलंबून असतो. एका अभ्यासानुसार, लवकर पचणाऱ्या व्हे प्रोटीनमधील अमिनो ॲसिड्स खाल्ल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत प्लाझ्मामध्ये दिसू लागतात आणि ६० मिनिटांत ते सर्वोच्च पातळीवर पोहोचतात. अमिनो ॲसिड्सची ही वेगाने वाढणारी पातळी स्नायूंच्या वाढीसाठी खूप महत्त्वाची असते, विशेषतः व्यायाम केल्यानंतर.
याउलट, उशिरा पचणारं प्रोटीन शरीराला हळूहळू आणि सलग अमिनो ॲसिड्स पुरवत राहतं. झोपण्यापूर्वी घेतल्या जाणाऱ्या स्लो-डायजेस्टिंग प्रोटीनवर एक रिसर्च झाला. यात झोपण्यापूर्वी ३० मिनिटे आधी ४०-४८ ग्रॅम प्रोटीन घेतल्यास रात्रभर शरीराला अमिनो ॲसिड्स मिळत राहतात, असं दिसून आलं. प्रोटीनचं योग्य प्रमाण हे प्रत्येकाच्या गरजेवर अवलंबून असतं. पण यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, न्यूट्रिशन सायंटिस्ट आता अशा कॉम्बिनेशनवर काम करत आहेत, जे शरीराला लगेच आणि दीर्घकाळ प्रोटीन पुरवू शकेल.
खूप काळापासून लोक या दोन्हीकडे वेगवेगळे पर्याय म्हणून बघत आलेत. एकतर रिकव्हरीसाठी फास्ट प्रोटीन घ्यायचं किंवा दीर्घकाळ टिकणाऱ्या ऊर्जेसाठी स्लो प्रोटीन निवडायचं. पण खऱ्या आयुष्यात गोष्टी इतक्या सोप्या नसतात.
आजकाल लोक ऑफिस, फिटनेस, कुटुंब आणि स्वतःचं आरोग्य या सगळ्या गोष्टी एकाच दिवसात मॅनेज करतात. त्यामुळे त्यांची न्यूट्रिशनची गरज फक्त एका वर्कआऊट किंवा जेवणापुरती मर्यादित नसते. त्यांना असा पर्याय हवा असतो, जो दिवसभर शरीराला साथ देईल आणि त्यांच्या बिझी शेड्युलमध्ये सहज बसेल.
ग्राहकांची ही बदलती गरज ओळखून फूड कंपन्या आता जुन्या प्रोटीन फॉर्म्युलामध्ये बदल करत आहेत. वेगवेगळ्या प्रोटीन सोर्सेसचे फायदे एकत्र कसे देता येतील, यावर त्यांचा भर आहे.
योगा बारने (Yoga Bar) नुकतंच 'इंडियाज फर्स्ट व्हे आयसोलेट + यीस्ट प्रोटीन ब्लेंड' (India's First Whey Isolate + Yeast Protein Blend) लाँच केलंय. फास्ट आणि स्लो प्रोटीनचे फायदे एकत्र देण्याच्या उद्देशाने हे तयार करण्यात आलंय. फास्ट-रिलीजिंग व्हे आयसोलेट आणि स्लो-रिलीजिंग यीस्ट प्रोटीन एकत्र केल्यामुळे शरीराला लगेच प्रोटीन मिळतं आणि दीर्घकाळ पोषणही टिकून राहतं.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अशा नव्या प्रयोगांमुळे फूड इंडस्ट्रीमध्ये एक मोठा बदल घडतोय. आजचे ग्राहक फक्त लेबल आणि प्रोटीनचे आकडे बघत नाहीत. त्यांना अशी प्रॉडक्ट्स हवी आहेत जी सायन्सवर आधारित असतील, वापरायला सोपी असतील आणि खऱ्या आयुष्यातील न्यूट्रिशनच्या गरजा पूर्ण करतील.
याचाच परिणाम म्हणून, भविष्यात एखाद्या प्रॉडक्टमध्ये किती प्रोटीन आहे, यावर त्याचं महत्त्व ठरणार नाही. तर त्या प्रोटीनची क्वालिटी, ते कसं काम करतं आणि त्याचा शरीराला किती फायदा होतो, यावर प्रोटीन न्यूट्रिशनचं भविष्य ठरेल.




